Tumgik
#तुरुंगात माफी
marathinewslive · 2 years
Text
"जर तुम्ही खरोखरच महिलांचा आदर करत असाल तर...": बिल्किस बानो दोषींच्या सुटकेवर तेलंगणाचे नेते पंतप्रधान मोदींना
“जर तुम्ही खरोखरच महिलांचा आदर करत असाल तर…”: बिल्किस बानो दोषींच्या सुटकेवर तेलंगणाचे नेते पंतप्रधान मोदींना
केटी रामाराव यांनी पंतप्रधान मोदींना 15 ऑगस्टच्या भाषणात काय बोलले याचा अर्थ त्यांनी विचारला. नवी दिल्ली: गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेचा हवाला देत, तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव (‘KTR’) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात “महिलांचा आदर करणे” बद्दल जे बोलले होते ते “खरोखरच” विचारले. जर त्याने तसे केले असेल तर, केटीआरने आपल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 3 years
Text
tandav team apologized: Tandav Controversy: केवळ माफी नाही, सर्वांना तुरुंगात टाकणार- राम कदम - tandav controversy tandav team apologized ram kadam says only apology will not do and we will send all these to jail
tandav team apologized: Tandav Controversy: केवळ माफी नाही, सर्वांना तुरुंगात टाकणार- राम कदम – tandav controversy tandav team apologized ram kadam says only apology will not do and we will send all these to jail
मुंबई: वेब सीरीज तांडववरून (Tandav) सुरू असलेला वाद थांबताना दिसत नाही. मुंबईतील अॅमेझॉनच्या (Amazon) कार्यालयात जाऊन ५ तासांहून अधिक वेळ मिंटिंग घेऊन दबाव टाकावा लागला. त्यानंतर अॅमेझॉनला माफी मागावी लागली आहे. मात्र आता केवळ माफीने काम चालणार नाही, त्या सर्वांना आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपचे आमदार आणि प्रवक्ता राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटले आहे. (ram kadam says only…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date- 14 May 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ मे २०१७ सकाळी ६.५० ****
• कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची कामं वेळेत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार उपक्रमाला प्रारंभ. • आंदोलक शेतकऱ्यांना, पोलिस बळाचा वापर करून तुरुंगात डांबणं, म्हणजे अघोषित आणीबाणी - खासदार अशोक चव्हाण यांची टीका. • राज्यभरातले सर्व पेट्रोल पंप आठवडाभर नियमित सुरू राहणार. आणि • आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाला सुवर्णपदक. **** कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची कामं वेळेत सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल भूम इथं उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. पीक विम्यातून कर्ज खात्यात जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, पीक कर्जाचं पुनर्गठन करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावं, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टीनं खरीपपूर्व नियोजन करावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात मागे असलेल्या तालुक्यांनी जुलैपर्यंत कामं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी, हिवरा इथं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल कामांची पाहणी तसंच, जलयुक्त शिवार अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत पार्डी इथं लाभार्थी शेतकऱ्यास धनादेश वाटप, तसंच सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत हिवरा गावात पाच लाभार्थींना मुख्यमंत्र्यांनी ई-पीओएस यंत्राद्वारे  धान्यवाटप केलं. पाणी फाऊंडेशनच्या वतीनं जलसंधारण कामांतर्गत श्रमदान केलेल्या शालेय विद्यार्थी तसंच विद्यार्थींनीशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यात शिंदी या गावी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार उपक्रमाला काल प्रारंभ झाला. तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. तलाव प्रकल्पातला गाळ शेतकऱ्यांना मोफत नेता येईल, गाळ वाहून नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च शासन करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जालना जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा जाफ्राबाद तहसील कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना तसंच शाश्वत पाण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची कामं मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जाफ्राबाद तालुक्यात गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जिल्ह्यातलं आदर्श ग्राम खासगांव इथं उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात गॅस जोडणीचं वाटप करून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत, प्रधानमंत्री आवास आदी योजनांतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली. रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी कामगारांशी संवाद साधला. **** दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान, काल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला पार्डी फाट्यानजीक काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर सौम्य बळाचा वापर करत त्यांना ताब्यात घेतलं. **** भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या कथित वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भोकरदन इथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना, पोलिस बळाचा वापर करून तुरुंगात डांबणं, म्हणजे अघोषित आणीबाणीच असल्याची टीका, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत ते बोलत होते. उस्मानाबाद इथं मुख्यमंत्र्यांसमोर कर्जमाफीची मागणी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिस बळाचा वापर केल्याबद्दलही खासदार चव्हाण यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. दरम्यान, कॉंग्रेसच्या वतीनं औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दानवेंच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करून दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. हिंगोली इथंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करून दानवे यांचा निषेध केला. **** राज्यभरातले सर्व पेट्रोल पंप आठवडाभर नियमित सुरू राहणार असल्याचं, पेट्रोल वितरक संघटनेनं स्पष्ट केलं आहे. संघटनेचे राज्य सचिव अकील अब्बास यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनानं नियुक्त केलेल्या अपूर्व चंद्र समितीचा अहवाल तसंच वितरकांसोबत झालेला करार तेल कंपन्यांनी पाळला नसल्याचं सांगत, वितरक संघटनेनं रविवारी इंधनविक्री बंद ठेवण्याचा तसंच सोमवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी सहा या एकाच पाळीत इंधन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र हे दोन्ही निर्णय  संघटनेनं आता मागे घेतले असल्याचं, अकील अब्बास यांनी सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाने सुवर्णपदक पटकावलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत पुनियानं दक्षिण कोरियाच्या ली सी युंग च्युल वर ६ - २ असा विजय मिळवला. या कुस्ती स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत महिलांच्या गटात साक्षी मलिक, विनेश फोगाट, सरीता आणि दिव्या या कुस्तीपटूंनी आपापल्या गटात रौप्यपदक पटकावलं आहे. ***** क्रीडा मानसशास्त्रज्ञ तथा निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या पार्थिव देहावर काल नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी बाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. बाम यांचं परवा सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं होतं. **** आकाशवाणी वृतसेवा विभागाचे माजी प्रमुख तसंच पत्र सूचना कार्यालयाचे माजी मुख्य सूचना अधिकारी आय राममोहन राव यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. राव यांनी १९७१ मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान संरक्षण मुख्यालयात तसंच कारगील युद्धादरम्यान माहिती विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. **** औरंगाबाद इथले क्रीडा संघटक जसप्रीत भाटिया यांचं काल हैद्राबाद इथं निधन झालं. ते ४४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद इथं उपचार सुरू होते. औरंगाबादच्या क्रीडा क्षेत्रात भाटिया यांचं मोलाचं योगदान आहे.   **** नागपूर मुंबई समृध्दी महामार्गांतर्गत जालना आणि बदनापूर तालुक्यातील २५ गावातील शेतकऱ्यांच्या संपादीत होणाऱ्या जमिनील��� बाजार भावाच्या चौपट मोबदला देण्याबाबत शेतकरी हक्क आणि बचाव कृती समितीतर्फे काल मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची शेततळी, विहीरी, पक्की घरं आहेत, त्याचंही योग्य मुल्यांकन करुन मोबदला देण्यात यावा, बाधीत शेतकरी कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावुन घ्यावं, आदी मागण्याही संघटनेनं केल्या आहेत. **** शेतकरी कर्जमुक्ती, उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अनेक शेतकरी येत्या १ जूनपासून संपावर जाणार आहेत. किसान क्रांती संघटनेतर्फे काल औरंगाबाद इथं ही माहिती देण्यात आली. **** औरंगाबाद जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात मात्र पावसानं जोरदार हजेरी लावली. कन्नड, गंगापूर तालुक्यातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा परिसरात काल सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात परवा झालेल्या वादळाचा केळी पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी आज मतदान होत आहे. १८ जागांसाठी बेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. **** २०१७-१८ हे वर्ष शिक्षणाची मोहीम राबवण्यासाठी ‘तहरीके तालीम’ म्हणून साजरं करणार असल्याचं, केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत अल्पसंख्यांक विकास मंत्रालयाच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयानं गेल्या तीन वर्षात शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारवाढीच्या योजना आणि कार्यक्रम राबवून त्याचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवल्याचं त्यांनी सांगितलं. **** खत पुरवठा करणाऱ्या सहकारी तसंच खासगी कंपन्यांनी सहकारी पणन संस्था आणि शेतकऱ्यांच्या कंपन्यांना काही अटी शिथील करून खत खरेदी विक्रीची परवानगी द्यावी, असं सहकार तसंच पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सूचित केलं आहे. मंत्रालयात या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दरात खतं उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले. *****
0 notes