Tumgik
#एअरपोर्ट
bharatlivenewsmedia · 2 years
Text
VIDEO | झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, एकनाथ शिंदे मुंबईत, एअरपोर्ट ते सागर बंगला, कडेकोट बंदोबस्त, 30 गाड्यांचा ताफा!
VIDEO | झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, एकनाथ शिंदे मुंबईत, एअरपोर्ट ते सागर बंगला, कडेकोट बंदोबस्त, 30 गाड्यांचा ताफा!
VIDEO | झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, एकनाथ शिंदे मुंबईत, एअरपोर्ट ते सागर बंगला, कडेकोट बंदोबस्त, 30 गाड्यांचा ताफा! एकनाथ शिंदे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले असून या दोघांमध्ये तेथे काही महत्त्वाची चर्चा होईल. यानंतर दोघेही राजभवनाच्या दिशेने जातील. मुंबईः महाराष्ट्रातील सत्तांतराचं महानाट्य घडवून आणणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तब्बल दहा दिवसानंतर मुंबईत दाखल झाले. विधान…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
1000 क्रिकेटपटूंचे भवितव्य धोक्यात! पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या सांताक्रूझ येथील मुंबई क्रिकेट मैदानावर खेळाडूंना बंदी - 1000 क्रिकेटपटूंचे भविष्य धोक्यात! पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे या खेळाडूंच्या 'कर्मभूमी'मध्ये प्रवेशावर बंदी
1000 क्रिकेटपटूंचे भवितव्य धोक्यात! पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या सांताक्रूझ येथील मुंबई क्रिकेट मैदानावर खेळाडूंना बंदी – 1000 क्रिकेटपटूंचे भविष्य धोक्यात! पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे या खेळाडूंच्या ‘कर्मभूमी’मध्ये प्रवेशावर बंदी
मुंबईतील सांताक्रूझ येथील ‘लोकप्रिय’ एअर इंडिया ग्राउंड, जे पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांसारख्या टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचे घर आहे, ते यापुढे इच्छुक क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध नसेल. यामुळे सुमारे 1000 प्रतिभावान क्रिकेटपटूंचे भविष्य धोक्यात आले आहे. हे मैदान मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या मालकीच्या क्रीडा संकुलाच्या आत आहे. ते गेल्या वर्षी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स…
Tumblr media
View On WordPress
0 notes
anupnarayan · 6 months
Text
61 देशों के मुख्य न्यायाधीशों व न्यायाधीशों का लखनऊ आगमन  
  अमौसी एअरपोर्ट पर होगा भव्य स्वागत लखनऊ,  सिटी मोन्टेसरी स्कूल द्वारा 3 से 7 नवम्बर तक आयोजित ‘विश्व के मुख्य न्यायाधीशों के 24वें अंतर्राष्ट्रीय सम्मेलन’ में प्रतिभाग हेतु 61 देशों के 250 से अधिक मुख्य न्यायाधीश, न्यायाधीश व अन्य प्रख्यात हस्तियाँ आज लखनऊ आ रहे हैं। इन गणमान्य हस्तियों ने कल नई दिल्ली स्थित राष्ट्रपिता महात्मा गाँधी की समाधि ‘राजघाट’ पर श्रद्धासुमन अर्पित किये एवं इसके उपरान्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
awakenedbahujan · 1 year
Text
*👉ये लोग रेल, तेल, भेल, बीमा, बैंक, जंगल, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन व देश के करोडो लोगो के खून पसीने एक कर कमाई किये हुए पैसो मे से सभी चीजो पर टैक्स देने से बने सारे के सारे सरकारी संस्थानो को बेचते बेचते..*
*आज वो हमारे घर तक आ गये है, अर्बननाइजेशन के नाम पर आज SC/ST की जमीन ले रहे है कल OBC यो के घरो पर भी कब्जा करेंगे..*
*धीरे धीरे देश बामनवादी व्यवस्था की तरफ जा रहा है, जहाँ सिर्फ और सिर्फ एक ही प्रकार के लोगो के पास सभी प्रकार की सब सुख संपदा होगी, सोचिए अब आगे आपको क्या करना है, आंदोलन से जुडना है या अब भी देर है❓*
#Join_बामसेफ_भारतमुक्तिमोर्चा
#BanEVM #EVM_हटाओ_लोकतंत्र_बचाओ #BanEVM_SaveDemocracy #BanEVM_SaveFarmers
Tumblr media
0 notes
mmulnivasi · 1 year
Photo
Tumblr media
*👉ये लोग रेल, तेल, भेल, बीमा, बैंक, जंगल, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन व देश के करोडो लोगो के खून पसीने एक कर कमाई किये हुए पैसो मे से सभी चीजो पर टैक्स देने से बने सारे के सारे सरकारी संस्थानो को बेचते बेचते..* *आज वो हमारे घर तक आ गये है, अर्बननाइजेशन के नाम पर आज SC/ST की जमीन ले रहे है कल OBC यो के घरो पर भी कब्जा करेंगे..* *धीरे धीरे देश बामनवादी व्यवस्था की तरफ जा रहा है, जहाँ सिर्फ और सिर्फ एक ही प्रकार के लोगो के पास सभी प्रकार की सब सुख संपदा होगी, सोचिए अब आगे आपको क्या करना है, आंदोलन से जुडना है या अब भी देर है❓* #Join_बामसेफ_भारतमुक्तिमोर्चा #BanEVM #EVM_हटाओ_लोकतंत्र_बचाओ #BanEVM_SaveDemocracy #BanEVM_SaveFarmers https://www.instagram.com/p/Cp3KEuvsaZf/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
hinduactivists · 1 year
Text
तुर्की में भूकंप की तबाही के बाद, भारत सबसे पहले मदद भेजने वाले देशों में शामिल रहा। जिसके बाद तुर्की एअरपोर्ट पर हिंदी में लिखे इस मैसेज को डिस्प्ले पर दर्शाया जा रहा है। जिसमें लिखा है
"इस मुश्किल समय में हमारा साथ देने के लिए धन्यवाद।"
#turkey #turkeyearthquake #türkiye #instanbulairport #earthquake
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 February 2023
Time : 07.10 AM to 07.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 February 2023
Time : 07.10 AM to 07.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
राज्य विधीमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, नऊ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प
सोलापूरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला ५१२ किलो कांद्याचे दोन रुपये देणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित,
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहरांच्या नामांतरापाठोपाठ आता जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया सुरू - देवेंद्र फडणवीस
सरकारच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार
अधिवेशनास उपस्थित राहण्यासंदर्भात शिवसेनेचा सर्व ५५ आमदारांना पक्षादेश
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकष आणि दरांमध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर शहरात आजपासून दोन दिवसीय G-20 जागतिक परिषदेच्या W-20 ची प्रारंभिक बैठक, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्घाटन
पुण्यातल्या कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ५० टक्के मतदान
वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा शंकर महादेवन यांच्या  गायनानं आज समारोप
आणि
महिला टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विजेतेपद
सविस्तर बातम्या
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं सकाळी ११ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नऊ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम उभं राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. विरोधी पक्षाकडून होणाऱ्या आरोपांबाबत बोलताना, विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ते म्हणाले..
Byte…
घटनाबाह्य सरकार घटनाबाह्य सरकार अरे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्वय, घटना आहे. नियम आहे, कायदे आहेत. आणि निवडणूक आयोगाने शिवसेना अधिकृत पक्ष, धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आम्हाला दिलं. सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही. याचा अर्थ तुमच्या बाजुने निकाल दिला की ते चांगल, तुमच्या विरोधात निकाल दिला की ते वाईट. असं कसं काय दुटप्पी भूमिका तुम्ही घेऊ शकता? त्यामुळे वैफल्यग्रस्त ते झालेत सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे. कसंय आरोप करतांना त्याला थोडे पुरावे पाहिजेत, काहीतरी तथ्य पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हो आपल्याला आरोप करायला काय कुणीही आरोप करू शकतो त्याला काही अक्कल लागत नाही.
सोलापूरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला ५१२ किलो कांद्याचे दोन रुपये देणाऱ्या व्यापाऱ्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहरांच्या नामांतरापाठोपाठ जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया सुरू असून, महसूल विभागाला त्याबाबत अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले..
Byte…
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे जे दोन नावं आहेत याप्रमाणे केंद्र सरकारने त्याला बदलण्याची मान्यता दिली आहे. ती मान्यता दिल्यानंतर महसूलचा आपला कायदा आहे, त्या कायद्यानुसार, आपल्याला नोटीफिकेशन काढावं लागतं. ते नोटीफिकेशन आज किंवा उद्या निघेल. आणि मग ज्याला आपण औरंगाबाद जिल्हा म्हणायचं तो छत्रपती संभाजीनगर जिल्हा होईल. तसंच धाराशिवचं देखील आहे. तालुका जिल्हा आणि नगरपालिका या तिन्हीची अधिसूचना निघून त्याठिकाणी तो बदल होईल. हे झाल्यानंतर आम्ही एअरपोर्ट ॲथॉरिटीला कळवू. रेल्वे ॲथॉरिटीला कळवू. मग ते त्यांच्या सिस्टीममध्ये बदल करतील.
दरम्यान, सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुंबईत विधान भवन परिसरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, जिल्हा वार्षिक योजनेकडे सरकारचं दुर्लक्ष, जाहिरातींवर करदात्यांच्या पैशातून उधळपट्टी, आदी मुद्यांवरून पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली. विधीमंडळात विविध आयुधांचा वापर करून हे प्रश्न सरकारला विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांची काल विरोधी पक्षनेत्यांनी राजभवनात सदिच्छा भेट घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
****
दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात शिवसेनेनं सर्व ५५ आमदारांना पक्षादेश- व्हिप बजावला आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भात हा व्हिप असून, उद्धव ठाकरे ��टातल्या आमदारांनाही हा व्हिप बजावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या सूचनेनुसार व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांविरुद्ध पुढील दोन आठवडे  कोणतीही कारवाई करणार नसल्याचं शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितलं.
****
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी - एस डी आर एफ साठी केंद्र सरकारनं निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या सुधारणा २०२५-२६ पर्यंत लागू असतील. तसंच या निर्णयांची अंमलबजावणी एक नोव्हेंबर २०२२ पासून होणार आहे. यामध्ये ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये, ६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास अडीच लाख रुपये आदींचा समावेश आहे.
जळगांव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी ७११ कोटी १७ लाख ५६ हजार  रुपयांच्या सुधारित खर्चास काल या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या अंतर्गत ६५० खाटांचे रुग्णालय आणि १५० विद्यार्थी क्षमतेचं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात आजपासून G-20 जागतिक परिषदेच्या W-20 बैठकीला प्रारंभ होत आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन होणार आहे. G20 चे शेर्पा अमिताभ कांत, W20 च्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह G20 चे माजी अध्यक्ष या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असतील.
छत्रपती संभाजीनगर इथं होत असलेली W20 प्रतिनिधींची ही प्रारंभिक बैठक आहे. बैठकीच्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या बैठकीनंतर W20 समूहाच्या राजस्थानात जयपूर इथं १३ आणि १४ एप्रिलला तसंच तमिळनाडूत महाबलिपुरम् इथं १५ आणि १६ जूनला बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आजपासून सुरू होत असलेल्या प्रारंभिक बैठकीत पाच प्राधान्य क्षेत्रावर चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बैठकीत सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची पाच गटात विभागणी केली असून, हा प्रत्येक गट दोन दिवसांत एकेका प्राधान्यक्षेत्रावर चर्चा करणार असल्याचं पुरेचा यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या…
Byte…
भारताच्या अध्यक्षतेखाली डब्ल्यू ट्वेंटी ने पाच प्रायोरिटी पॉईंटस्‌ दिले आहेत. त्याच्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण, हवामानातील लवचिकता, आणि त्याच्यामधील जो काही बदल घडणार आहे, त्याच्यात महत्वाची भूमिका स्त्रीया कशा निभावणार आहेत, तळागाळातील महिला नेत्यांसाठी सक्षम परिस्थिती प्रणाली कशी तयार करता येईल त्याविषयी लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा आणि कौशल्य विंग डिजीटल विभाजन कमी करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य, याच्यासाठी महिलांसाठी मार्ग तयार करणे, आणि भारतातील महिलांद्‌वारे नेतृत्वाखाली महिलांच्या नेतृत्वातून आपला विकास व्हावा, हे महत्वाचं ब्रीदवाक्य आपल्या प्रधानमंत्रीजींनी दिलंय, त्याच्यावर आम्ही कॉन्स्नट्रेट करू.
आज या बैठकीत नॅनो, सुक्ष्म आणि स्टार्ट अप उद्योगातील महिलांचं सक्षमीकरण, महिलांच्या नेतृत्वात भारताचा विकास, महिलांच्या यशोगाथा या विषयावर परिसंवाद होणार आहेत. तर जागतिक पातळीवर महिलांशी संबंधित विषयांवर गटचर्चा होणार आहे.
दरम्यान, युरोपीय संघ आणि १९ देशांच्या सुमारे दीडशे महिला प्रतिनिधी या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहेत. या सर्व प्रतिनिधींचं पारंपरिक पद्धतीनं वाद्यांच्या गजरात, लेझीमच्या तालावर स्वागत करण्यात आलं.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या स्टॉलला तुर्कस्तानातील महिला प्रतिनिधींनी भेट दिली. यावेळी त्यांनी हातात बांगड्या भरल्या आणि मेंदी काढून घेतली. शहरात हॉटेल रामा इंटरनॅशनल आणि वेरूळ लेणी परिसरात या स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आयोजित जर्नी ऑफ एम्पॉवरमेंट - जनभागीदारी, औरंगाबादमधील महिला आणि मुलं, या विषयावरच्या चर्चासत्रात जी20 चे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महिला - पुरुष समानतेचा विषय आता जुना झाला असून, त्या ही पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, पुढच्या पिढीने वातावरणीय बदलासाठी पुढे येण्याचं आवाहन महिला प्रतिनिधींनी यावेळी केलं.
****
पुण्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काल ५० पूर्णांक ४७ टक्के मतदान झालं. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी  ही माहिती दिली. कसबा पेठ मतदार संघात ४५ पूर्णांक २५ शतांश टक्के आणि चिंचवड मतदारसंघात ४१ पूर्णांक १० दशांश टक्के मतदान झालं आहे. मतमोजणी दोन मार्चला होणार आहे.
****
कला, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या ९८ व्या भागातून देशवासियांना संबोधित करत होते. देशपातळीवर घेण्यात आलेल्या अंगाई लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धेत सहभागी कलाकारांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, त्यांच्या रचनांचाही कालच्या मन की बात मध्ये समावेश केला. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या तरुण कलाकारांच्या सांगितिक क्षेत्रातल्या योगदानाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. यामध्ये महाराष्ट्रातले वारकरी कीर्तनकार संग्रामसिंह सुहास भंडारे यांचाही समावेश आहे.
ई संजीवनी अॅपच्या माध्यमातून १० कोटींहून अधिक रुग्णांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपचार मिळाल्याबद्दल डॉक्टर आणि रुग्णांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. डिजिटल इंडिया, स्वच्छता, टाकाऊतून टिकाऊ यासह अनेक मुद्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरु असलेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा आज पद्मश्री शंकर महादेवन यांच्या गायनानं समारोप होत आहे. या महोत्सवात काल तबला वादक अमित चौबे आणि मुकेश जाधव यांच्या साथीत उस्ताद सुजात हुसेन यांचं सतार वादन, पद्मश्री शिवमणी यांचं ड्रम वादन, रवी चारी यांच सतार वादन, संगीत हल्दीपूर यांचं पियानो, सेल्वा गणेश यांचं खंजीर वादन, सेल्डॉन डिसिल्वा बास गिटार तर अदिती भागवत यांचं कथ्थक नृत्य सादरीकरण झालं. आज शेवटच्या दिवशी या महोत्सवात संगीता मुजुमदार यांच्या एम स्टेप ग्रुपचं कथ्थक सादरीकरण तर  नील रंजन मुखर्जी यांचं गिटार वादन होणार आहे.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री, दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नांदेड इथं आयोजित संगीत शंकर दरबार महोत्सवात काल दुसऱ्या दिवशी  कल्याण अपार यांचं शहनाई वादन झालं. या कार्यक्रमात सीताभाभी राममोहनराव यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंडित नयन घोष यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. शंकर दरबारचे आयोजक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना, या सोहळ्यास  गर्दी नव्हे तर दर्दीं रसिकांची हजेरी असल्याचं नमूद केलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कविता दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं दोन विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा 'कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्यपुरस्कार' कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांना, प्रदान करण्यात आला. तर हिंगोली इथले प्रसिद्ध कवी प्राध्यापक विलास वैद्य यांना जाहिर झालेला 'कवयित्री लीला धनपलवार काव्यपुरस्कार' प्रकृती अस्वस्थामुळे घरपोच प्रदान करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं.
****
धाराशिव शहराचे माजी उपनगराध्यक्ष यशपाल प्रल्हादराव सरवदे यांचं काल पुणे इथं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दलित पॅंथरचे महाराष्ट्राचे सरचिटणीस तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून काही काळ ते कार्यरत होते. धाराशिव इथल्या नागबोधिनी रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते तसंच धाराशिवच्या विकासात्मक चळवळीतील अग्रणी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
****
ऑस्ट्रेलियानं महिला टी20 विश्वचषक पटकावला आहे. दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं दिलेलं १५७ धावांचं लक्ष्य पार करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित षटकात १३७ धावाच करु शकला. ऑस्ट्रेलिया महिला संघानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं नांदेड मार्गावरील मालेवाडी पाटी परिसरात काल राज्य परिवहन मंडळाची बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणासह वृद्धाचा मृत्यू झाला. ७० वर्षीय शिवाजी शिंदे आणि त्यांचा २२ वर्षीय नातू श्रीनिवास शिंदे अशी या दोघांची नावं असून, ते पालम तालुक्यातले रहिवासी होत.
****
हिंगोली शहरात मुख्य बाजारपेठेतल्या हिंद प्रिंटीग प्रेस आणि संगणकाच्या दुकानाला काल संध्याकाळी भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशामन दलानं शर्थीचे प्रयत्न केले असून आगीच कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 
****
0 notes
chandramurty · 1 year
Text
॥राग बिलावल, द्रुत ताल में निबद्ध॥
130 करोड़ रुपये की आबादी वाला देश महंगाई से जूझ रहा।हालाँकि महंगाई तो सिर्फ़ एक मानसिक अवस्था है पर आटे का भाव 40 रुपये प्रति लीटर देख कर लोगों कि काँपें टांग रही हैं ।
लोगों का क्या, ठंड से भी डर रहे, जब कि हज़ारों बार कहा गया कि भईया, डरो मत, अभय मुद्रा की ओर देखो।पर वे पराली जला कर आग ताप ही रहे।
वैसे मैं तो अब मैं रहा नहीं।मैं तो हूँ ही नहीं।मैंने ख़ुद को मार लिया है।अब तपस्वियों के देश में पुजारियों का क्या काम?
पांडवों ने तो ना नोट बंदी करायी, ना GST लगाया, तभी विभिन्न धर्मावलंबी उनके साथ थे।और कौरव तो ख़ाकी हाफ़ पैंट पहन सिर्फ़ शाखा-शाखा खेल रहे थे।
एक और इमोशनल बात बोल रहा..एक अल-सुबह मैं अर्द्ध-रात्रि को जाग गया था।और देश के बारे में सोचने लगा। मैं देश को जानना चाहता था, जैसे एक प्रेमी अपनी प्रेमिका को जानना चाहता है। फिर मज़ा आया और ये मज़ा मैं सारे देश को देना चाहता हूँ।
मैंने देखा कि देश में कोई किसी का दुश्मन नहीं। बाघ-बकरी एक ही घाट पर चाय पी रहे।कुत्ते-बिल्ली, हाथी-घोड़े,गाय-भैंस,यहाँ तक की सुअर भी आये थे पर उनको कोई नहीं मार रहा था। सब सुख-शांति थी।
पर राजस्थान के हर बच्चे कोअंग्रेज़ी की opportunity मिलनी चाहिए। इसलिये उन्हें हिन्दी सिखाना है, जिससे कि वे सारे world से communicate कर पायें और अमेरिका में भारत का झंडा उखाड़ा जा सके ।
जैसे अमेरिका के एक शिकंजी बनाने वाले ने कोका-कोला बना डाला था, होंडा और टोयोटा नाम वाले मैकेनिकों ने होंडा और टोयोटा कार बना दी थी, वैसे ही मैं भी चाहता हूँ कि जब चीन में कोई आदमी जूता ख़रीदे तो उस पर “मेड इन भोपाल” लिखा हो।पर क्या हमारे किसी ढाबे वाले ने अभी तक कोका-कोला बनायी है??
सूट-बूट की सरकार तो बस देश को बेचने में लगी है और हमारे दो-तीन पूँजीपति देश को ख़रीदने में लगे हैं।35000 करोड़ एकड़ ज़मीन तो एक ही पूँजीपति को दे दिए गए हैं ।
हमें गुजरात की महिलाओं से ताक़त लेनी चाहिए। क्यो कि उन्होंने अपना दूध दिया है अमूल को। अब चाँद पर भी किसानों को जमीन दी जाएगी। बहुत सारे एअरपोर्ट बनेंगे और किसान सीधे वहां जायेंगें वहीं पर अपना माल बेचेंगे।
अगर जनता अब भी नहीं जागी तो सारे देश में फिर से अहिंसा फैल जायेगी।
पर क्या अब इस जवाब का कोई सवाल है??
0 notes
Text
उज्जैन महाकाल कोरीडोर पहुंचने के उपाय
उज्जैन महाकाल कोरीडोर पहुंचने के उपाय
उज्जैन के महाकालेश्वर मंदिर स्थित महाकाल कोरीडोर जाना बहुत सरल है। उज्जैन रेलवे स्टेशन से महाकाल कोरीडोर की दूरी लगभग 04 किलोमीटर है। उज्जैन रेलवे स्टेशन से महकाल लोक अथवा महाकाल कोरीडोर तक जाने के लिए सभी प्रकार के वाहन उपलब्ध होते है। जो भी श्रद्धालु रेल की यात्रा कर उज्जैन के महाकालेश्वर मंदिर के दर्शन के लिए आते है। वे उज्जैन के मुख्य रेलवे स्टेशन से ऑटो रिक्शा से या फिर ई-रिक्शा से या फिर निजी टैक्सी से या फिर सार्वजनिक वाहन आदि माध्यमों के द्वारा महाकालेश्वर मंदिर तक 20 से 25 मिनट में पहुंच सकते है। सभी प्रकार के वाहनों का किराया न्यूनतम होता है। उज्जैन नगर रेल मार्ग के द्वारा सम्पूर्ण भारत से जुड़ा हुआ है। उज्जैन के आसपास के मुख्य रेलवे स्टेशनों को देखा जाए तो हम पांएगे कि बड़े रेलवे स्टेशनों में उज्जैन के पूर्व में भोपाल रेलवे स्टेशन स्थित है। जिसकी उज्जैन से दूरी 300 किलोमीटर है, जिसकी यात्रा में लगभग औसत 3 घण्टे 30 मिनट का समय लगता है। भोपाल रेलवे स्टेशन से देशभर में जाने वाली लगभग सभी बड़ी रेल गुजरती है। भोपाल से उज्जैन की यात्रा के लिए प्रत्येक तीन घण्टे के अंतराल पर एक रेलगाड़ी अवश्य उपलब्ध रहती है। 
इसके अलावा उज्जैन से मक्सी के रास्ते होते हुए शाजापुर की ओर से बीना के रास्ते से भी रेलगाड़ी की यात्रा की जा सकती है। यह रेल लाईन उज्जैन को भारत के उत्तरी भाग से जोड़ने का काम करती है। उज्जैन के महाकालेश्वर मंदिर जाने के लिए उज्जैन के पश्चिम की ओर से भी रेल लाईन उज्जैन को बाकी भारत से जोड़ती है। रतलाम एवं नागदा से उज्जैन की ओर आने वाली रेल लाईन उत्तर में जम्मू-कश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान से लेकर से लेकर दक्षिण में महाराष्ट्र, तमिलनाडु, कर्नाटक, केरेला तक उज्जैन को सीधे जोड़ती है। इंदौर से चलकर उज्जैन से होते हुए अनेक रेल गाड़ियां उज्जैन को भारत के विभिन्न शहरों से जोड़ते हुए पूर्व में नेपाल की सीमा तक जाती है। महाकालेश्वर मंदिर में बने महाकाल कोरीडोर को देखने के लिए भारत के किसी भी कोने से रेल मार्ग के द्वारा सरलता से पहुंचा जा सकता है। भारत के विभिन्न भागों से उज्जैन की रेलयात्रा को 04 से 36 घण्टे में पूरा किया जा सकता है।
                                                उज्जैन रेल मार्ग के साथ ही सड़क मार्ग से भी भारत के सभी बड़े शहरों से सीधे जुड़ा हुआ है। उज्जैन के पूर्व में 40 किलोमीटर की दूरी पर देवास शहर स्थित है जहां से आगरा-मुंबई राष्ट्रीय राजमार्ग गुजर रहा है। जो उज्जैन को भारत के उत्तर से पश्चिमी भाग से जोड़ता है। इसके अलावा उज्जैन के उत्तर में 60 किलोमीटर की दूरी पर आगर शहर स्थित है जहां राजस्थान के झालावाड़ से होते हुए जयपुर तक की यात्रा की जा सकती है। इसी के साथ उज्जैन के पश्चिम की ओर से रतलाम के रास्ते मंदसौर नीमज होते हुए गुजरात तक सड़क मार्ग से जुड़ा हुआ है। इसी के साथ इंदौर के रास्ते खंडवा के आगे महाराष्ट्र तक उज्जैन दक्षिण के विभिन्न क्षेत्रों से सीधे जुड़ा हुआ है। उज्जैन, भारत के अनेकों स्थान से सड़क मार्ग से जुड़ा हुआ है। जिसके द्वारा भारत के विभिन्न क्षेत्रों में रहने वाले महाकाल के भक्त महाकालेश्वर मंदिर में दर्शन के लिए आ सकते है। तथा महाकाल बाबा के दर्शन कर स्वयं को आनंदित कर सकते है। 
उज्जैन के महाकालेश्वर मंदिर तक केवल रेल मार्ग अथवा सड़क मार्ग से ही नहीं पहुंचा जा सकता है। अपितु उज्जैन के महाकालेश्वर मंदिर तक वायु मार्ग से पहुंकर भी बाबा महाकाल के दर्शन का आनंद लिया जा सकता है। उज्जैन के निकट इंदौर शहर में एअरपोर्ट स्थित है। जो कि वायु मार्ग के द्वारा भारत के विभिन्न क्षेत्रों से जुड़ा हुआ है। इंदौर के एअरपोर्ट से उज्जैन के महाकालेश्वर मंदिर तक की सड़क मार्ग से यात्रा में केवल 40 से 45 मिनट का समय लगता है। इंदौर के अतिरिक्त भोपाल में भी एअरपोर्ट स्थित है। जो कि उज्जैन में महाकालेश्वर मंदिर दर्शन के लिए आगने वाले विदेशी दर्शनार्थियों के लिए उपयुक्त स्थान होता है। इंदौर एवं भोपाल शहर से अंतर्देशीय उडा़नो के साथ साथ अंतरराष्ट्रीय भी उड़ानों का परिचालन भी किया जाता है। 
                                                  भारत के विभिन्न क्षेत्रों से रेल, सड़क एवं वायु मार्ग से बाबा महाकाल के दर्शन के लिए आने वाले श्रद्धालुओं को अब उज्जैन मे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग के साथ-साथ महाकाल लोक के दर्शन का भी अवसर मिल सकेगा। महाकालेश्वर मंदिर के पश्चिम की ओर महाकाल कोरीडोर का निर्माण किया गया है। जिसकी लम्बाई 900 मीटर से अधिक है। महाकाल कोरीडोर में विशाल गलियारे का निर्माण किया गया है। महाकाल कोरीडोर के गलियारे की दिवार पर विभिन्न भित्तिचित्रों का निर्माण किया गया है। महाकाल कोरीडोर का निर्माण राजस्थान के लाल पत्थरों से हुआ है। महाकाल कोरीडोर की लम्बाई बनारस के काशी कोरीडोर से तीन गुना अधिक है। महाकाल मंदिर के पश्चिम दिशा की ओर रूद्र सागर के आसपास महाकाल कोरीडोर का निर्माण किया गया है। 
                                                     महाकाल कोरीडोर में 199 मूर्तियों को स्थापित किया गया है। जो शिवमहापुराण के विभिन्न प्रसंगों को दर्शाने का काम कर रही है। महाकाल कोरीडोर में भारत का पहला नाईड गार्डन भी बनाया गया है। सूर्यास्त के बाद इस नाईट गार्डन की सुंदरता देखते बनती है। महाकाल कोरीडोर में रक्षासूत्रों से निर्मित एक विशाल शिवलिंग स्थापित किया गया है। रक्षासूत्रों से बना विशाल शिवलिंग नंदी द्वार के मध्य स्थित है। महाकाल कोरीडोर का एक छोर महाकाल मंदिर से लगा हुआ है तो वही दूसरा छोर नंदी द्वार पर स्थित है। नंदी द्वार से एक बार में लगभग 30 हजार से अधिक श्रद्धालु महाकाल कोरीडोर में प्रवेश कर सकते है। 
                                                    महाकाल कोरीडोर भारतीय अर्थव्यवस्था की दृष्टि से भी महत्वपूर्ण है। उज्जैन के महाकालेश्वर मंदिर पर बना महाकाल कोरीडोर स्थानीय अर्थतंत्र के साथ ही राष्ट्रीय अर्थव्यवस्था को भी गति देने का काम करेगे। भारत के विभिन्न क्षेत्रों से महाकालेश्वर मंदिर के महाकाल कोरीडोर के दर्शन हेतु हजारों श्रद्धालुओं का आगमन उज्जैन में होगा। जिनके ठहरने-रहने, भोजन आदि की व्यवस्था हेतु रोजगार स्रजन की आवश्यकता होगी। महाकाल कोरीडोर के बनने के बाद स्थानीय रोजगार में वृद्धि के साथ ही अर्थव्यवस्था में भी गति आएगी।
                                                    श्रद्धालु बाबा महाकालेश्वर के साथ महाकाल कोरीडोर का आनंद भी ले सकेंगे। इसके अतिरिक्त दर्शनार्थी उज्जैन में स्थित विभिन्न देव स्थानों के दर्शन का लाभ भी ले सकेंगे। महाकालेश्वर मंदिर के ठीक पीछे की ओर मां हरसिद्धि विराजमान है। भारत में स्थित 51 शक्तिपीठों मे से एक मां हरसिद्धि शक्तिपीठ है। जहां माता सती की कोहनी गिरी थी। इसके अतिरिक्त चिंतामण गणेश मंदिर, कालभैरव मंदिर, मंगलनाथ मंदिर, सांदीपनि आश्रम, गढकालिका मंदिर, नवग्रह शनि मंदिर आदि पूरातन महत्व के तीर्थ स्थान उज्जैन में स्थित है। जिनके दर्शन के लिए भी समय-समय पर लोग उज्जैन की यात्रा पर आते है और स्वयं के साथ जगत कल्याण का काम करते है।
0 notes
Text
Airport Authority of India AAI ITI, Diploma & Degree Apprentice Online Vacancy 2022 I भारतीय एअरपोर्ट अथोरिटी आई.टी.आई., डिप्लोमा अपरेंटिस भर्ती
Airport Authority of India AAI ITI, Diploma & Degree Apprentice Online Vacancy 2022 I भारतीय एअरपोर्ट अथोरिटी आई.टी.आई., डिप्लोमा अपरेंटिस भर्ती
Airport Authority of India AAI Engagement of ITI, Graduate/Diploma Apprentices  Exam Form 2022 Airports Authority of India, Regional Headquarter (Northern Region) is inviting applications for Apprenticeship Training Program in Northern Region for the year 2022-23. During the period of Apprenticeship, the candidates are governed by Apprentices Act 1961 (as amended in 1973 and till date) and…
View On WordPress
0 notes
radiohimalayan · 2 years
Text
लामो समयदेखि लुम्बिनीमा थन्किएका बिजुली बस आजदेखि सञ्चालनमा
लामो समयदेखि लुम्बिनीमा थन्किएका बिजुली बस आजदेखि सञ्चालनमा
काठमाडौँ, असोज १३ । लामो समयदेखि लुम्बिनीमा थन्किएका बिजुली बस आजदेखि सञ्चालनमा आएका छन् । दशैँको अवसर पारेर लुम्बिनी विकास कोषले आजदेखि विद्युतीय गाडीको अफिसियल यान्त्रिक परीक्षण स्वरुप सञ्चालनमा ल्याएको हो । लुम्बिनी विकास कोषका उपाध्यक्ष अवधेशकुमार त्रिपाठी, प्रमुख जिल्ला अधिकारी भरतमणि पाण्डे, कोषका कोषाध्यक्ष सिद्विचरण भट्टराईले शुभारम्भ गर्नुभयो । पाँचवटा विद्युतीय बस लुम्बिनी एअरपोर्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
खराब हावामानामुळे चिपी एअरपोर्ट चे मुंबई विमान रद्द
खराब हावामानामुळे चिपी एअरपोर्ट चे मुंबई विमान रद्द
कँटीनही नसल्याने प्रवाशांचे झाले हाल अस्मिता गिडाळे । खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे बुधवार दि.३१ औगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजताचे विमान खराब हवामान असल्याचे कारणाने अचानक रद्द करण्यात आले.या विमानाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.याबाबत खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी विमानसेवेच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
उपनगरीय रेल्वे स्टेशन आता होणार एअरपोर्टसारखी सुसज्ज, लवकरच होणार कायापालट, करोडो रुपयांची तरतूद
उपनगरीय रेल्वे स्टेशन आता होणार एअरपोर्टसारखी सुसज्ज, लवकरच होणार कायापालट, करोडो रुपयांची तरतूद
उपनगरीय रेल्वे स्टेशन आता होणार एअरपोर्टसारखी सुसज्ज, लवकरच होणार कायापालट, करोडो रुपयांची तरतूद मुंबईतील रेल्वे स्थानकं आता एअरपोर्ट दर्जाची होणार आहेत. मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकं आता एअरपोर्ट दर्जाची होणार आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी काढलेल्या टेंडरना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील स्थानकेही आता विमानतळाप्रमाणे (Mumbai…
View On WordPress
0 notes
wikinews-in · 2 years
Text
IND vs ENG: विराट कोहली के लिए बर्मिंघम पहुंच रहे हैं लोग, फैंस को इस बात का सता रहा डर | cricket News in Hindi
IND vs ENG: विराट कोहली के लिए बर्मिंघम पहुंच रहे हैं लोग, फैंस को इस बात का सता रहा डर | cricket News in Hindi
विमल कुमार विराट कोहली के लिए पिछले तीन साल टेस्ट क्रिकेट में भले ही बल्लेबाज़ के तौर पर बेहद संघर्षपूर्ण रहे हों लेकिन इंग्लैंड की ज़मीं पर भारतीय फैंस के लिए अब भी वो उम्मीद की सबसे बड़ी किरण हैं. भारत और इंग्लैंड के बीच 1 जुलाई से टेस्ट मैच होना है. Source: News18Hindi Last updated on: June 29, 2022, 4:03 PM IST शेयर करें: मंगलवार दोपहर को जैसे मैं लंदन एअरपोर्ट में उतरकर बर्मिंघम के लिए…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samaya-samachar · 2 years
Text
‘काठमाडौँमा सोधेर प्लेन चढ्न एयरपोर्ट जानुपर्ने अवस्था अन्त्य भयो’
'The situation ended when i had to go to the airport to get to the plane asking in the first place'
संस्कृति, पर्यटन तथा नागरिक उड्डयनमन्त्री प्रेमबहादुर आलेले सुदूरपश्चिमका नागरिकले काठमाडौँमा सोधेर जहाज कति बजे आउँछ भनेर प्लेन चढ्नका लागि एअरपोर्ट जानुपर्ने दिनको अन्त्य भएको बताउनुभएको छ । कैलालीको धनगढीमा रहेको गेटा विमानस्थलमा निर्माण गरिने टर्मिनल भवन सुधार, व्यागेज हेन्डलिङ सिस्टम, वाटर फाउन्टेन, क्यानटिन र गेट निर्माणकको शनिबार शिलान्यास गर्नुहुँदै उहाँले सुदूरपश्चिमका यात्रुले प्लेन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
अनेक भाषा अवगत करा मात्र, मातृभाषेचा अभिमान बाळगून वाटचाल करा; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांचं आवाहन.
सुमारे २३ हजार कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून २५ जणांविरोधात गुन्हा दाखल.
जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यात ७० गावांमधल्या ६६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचं उद्‌घाटन.
आणि
माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही राज्य शासनाची योजना देशभर राबवण्याचा विचार सुरू - आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत.
****
अनेक भाषा अवगत करा मात्र, मातृभाषेचा अभिमान बाळगून पुढील वाटचाल करा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्येयासाठी झपाटून कामाला लागाल तरच आयुष्यात यशस्वी व्हाल, इतिहासातून प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा आदर्श ठेवला तर संस्कार निर्माण होतील, परिणामी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. देशाला विश्वगुरु करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं –
सबसे पहले जब यहां से निकलेंगे, हम इस युनिव्हरसिटी से बाहर जायेंगे, तो आज यहां से संकल्प कर के जायेंगे की हम इस देश को विश्वगुरू बनाना है। देश को सर्वश्रेष्ठ बनाना है। चारों ओर वर्ल्ड क्लास सडक बन रही है। वर्ल्ड क्लास एअरपोर्ट बन रहे है। इसके लिए इच्छाशक्ती, संकल्पशक्ती, देश आगे बढ रहा है।
परम सुपर संगणकाचे जनक विजय भटकर यावेळी उपस्थित होते. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश हे जसं आव्हान आहे तशी ती संधी असल्याचं भटकर यांनी नमूद केलं. संगणक, बायोटेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान असे आधुनिक विषय मराठीतून शिकवणं गरजेचं असल्याचं मत विजय भटकर यांनी यावेळी व्यक्त केलं. 
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना यावेळी मानद डी. लिट. पदवी कुलपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
 
पवार यांनी यावेळी बोल���ाना, मराठवाड्यात साखरेवर संशोधन करणारी राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक संस्था जालना इथं उभारण्यात येणार असून येत्या सहा महिन्यात या कामाला गती मिळणार असल्याची माहिती दिली.  
तर गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणातून विद्यार्थ्यांना नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनण्याचं आवाहन केलं. आत्मनिर्भर भारत घडवण्यात तसंच भारताला सुपर इकोनॉमिक पावर बनवण्याची शक्ती विद्यार्थ्यांमध्ये असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.
****
सुमारे २३ हजार कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयने मुंबईतल्या एका खासगी कंपनी, तसंच कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून, या आरोपींनी २८ बॅंकांच्या समूहाची २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार भारतीय स्टेट बँकेनं केली होती. त्या तक्रारीच्या आधारे संबंधित कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, संचालक, हमीदार, यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक विधानाबाबत खासदार राहुल गांधी जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा खासदार राहुल शेवाळे यांनी दिला आहे. आज मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ खासदार शेवाळे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला, त्यावेळी शेवाळे बोलत होते. शिवसेनेला सावरकरांविषयी खरोखरच आदर असेल तर त्यांनी त्वरित महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवं, असं शेवाळे म्हणाले.
****
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे. इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे. खासदार सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं.
****
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. लक्ष्मीबाईंनी देशासाठी दिलेलं अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. साम्राज्यवादाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कायम प्रेरणादायक राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
तरुणांना भारतीय वायुसेनेकडे आकर्षित करण्याचा उद्देशाने आज नागपूर इथं भारतीय वायुसेने कडून एअर फेस्ट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. वायुसेनेच्या वैमानिकांनी यावेळी चित्तथरारक हवाई कवायती सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. हवाई कवायती बघण्यासाठी नागपुरातील सुमारे ५ हजार नागरिक यावेळी सहभागी झाले होते.
****
५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचं उद्या गोव्यात दिमाखदार सोहळ्यानं उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात ७९ देशातले २८० चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून पणजी शहर चित्रपटप्रेमींनी गजबजू लागलं आहे.
****
विकास कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं, असं केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यातल्या ७० गावांमधल्या ६६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचं उद्‌घाटन आज जालना इथ दानवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय योजनांचा फायदा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी गावाचा सर्वांगिण विकास करावा, तसंच शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्याच्या माध्यमातून आथिक उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा, असा सल्ला दानवे यांनी यावेळी दिला. या पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येक कुटुंबाला ५५ लीटर पाणी दररोज मिळणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही राज्य शासनाची योजना देशभर राबवण्याच्या विचार सुरू असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते आज परांडा इथं बोलत होते. केंद्र सरकारने या अभियानाचं कौतुक केलं असून आता केंद्र सरकार हे अभियान देशपातळीवर राबवण्याचा विचार करत आहे. राज्यात या अभियानास मिळालेला प्रतिसाद पाहता देशपातळीवर हे अभियान तेवढ्याच प्रमाणावर राबवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक पथक राज्यात अभ्यासासाठी पाठवत असल्याचं सावंत म्हणाले.
या अभियानाच्या माध्यमातून साडेतीन कोटी महिलांची आरोग्य तपासणी केल्यानंतर राज्यातील सर्व महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व सरकारी कार्यालयातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं. तपासणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उपचारांवर भर दिला जाणार आहे. आजारांचे निदान झालेल्या अधिकाऱ्यांना चांगले उपचार देण्याचे प्रयत्न केले जातील. ज्या महिलांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार केले जातील, असं सावंत यांनी सांगितलं.
 
ग्रामीण भागात होणारं पहिलं महाआरोग्य शिबिर २७ नोव्हेंबरला परांडा इथं आयोजित करण्यात आलं असून, यामध्ये राज्यभरातून सहा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. सावंत यांनी परांडा इथं या शिबिराच्या तयारीचा आढावा घेतला. परंडा शहरातल्या मुख्य रस्त्याच्या कामाचं भूमिपूजनही सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात आज पहाटेपूर्वी दोन वाजून सात मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात होता. २ पूर्णांक ४ इतकी रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे परिसरात कोणतेही नुकसान झालं नाही. परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
****
शरद साखर कारखान्याच्या माध्यमातून मंत्री संदिपान भुमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला असून, या व्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
****
0 notes