Tumgik
#कंटाळा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लग्नाच्या काही वर्षांतच मॅरिड लाइफ का होते बोरिंग? या उपायांनी होईल कंटाळा दूर
लग्नाच्या काही वर्षांतच मॅरिड लाइफ का होते बोरिंग? या उपायांनी होईल कंटाळा दूर
लग्नाच्या काही वर्षांतच मॅरिड लाइफ का होते बोरिंग? या उपायांनी होईल कंटाळा दूर लग्नाच्या काही वर्षातच नात्यातील नाविण्य कमी होऊ लागते आणि एक प्रकारचा कंटाळा जाणवू लागतो. या काही उपायांनी तुम्ही ते घालवू शकता. लग्नाच्या काही वर्षातच नात्यातील नाविण्य कमी होऊ लागते आणि एक प्रकारचा कंटाळा जाणवू लागतो. या काही उपायांनी तुम्ही ते घालवू शकता. Go to Source
View On WordPress
0 notes
varunrajkalse · 2 years
Text
10 habits of curious people in Marathi
10 habits of curious people in Marathi
10 habits of curious people जिज्ञासू लोकांच्या १० सवयी  “गप्प बस रे, किती प्रश्न विचारतोस!” ज्या घरात लहान मुले आहेत त्या घरातून अगदी सहज आणि सतत ऐकू येणारे हे वाक्य.. लहान मुलांना आजूबाजूच्या वातावरणाविषयी खूप कुतूहल असते आणि त्यामुळे ते सतत प्रश्न विचारत राहतात. खरं म्हणजे आपल्या सर्वांमध्येच जिज्ञासा असतेच. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण प्रश्न विचारेनासे होतो, आजूबाजूच्या वातावरणाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
srisachin · 2 years
Text
credits & curtesy to #lokmat @newspaper
2 notes · View notes
shrikrishna-jug · 2 months
Text
ढगाळ वातावरण
शेतात रोज उन्हाळी वातावरण पाहून,कंटाळा आल्यासारखं होतं.आणि ढगाळ पावसाळी वातावरणाची आठवण येत राहते.ढगाळ दिवसांत शेतावर काम करत असल्याची अनुभवून गेलेली आठवण,मी माझ्या वहीत एकदा कधी लिहून ठेवली होती ती वाचत होतो. “कधीकधी मला ढगाळ दिवस पण आवडतात त्यांचं सौंदर्य मला मोहित करतं. सर्वसाधारणपणे बरेच लोक उन्हाळी दिवसांचं कौतुक करताना दिसतात.आनंद आणि उच्च उत्साह मिळतो असं त्यांना वाटत असतं.निळ्या आकाशात…
View On WordPress
0 notes
sakhara24 · 4 months
Text
0 notes
Text
सुंदर मनाची असते आई
सुंदर मनाची असते आईकरते लहान पणी गाई गाई ।जगात असते रात्र सारीतानुल्या रे ती तुझ्या पाई । कंटाळा का कधी केला तिनेमन तिचे रे तुझ्याच ठाई ।ओठी तिच्या नव्हता शब्दकधी बोलली का तुला नाही । मोठा तू रे झालास आताआठव जरा ती तुझी आई ।लोटू नकोस दूर असे तूसांग कशाची पडली घाई ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
ऑप्टिकल इल्युजन: फक्त तीक्ष्ण डोळे असलेले लोक लपलेले प्राणी शोधू शकतील, 99% लोक अयशस्वी झाले
ऑप्टिकल इल्युजन: फक्त तीक्ष्ण डोळे असलेले लोक लपलेले प्राणी शोधू शकतील, 99% लोक अयशस्वी झाले
आज आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, त्या चित्रात काळ्या पट्ट्यांमध्ये एक प्राणी लपलेला आहे. मात्र लोकांना शोधूनही मिळत नाही. चला तर मग बघूया तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत. मग पांडा पाहिला का? प्रतिमा क्रेडिट स्रोत: फेसबुक ही कंटाळवाणी अशी गोष्ट आहे की ती क्षणार्धात प्रत्येकाच्या मनाला भिडते. तसे, जर तुम्हालाही थोडा कंटाळा येत असेल, तर आमच्याकडे एक मजा आहे. ऑप्टिकल भ्रम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
एक वेगळंच अपहरण कांड ? नववीतील मुलाने पोलिसांची केली दमछाक
एक वेगळंच अपहरण कांड ? नववीतील मुलाने पोलिसांची केली दमछाक
महाराष्ट्रात एक वेगळी घटना समोर आलेली असून अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर शाळेत न जाता इयत्ता नववीमधील एका विद्यार्थ्याने स्वतःचेच अपहरण झाल्याचा बनाव घडवून आणला मात्र या प्रकरणात पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे ही घटना उघडकीला आलेली आहे. बल्लारपूर येथील एक इयत्ता नववीमधील शिकलेला विद्यार्थी गायब झाल्यानंतर आपल्या मुलाचे कोणीतरी अपहरण केले अशी तक्रार दीनदयाळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो? या टिप्सने बूस्ट करा त्यांची काँसंट्रेशन पॉवर
मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो? या टिप्सने बूस्ट करा त्यांची काँसंट्रेशन पॉवर
मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो? या टिप्सने बूस्ट करा त्यांची काँसंट्रेशन पॉवर Parenting Tips : मुलांना अभ्यास करायला म्हटले की ते नेहमीच कंटाळा करतात. तुमचे मुलं सुद्धा करत असतील या टिप्स उपयोगी पडतील. Parenting Tips : मुलांना अभ्यास करायला म्हटले की ते नेहमीच कंटाळा करतात. तुमचे मुलं सुद्धा करत असतील या टिप्स उपयोगी पडतील. Go to Source
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
एक वेगळंच अपहरण कांड ? नववीतील मुलाने पोलिसांची केली दमछाक
एक वेगळंच अपहरण कांड ? नववीतील मुलाने पोलिसांची केली दमछाक
महाराष्ट्रात एक वेगळी घटना समोर आलेली असून अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर शाळेत न जाता इयत्ता नववीमधील एका विद्यार्थ्याने स्वतःचेच अपहरण झाल्याचा बनाव घडवून आणला मात्र या प्रकरणात पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे ही घटना उघडकीला आलेली आहे. बल्लारपूर येथील एक इयत्ता नववीमधील शिकलेला विद्यार्थी गायब झाल्यानंतर आपल्या मुलाचे कोणीतरी अपहरण केले अशी तक्रार दीनदयाळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shaharvarta11 · 2 years

shrikrishna-jug · 8 months
Text
हिंदूत्व
आज मी आणि माझा मित्र प्रभाकर, हिंदुत्वावर दिल्या जाणाऱ्या भाषणाला गेलो होतो.प्रभाकर कट्टर हिंदुत्ववादी आहे.हिंदूत्व ह्या विषयावर चर्चा,भाषण कुठेही असलं तर तो आवर्जून ऐकायला जातो.मला त्यात फारसा रस नाही.पण एकटाच घरी बसायला कंटाळा आल्यामुळे, टाईमपास करावा म्हणून त्याच्या बरोबर जायला कबूल झालो.परंतु एक माझा फायदा झाला की हे भाषण ऐकून माझ्या ज्ञानात नक्कीच भर पडली, हे मला मानावं लागेल. भाषणाची…
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 2 years
Text
मायेचा आधार
    राजू मेकॅनिकल इंजिनिअर झाला आणि आई वडीलांच्या आशीर्वादाने त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. खूप कष्ट करून आपले एक स्थान बनवले. डिझाईनमध्ये तर तो मास्टर होता. पण अनुभव नसल्यामुळे अन सरळ स्वभावामुळे व्यवसायातले छक्के पंजे त्याला जमत नव्हते. जे करायचे आहे ते ग्राहकाला व्यवस्थित समजावून सांगून सविस्तर माहिती द्यायचा. याचा फायदाही होत होता अन तोटाही. खरे तर तोटाच जास्त! कारण ग्राहकांना सर्व सविस्तर सांगितल्यामुळे ते स्वत:च एखाद्या कारागीराकडून ती वस्तू बनवून घ्यायचे. पण राजूला त्याचे काही वाटत नव्हते. जो देगा उसका भी भला और जो ना देगा उसका भी भला या तत्वावर त्याचे काम चालू होते. अर्थात स्वस्तात केलेले काम बिघडले की ते लोक राजूकडे येवून ‘गडबडीत आम्ही ते एकाकडून करून घेतले’ असे म्हणून त्याच्याकडून बिघडलेले काम सुधरवून घ्यायचे. मनात अढी न ठेवता राजू त्यांना मदत करायचा.
      त्याचे मित्र त्याला हा स्वभाव बदलायला सांगायचे. ‘असे करू नको. हातचे राखून ठेवत जा. लोकांना तुझ्या बुद्धीचे काही देणेघेणे नसते. त्यांना केवळ स्वस्तात काम पाहिजे असते.’ पण कितीही प्रयत्न केला तरी त्याला स्वत:ला बदलता येत नव्हते.
      कॉलेजच्या एका मैत्रिणीसोबत राजूने प्रेमविवाह केला. दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता, म्हणून कोर्ट मॅरेज केले. त्यामुळे दोन्ही घरे आणि नातेवाईक तुटले. शहरात जाऊन एकमेकांच्या आधाराने त्यांचा संसार सुरू झाला. कालांतराने त्यांना मुलगा झाला. प्रपंच वाढला तसे रोजचा खर्च भागवणे अवघड जावू लागले. घरभाडे, घरखर्च याचा मेळ बसवणे कठीण जावू लागले. दोघांनाही अशा परिस्थितीची सवय नव्हती, त्यात हक्काने व्यथा सांगावी असे जवळचे कुणीच नव्हते. पण त्याने हार मानली नाही. लोकांना भेटत राहिला. प्रामाणिकपणे त्यांचे काम करत राहिला. जे मिळते त्यात समाधान मानून राहू लागला. मनात चिंता मात्र होती. आजचे ठिक आहे, उद्याचे काय?
      खिशात पैसे नसले तरी तो घरी ते जाणवू द्यायचा नाही. बायकोने काही आणायला सांगितले तर लगेच कपडे घालून बाहेर जावून ती वस्तू आणून द्यायचा. त्यासाठी दुकानदाराला काय विनवणी करावी लागायची त्याचे त्यालाच माहित. पण घरी आपल्या परिस्थितीची जाणीव तो होवू द्यायचा नाही. कित्येकदा बाईक घेवून बाहेर पडायचा अन एखाद्या ठिकाणी उभी करून पायीच फिरायचा. पेट्रोल भरायला पैसे नसायचे.
      कितीही लपवत असला तरी त्याच्या बायकोच्या लक्षात येत होते. एक दिवस ती त्याला म्हणाली ‘घरी बसून खूप कंटाळा येतोय. कुठेतरी नोकरी करावी असे वाटते’. राजू म्हणाला ‘मुलगा लहान आहे, कसे काय जमेल?’ तिने त्यावर तोडगा सांगितला ‘शेजारच्या काकू पाळणाघर चालवतात, त्यांच्याकडे तो खूप आनंदाने राहतो. त्याही मला म्हणाल्या मुलाला येथे सोडून तू काही काम करायला हरकत नाही.’
      आढेवेढे घेत राजू तयार झाला. खरं म्हणजे मनातून त्याला बरे वाटले होते. तेवढाच हातभार लागला तर चांगलेच होते. दुसर्‍या दिवशी एका गॅस एजंसीमध्ये तो बायकोला घेवून इंटरव्ह्यूला गेला. खूप गर्दी होती पण तिला नोकरी मिळाली. महिना तीन हजार पगार होता. तेवढे तर तेवढे. निदान घरखर्चाचा ताण तर कमी होणार होता म्हणून ते दोघे राजी झाले. सधन कुटुंबात वाढलेली, कधी घराबाहेर न पडणारी ती, परिस्थितीमुळे नोकरी करू लागली.
      रोज मुलाला शेजारी ठेवून बायकोला सोडून तो कामावर जावू लागला. कसेबसे दिवस जात होते. एक दिवस त्याला एका गृहस्थाचा फोन आला. कुणी मालपाणी साहेब होते. राजूला काही रेफरंस लागत नव्हता. काही कामासाठी त्यांनी त्याला ताबडतोब भेटायला सांगितले.
      भीत भीतच तो दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडे गेला. त्यांनी त्याचा परिचय आपल्या बायकोशी करून दिला. राजूने केलेल्या कामाबद्दल काही जणांकडून चांगल्या प्रतिक्रिया त्यांनी ऐकल्या होत्या, म्हणून त्याला बोलावले असे त्यांनी सांगितले. राजूला खूप बरे वाटले. त्यांनी एका नवीन मशीनची त्याला ऑर्डर दिली. त्या मशीनचे डिझाईनपासून ते मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत सर्व काम राजूलाच करायचे होते. अशी मशीन दिल्लीला तीस लाखापर्यंत मिळत होती. तेवढ्याच किमतीत त्यांनी राजूला ऑर्डर दिली अन तात्काळ त्याच्याकडे पाच लाखाचा चेक दिला.
      तो चेक हातात घेतल्यावर कितीतरी वेळ तो त्याकडे पहात बसला. त्याला खरेच वाटत नव्हते. कसली गॅरंटी नाही, साक्षीदार नाही अन त्यांनी चक्क पाच लाखाचा चेक दिला होता. त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. सौ. मालपाणींनी चहा करून दिला आणि ‘ऑल द बेस्ट’ म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या.
      घरी जात जात राजूने चेक बँकेत जमा केला. त्यापूर्वी मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढून ठेवला. एवढ्या मोठ्या रकमेचा चेक त्याला आतापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच मिळाला होता. घरी येवून त्याने  मोबाईल देवासमोर ठेवून देवाला नमस्कार केला अन लॅपटॉप उघडून लगेच कामाला लागला. त्यांच्या मागणीप्रमाणे डिझाईनचे काम सुरू केले. संध्याकाळी बायको आल्यावर आनंदाने तिला हे सर्व सांगितले. तिलाही खूप आनंद झाला. कित्येक दिवसानंतर ते दोघे मुलाला घेवून रात्री एका हॉटेलमध्ये जावून जेवले.
      आठ दिवसाच्या परिश्रमानंतर त्याला स्वत:ला समाधान वाटेल असे डिझाईन तयार झाले. गाडीला किक मारून तो मालपाणींच्या घरी गेला. त्यांना डिझाईन दाखवले. एवढ्या लवकर डिझाईन तयार झाले याचे त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनाही ते खूप आवडले अन त्यांनी मंजूरी दिली.
      तात्काळ राजू कामाला लागला. एका मित्राच्या शेडवर थोडी जागा भाड्याने घेवून त्याठिकाणी काम सुरू केले. मित्राच्या ओळखीने सर्व साहित्य उधारीवर मिळवले. तीन महिने अविश्रांत मेहनत करून मशीन तयार झाली. राजूने स्वत: आधी ट्रायल घेतली. प्रॉडक्ट काढून पाहिले. खात्री झाल्यावर मालपाणी साहेबांना बोलावले. ते दोघे पती पत्नी आले आणि त्यांनी मशीन पाहून समाधान व्यक्त केले. तिथेच मालपाणींनी त्याला उरलेल्या पैशाचा चेक दिला. शेडचे भाडे, लाईटबील, मटेरियल, लेबर, पेट्रोल इत्यादी सर्व खर्च जाऊनही राजूला चक्क दहा लाख रुपये प्रॉफिट झाला होता!
      त्या दोघांच्याही पाया पडून त्याने कृतज्ञता व्यक्त केली. दोन दिवसांनी मशीन मालपाणी साहेबांच्या फॅक्टरीत पाठवली. लवकरच त्या मशीनवर काम सुरू झाले. मशीनबाबत कसलीही तक्रार नव्हती. दिवसाला जेवढे प्रॉडक्शन आधी होत होते त्याच्या तिप्पट प्रॉडक्शन सुरू झाले होते, तेही कमी लेबरमध्ये, म्हणून मालपाणी दांपत्य खुश होते.
      राजूने मिळालेल्या पैशात एक शेड भाड्याने घेऊन काम चालू केले. काही दिवसातच मालपाणी साहेबांनी त्याला तशाच आणखी पाच मशीन तयार करायची ऑर्डर दिली. आता त्याला दिवसरात्र फुरसतच मिळत नव्हती. बाहेरूनही चांगल्या ऑर्डर्स मिळू लागल्या होत्या. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती.
      एक दिवस त्याला महाष्ट्र सरकारचे पत्र आले. त्यात त्याला ‘उत्तम तरूण उद्योजक’ पुरस्कार मिळाला आहे असे लिहिले होते. राजूला खरेच वाटले नाही. सर्व मित्रांना, बायकोला, मालपाणी साहेबांना त्याने ही आनंदाची बातमी सांगितली. ठरलेल्या दिवशी अनेक मित्र व बायको मुलासहीत तो मुंबईला गेला. राजभवनात राज्यपालांच्या हस्ते त्याला पुरस्कार देण्यात आला. आयुष्यात कधी कल्पना केली नव्हती असे सर्व घडले होते. आई-वडीलांच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले.   
परत आल्यावर राजू सर्वप्रथम बायको मुलासहीत मालपाणी साहेबांकडे गेला. त्याने तो पुरस्कार त्या उभयतांच्या हाती देवून त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला ‘या पुरस्काराचे खरे श्रेय आपलेच साहेब.’  
मालपाणी साहेब आपल्या पत्नीकडे पहात हसत म्हणाले ‘अरे हे तुझ्या श्रमाचे चीज आहे. यात आमचे काही नाही. अन पुरस्कार समर्पितच करायचा असल्यास ते तुझ्या बायकोला आणि सौ मालपाणींना  कर.’ हे ऐकून राजू अचंबित होवून एकदा बायकोकडे अन एकदा सौ मालपाणींकडे पाहू लागला. त्या दोघी गालातल्या गालात हसत होत्या.
सौ. मालपाणी म्हणाल्या ‘तुझी बायको माझ्या मैत्रिणीच्या गॅस एजंसीमध्ये काम करत होती. एक दिवस मैत्रिणीने तिची ओळख करून दिली. खूप मेहनती आहे असे सांगितले. वयाने लहान असली तरी आम्ही चांगल्या मैत्रीणी झालो. तिच्याकडून तुझ्याबद्दल कळले. आम्हाला फॅक्टरीत एक मशीन बनवून घ्यायचीच होती. मिस्टरांना तुझ्याबद्दल सांगितले. नेमके तुझे सासरे आणि माझे मिस्टर मित्र निघाले. तुझ्या सासर्‍यांनी यांच्या पडत्या काळात यांना खूप मदत केली होती. यांनी लगेच तूला बोलावून घ्यायला सांगितले. पण तुमचे अन त्यांचे संबंध ठीक नाहीत हे तुझ्या बायकोने सांगितले होते. तिच्याजवळ निरोप दिला त्यावेळी ती म्हणाली माझ्या बाबांची ओळख सांगून काम मिळाले तर ते कदाचित करणार नाहीत, म्हणून ओळख न सांगता तुम्हीच त्यांना बोला. मी वचन देते, ते तुमचे काम अगदी व्यवस्थित करतील. म्हणून आम्ही कसलीही ओळख न देता केवळ तुझ्या बायकोच्या विश्वासावर तुला काम दिले. तू त्यात खरा उतरलास.’
      राजूने आश्चर्याने बायकोकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते. राजूचे डोळेही पाणावले. काही क्षण असेच निशब्द गेले, तितक्यात आतल्या खोलीचा दरवाजा उघडला. चमकुन सर्वजण तिकडे पहात असतांनाच आतून राजूचे सासू सासरे बाहेर आले. हा तर खूपच मोठा धक्का होता! आईवडीलांना दहा वर्षानंतर पाहून राजूची बायको रडत रडतच पळत जावून त्यांना बिलगली. दोघांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले.
त्यांना उठवत सासरे म्हणाले ‘आम्ही तुमच्यावर अन तुम्ही आमच्यावर नाराज होता. मुलीसाठी अन नातवासाठी आईचा जीव तुटत होता, पण मन कचरत होते. तुमची मेहनत, धडपड, अन संसारातल्या अडचणी आम्हाला बाहेरून कळत होत्या. इच्छा असूनही आम्हाला काही करता येत नव्हते. माझा बालमित्र मालपाणीने आम्हाला जावयाचे कौतुक पाहण्यासाठी येण्याचा खूप आग्रह केला. आम्हीही मनातुन अशा संधीची वाटच पहात होतो.’ नातवाला त्यांनी कडेवर घेतले अन मालपाणींकडे पाहून म्हणाले ‘मित्रा, आज तूझ्यामुळे आम्हाला जगातले सर्व सुख मिळाले. नातवाला कडेवर घ्यायचा आनंद जगातल्या सर्वश्रेष्ठ आनंदापैकी एक आहे. एकुलत्या एक मुलीला, जावयाला अन नातवाला भेटण्यासाठी मन खूप अधीर झाले होते, पण कसे भेटावे कळत नव्हते. आज जावयाचे कौतुक पाहण्याच्या निमित्ताने तू हे सर्व घडवून आणलेस. धन्यवाद मित्रा.’
नातवाकडे पहात ते पुढे म्हणाले ‘आम्ही तुमच्यासाठी अजून एक गंमत आणली आहे...’ असे म्हणत ते सर्वांना घेऊन आतल्या खोलीत गेले. आतले दृश्य पाहुन तर राजूला आश्चर्याचा आणखी एक सुखद धक्का बसला! आत सोफ्यावर साक्षात त्याचे बाबा आणि आई बसले होते. त्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचे पाट वहात होते. राजू धावतच त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून धाय मोकलून रडू लागला. त्याला आणि सुनेला दोघांनी छातीशी कवटाळले. नातवाला कडेवर घेतांना तर त्यांचा आनंद ओसंडुन वहात होता. याप्रसंगी काय बोलावे कुणालाच काही समजत नव्हते.
शांततेचा भंग करत मालपाणी साहेब म्हणाले ‘तुझ्या सासर्‍याला याचे श्रेय आहे राजू. मी त्याला आग्रहाने जावयाचे कौतुक पहायला बोलावले त्यावेळी तो म्हणाला, आमच्या आधी या कौतुक सोहळ्यावर राजूच्या आईवडीलांचा अधिकार आहे. आणि स्वत: त्यांच्याकडे जावून त्याने त्यांचे मन वळवले. तेही मनातून मुलगा, सून अन नातवाला पाहण्यासाठी अधीर झाले होते. आढेवेढे न घेता लागलीच ते यायला तयार झाले.’
हे सर्व ऐकून राजूला मालपाणी दांपत्यांचे आभार कसे मानावे हेच कळेना. त्याने दोघांनाही साष्टांग दंडवत घातला. त्याला उठवत सौ. मालपाणी म्हणाल्या ‘देवाने हे सर्व घडवून आणले आहे. आम्ही फक्त निमित्तमात्र आहोत. देवाचे आभार माना आणि सुखाने नांदा.’                 
या घटनेमुळे दोन दुरावलेल्या कुटुंबाचे मिलन झाले, दुभंगलेली मने जुळली, सर्व गैरसमज दूर झाले. मायेचा आधार हा पैशापेक्षाही खूप मोठा असतो. कसल्याही अडचणीतून मार्ग काढण्याची ताकद त्यात असते. तो आधार राजूला अन त्याच्या बायकोला तब्बल दहा वर्षानंतर लाभला होता...     
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
मो. ९४२२२७८३१०                 
1 note · View note