Tumgik
nileshkorade · 4 years
Text
दहशतवाद आणि भारत
पार्श्वभूमी
एकीकडे भारतात गेली सहा वर्षे सतत हिंदू विरुद्ध मुस्लिम असा जो जातीयवाद भडकवला जात आहे त्याच्या परिणामस्वरूप CAA बद्दल होणाऱ्या निषेध सभांचे निमित्त होऊन दिल्लीमध्ये दंगे सुरु झालेले होते. आणि त्याचवेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Trump दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. या दरम्यान मला एक प्रश्न विचारण्यात आला. विचारणाऱ्या व्यक्तीने "भारत आणि अमेरिका यांच्यावर दहशतवादाच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे" असे मत व्यक्त करून दहशतवाद या विषयावर माझे मत विचारले. या विधानामध्ये, विशेषतः देशातील सद्यःपरिस्थिती पाहता मला बराच विरोधाभास जाणवला. त्याचा आणि सद्यःपरिस्थितीमध्ये भारतासमोर दिसत असलेले दहशतवादाचे आव्हान या विषयावरचे माझे मत या दोन्ही गोष्टींचा हा उहापोह.
सारांश
१. खिडकीबाहेर बघून कधीकधी जेवढे विदारक दृश्य दिसते त्याहूनही विदारक दृश्य आपल्या घरात असू शकते. भारतीयांनी थोडे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
२. माझ्या दृष्टिकोनातून बहुसंख्य भारतीय जे पाकिस्तान आणि तेथील लोकांकडे दहशतवादी म्हणून निर्देश करतात ते स्वतः देखील दहशतवादीच आहेत.
असे का वाटते मला? जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा.
दहशतवाद म्हणजे काय?
दहशतवादाची जी वैशिष्ट्ये आहेत त्यात खालील दोन वैशिष्ट्ये मला महत्वाची वाटतात-
१. सर्वसामान्यपणे, त्याचं मूर्त रूप (manifestation) आणि परिणाम हे निरपराध लोकांना त्रास होणे, मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, किंवा त्याहीपेक्षा गंभीर स्वरूपामध्ये, त्यांचा जीव जाणे (कत्तल, हत्त्या) असा असतो. इथे हे जाणून घेणे महत्वाचे आहे की अशी कृत्यं फक्त सत्तेबाहेरील लोकच नाही तर एखाद्या देशाचं अधिकृत सरकारही करू शकतं. तसेच, दहशतवाद एखाद्या शत्रू राष्ट्राविरोधातच नाही तर देशांतर्गतही केला जाऊ शकतो.
२. दहशतवादी व्यक्तीची मानसिकता आणि विचारसरणी दोन्ही भ्रष्ट झालेल्या असतात. अशा व्यक्तीला कितीही समजावून सांगितले, तिच्यासमोर कोणतेही तर्क मांडले किंवा पुरावे समोर आणले तरीही तिला सत्य किंवा योग्य काय आहे ते उमजत नाही किंवा तिला ते उमजून घ्यायचे नसते. याचे भारतात बहुतेकांना सहज पटणारे उदाहरण म्हणजे पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन भारतामध्ये दहशतवादी हल्ले करणारे जे युवक असतात त्यांना indoctrinate/brainwash केलेले असते. त्यामुळे त्यांना काहीही सांगितले तरीही त्यांचे तर्क ठरलेले असतात- “तुमचं सरकार गुन्हेगार आहे आणि तुम्ही अशा गुन्हेगार सरकारला टॅक्स देता म्हणजे तुम्हीही गुन्हेगार आहात. असे लोक काफिर असतात आणि त्यांना मारणे म्हणजे ईश्वराची सेवा करणे”. याचेच दुसरे, पण बऱ्याच भारतीयांना न आवडणारे, उदाहरण म्हणजे नथुराम गोडसे, सावरकर आणि त्यांचे सहकारी. महात्मा गांधी बहुतांश भारतीयांचं आणि तत्कालीन ब्रिटिश सरकारचेही मतपरिवर्तन करू शकले, एवढेच नाही तर जगभरामध्ये मार्टिन लुथर किंग जुनिअर किंवा नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइनस्टाइन अशा अनेक दिग्गज नेत्यांचा आणि व्यक्तींचा आदर्श बनले. पण ते गोडसे, सावरकर आणि त्यांच्यासारखी विचारसरणी असणाऱ्यांचे मत-परिवर्तन कधीही करू शकले नाहीत. आजही नाही.
भारतातील देशांतर्गत दहशतवाद
भारतातील देशांतर्गत दहशतवादाची काही ताजी उदाहरणे-
बंगलोरच्या अमुल्याला “पाकिस्तान झिंदाबाद” म्हणल्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक (तर्फे NDTV)
Tumblr media
भारतात असा कोणताही कायदा नाहीये ज्यात पाकिस्तानला शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलं गेलेलं आहे आणि “पाकिस्तान झिंदाबाद” म्हणण्यावर बंदी लादली गेली आहे.
रुलिंग पार्टी BJP मेंबर कपिल मिश्रा DCP दिल्ली पोलीस यांच्या उपस्थितीत लोकांना भडकवताना (inciting riots) (१० मिनिटे ४१ सेकंदांनंतर ) (तर्फे NDTV)
Tumblr media
दिल्ली पोलीस जखमी मुस्लिम तरुणांना मारताना आणि राष्ट्रगीत गायला लावताना. यातल्या एका युवकाचा मृत्यू झाला
Tumblr media
दंगेखोरांचा म्होरक्या पोलिसांच्या पूर्ण संरक्षणामध्ये दंगे घडवताना आणि फेसबुकवर लाईव्ह विडिओ पोस्ट करताना (सूचना: असभ्य भाषा)
Tumblr media
एका युवकाला अनेक धर्मांध दंगेखोर मारताना (तर्फे Reuters)
Tumblr media
केम्ब्रिज प्रोफेसर प्रिया गोपाल दिल्ली दंग्यांबद्दल बोलताना (सर्व विडिओ पहा पण मुख्यत्वे १० मिनिटे २१ सेकंदानंतर) (तर्फे Democracy Now!)
Tumblr media
अनुमान
वर दिलेली दहशतवादाची व्याख्या आणि देशांतर्गत घडलेल्या ताज्या घटनांची दिलेली उदाहरणे बघता माझ्या मते-
१. पाकिस्तानकडे दहशतवादी राष्ट्रं म्हणून बघण्याआधी आपण elephant in the room जो आहे त्याकडे पाहायला हवे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये दंगे होत आहेत आणि आतापर्यंत ४२ लोक मारले गेले आहेत तेव्हाही आत्मपरीक्षण न करता इतरांकडे निर्देश करणे मला चुकीचे वाटते.
२. माझ्या दृष्टिकोनातून बहुसंख्य भारतीय वर दिलेली दशतवादाची जी दोन वैशिष्ट्ये आहेत ती पूर्ण करतात. एक राजकीय पक्ष ज्याचा कमीत-कमी १९८९ पासूनचा इतिहास ज्यांना माहित होता, ज्यांना १९९२-९३ मधील दंगे का झाले आणि त्यात त्या राजकीय पक्षाचा भाग काय होता हे माहिती होते, ज्यांना २००२ मधील दंगे कसे झाले आणि त्यात त्याच राजकीय पक्षाच्या सरकारी यंत्रणेचा भाग काय होता हे माहिती होते, आणि, तरीही त्याच पक्षाला आणि त्याच नेत्याला ज्यांनी २०१४ मध्ये मत दिले, एवढेच नाही, तर त्यानंतर गेली ६ वर्षे unconditional support देऊन ज्याला बेलगाम केले, आणि एवढे होऊनही ज्यांना आपण अजूनही योग्यच आहोत असे वाटते त्यांच्या मानसिकतेबद्दल आणि विचारसरणीबद्दल दुसरे काय सत्य असू शकते? आणि वर दिलेले दहशतवादाचे पहिले जे वैशिष्ट्य आहे- दहशतवादाचं मूर्त रूप आणि त्याचे परिणाम, तर गेल्या सहा वर्षात पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांमुळे जितके लोक मारले गेले त्यापेक्षा कितीतीतरी अधिक देशांतर्गत अशांततेमुळे मारले गेले. मग ते lynchings असतील किंवा पोलिसांद्वारे illegal encounters असतील किंवा धार्मिक दंगे असतील (यात नोटबंदी सारख्या घोडचुकांमुळे मारले गेलेल्यांच्या समावेश केला नाही आहे).
फरक आणि साम्य
पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादामध्ये आणि या देशांतर्गत अस्तित्वात असलेल्या दहशतवादामध्ये जे फरक आहेत ते असे-
१. पाकिस्तानातून येणारा दहशतवादी स्वतःच्या विचारांसाठी आपला जीव गमवायला आणि आपले घर उध्वस्त होऊ द्यायला तयार असतो. भारतातला white collared दहशतवादी स्वतःचा आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव सुरक्षित ठेऊन लिविंग रूम आणि ऑफिसेस मधून घराबाहेर दहशतवाद पसरवतो. 
२. पाकिस्तानातून येणारा दहशतवादी एका शत्रू राष्ट्राला हानी पोहोचवतो. भारतातला white collared दहशतवादी स्वतःचाच देश आणि समाज यांना हानी पोहोचवतो.
एक साम्य मात्र असंही दिसतं की जसं पाकिस्तान सरकार दहशतवादाला पाठबळ देऊन state sponsor of terrorism होतं, तसंच भारतात देशांतर्गत दिसणाऱ्या दहशतवादातही state sponsoered असल्याची बरीच लक्षणं दिसतात.
समारोप
तर स्वतःला सुजाण आणि शांतताप्रिय म्हणवून घेणाऱ्या भारतीय समाजाने फेसबुक, ट्विटर आणि  WhatsApp ग्रुप्समध्ये एकमेकांना चांगुलपणाचे सर्टिफिकेट देऊन स्वतःच स्वतःचे अनुमोदन करणे काही काळ थांबवून आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी ते पहिले पाऊल आहे. तसे न करणारे इतिहासाच्या पुनरावृत्तीने शापित असतात. १९९२, २००२ आणि आता २०२० ही त्याचीच सिद्धता आहे.
0 notes
nileshkorade · 6 years
Text
The ‘Swinging’ Indian Media
The ‘Swinging’ Indian Media
Hi Folks
Sharing my past and current observations about how Indian media swings its position to ride the wave of public sentiment, of course, primarily to push its TRPs up and possibly also because of their individual ideological leaning. These factors drive reporting when there’s clear lack of ethics and morality. 
In 2014, in run up to the then general elections, I noticed a certain period when Times Now had changed its position from being fairly neutral to being pro-BJP. Before the change, Arnab, who was the main host on the channel, was a prime target of Modi bhakts and the BJP for trolling. After the change, he became one of their favorites. The change was, of course, soothing for him and he decided to continue to exploit public sentiment as he looked to give a head start to his new venture Republic TV. Similarly, some time after times now changed its position in 2014, Zee news changed to be pro-Right Wing too. The particular instance I remember that removed any ambiguity in my mind about their opportunist and unethical reporting is when Subhash Chandra announced that Zee media channels wouldn’t be covering the 2017 Champions Trophy match between India-Pakistan that was to be played in England, in support of the Indian Armed Forces. This was post the reported surgical-strikes by Indian Forces in Pakistan-Occupied-Kashmir. The strikes lead to the nationalist wave becoming further intense and it made lot of business sense for such media houses which fundamentally lack ethics and morality to make use of it. Basically everyone wanted to ride on the Modi-wave and feed into the utterly non-sensical and dangerous notion of nationalism that the BJP and its non-political ideologues were promoting. Of course, no one can take you for a ride unless you allow them to. So the BJP and its associates can manipulate public sentiment and through it other systems like media and news purely because the intellectually incapable and communalist population blinded by religion that India has allows it to do so. One must admit that such an environment also makes it difficult for the news and media companies to report fairly as people give a lift to those who report in line with their beliefs (pro-Modi and BJP and critical of Congress in this case) and penalize others by means of boycott and social media assault. This is particularly very severe towards those those media and news outlets who dare to objectively criticize the popular government and/or are supportive of the opposition.
Let’s come back to the current. The question is- why am I writing this today? The reason is that for the past week or so I have been seeing the same change of position of some media outlets, albeit in the opposite direction this time. Times Now is changing its position to move away from BJP and more towards a neutral position. I suspect this is because they see the receding popularity of the government and the BJP and perhaps feel the future does not belong to them, at least in the near term. And perhaps they also see that, should the BJP lose  2019 general elections and fail to come to power, those who have been unfairly siding with them will have to pay the price by loss of credibility and  inviting wrath and some legal actions from the new government. And I anticipate more media houses to follow suit by changing/adjusting their positions as we approach the elections.
The point of writing this blog is to make the readers aware of the biased and partisan views that the Indian media routinely presents and their vested interests and compulsions behind doing so. One should also realize that we bear equal responsibility in easing the compulsion on them by creating an environment where media outlets are incentivized instead of penalized for honest reporting. We will be able to do so if we remind ourselves that as citizens endlessly waiting for a livable, fair and at least reasonably developed society, our objective is not to help our favoured political party come to power, but it is to support and encourage everything that is good for our society and democracy and discard anything that is harmful. And we need to do this regardless of the political party it comes from.
~NK
0 notes