Tumgik
#वारकऱ्यांची
nashikfast · 2 months
Text
विल्होळीच्या वारकऱ्यांची रायगड वारी!
संदिप लामखेडे, नविन नाशिक: इतिहासामध्ये पहिल्यांदाच रायगडावरती वारकरी व धारकरी यांचा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. येथील भाऊसाहेब डांगे व सारूळ ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री किल्ले रायगड पालखी सोहळा समिती या पालखी मध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पालखी त्र्यंबकेश्वर येथून श्री किल्ले रायगडावरती महाराजांना अभिवादन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 06 February 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गोव्यात आज भारत ऊर्जा सप्ताहाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. देशाच्या या प्रगतीत ऊर्जा क्षेत्राचं योगदान मोठं आहे, देश ऊर्जा क्षेत्रात वेगानं प्रगती करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. पर्यावरणसंदर्भातल्या या महत्वपूर्ण उपक्रमासाठी गोवा हे योग्य ठिकाण असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
ओएनजीसीच्या सागरी बचाव प्रशिक्षण केंद्राचंही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. या केंद्रात आपत्कालीन परिस्थितीत कार्य करणाऱ्या दरवर्षी १० ते १५ हजार व्यक्तींना प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर त्यांनी ऊर्जा उपकरणाच्या एका प्रदर्शनालाही भेट दिली.
****
लोकसभेत आज द्रविड मुनेत्र कळघमचे खासदार टी आर बालू यांनी, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्यावर कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर काही काळ गदारोळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बालू यांनी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर पूरक प्रश्न विचारले, त्यावर मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांनी मंत्र्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. यावरुन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आक्षेप घेत, टी बालू यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून काही काळ गदारोळ करण्यात आला. 
दरम्यान, लोकसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावर आणि वित्त विधेयकावर चर्चा सुरु होणार असून, राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा पुढे सुरु राहणार आहे.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांकडे आज सक्तवसुली संचालनालय - ईडीनं छापे मारले. यामध्ये केजरीवाल यांचे स्वीय सहायक वैभव, आम आदमी पक्षाचे खासदार एन.डी. गुप्ता आणि इतर नेत्यांचा समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथल्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या निवृत्तीनाथ समाधी मंदिरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीला आजपासून प्रारंभ झाला. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संत निविदास महाराज समाधी मंदिरात महापूजा केली. यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांनी  वारीला प्रारंभ झाला. यंदाचं संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांचं ७५० वं जयंती वर्ष असल्यामुळे या पौष वारीला विशेष महत्त्व असून, वारीसाठी राज्यभरातून सहाशेहून अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्या आहेत. वारकऱ्यांसाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिका तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अन्य भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने दीडशे तर नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक या बस सेवेच्या माध्यमातून सतरा जादा बस सोडण्यात आल्या आहेत.
****
रत्नागिरी शहरातल्या शिर्के उद्यानात नगर परिषदेने उभारलेल्या श्री विठ्ठलाच्या ३० फूट उंचीच्या मूर्तीचं लोकार्पण काल संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्ति परायण माधवमहाराज शिवणीक�� यांच्या हस्ते झालं. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टने ही मूर्ती साकारली असून, उद्यानात विविध चित्रंही साकारली आहेत. पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. मूर्तीच्या लोकार्पणाआधी संध्याकाळी शहरात वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली.
****
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात काल हाय इंपँक्ट मेगा वाँटरशेड प्रकल्पासंदर्भात समन्वय कार्यशाळा घेण्यात आली. या प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड, लोहा, कंधार, मुखेड, किनवट आणि हदगाव या सहा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत भूपृष्ठावरील सिंचन सुधारणं, भूजल पुनर्भरण वाढवणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं आणि ग्रामीण लोकांचं जीवनमान सुधारणं, या हा प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
****
बीड जिल्ह्यात शासन आपल्या दारी अतंर्गत, लिडकॉम आपल्या दारी, या संकल्पनेनुसार उद्या सात फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या वतीनं कर्ज तसंच महामंडळाच्या योजनांच्या मार्गदर्शन मेळावा होणार आहे. सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहुन विविध योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन, प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात काल ही कार्यशाळा झाली.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य फेरीतला पहिला सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
mmulnivasi · 1 year
Photo
Tumblr media
माफ करा तुकोबा... तुकोबा तुम्हाला संप्रदायात यांनी राहूच दिले नाही खरे तुकोबा वारकऱ्यांना पाहूच दिले नाही कीर्तनात सांगून ज्यांनी तुम्हाला वैकुंठाला नेले त्यांनी किर्तन सोडून कीर्तनाचे धंदे चालू केले तुमचे नाव चालते यांना पण विचार चालत नाही तुमच्या बदनामीवर कुठला कीर्तनकार बोलत नाही वारकरी संप्रदाय यांनी आता धर्माला बांधला आहे भोळ्या भाविकांचा असाच यांनी खेळ मांडला आहे तुम्ही असता तर हातून यांच्या वीणा खेचला असता तुमच्या विद्रोहाने बिचारा वारकरी तर वाचला असता तुम्ही असता तर वारकऱ्यांची कमाल झाली असती तुम्हाला बोलण्याची बागेश्र्वराची मजाल झाली नसती माफ करा तुकोबा भाविक आता लाचार झाले आहे कारण हजारो मनुवादी कीर्तनकार झाले आहे -अज्ञात (at Dehu Road Pune Maharashtra) https://www.instagram.com/p/CoCoQB7MY4H/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे, दि.११: पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला जिज्ञासा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. वारकऱ्यांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून सेवेचे हे कार्य अखंडितपणे सुरू ठेवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सर परशुराम महाविद्यालयातील सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी निधी पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे, दि.११: पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला जिज्ञासा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. वारकऱ्यांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून सेवेचे हे कार्य अखंडितपणे सुरू ठेवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सर परशुराम महाविद्यालयातील सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी निधी पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samarthnews · 2 years
Text
शारदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी ; विठू माऊली जयघोषाने शहरात भक्तीमय वातावरण
शारदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी ; विठू माऊली जयघोषाने शहरात भक्तीमय वातावरण
  गौतम बचुटे/केज :- केज येथील शारदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून शहरात दिंडी काढली. आषाढी एकादशी निमित्त केज शहरातील नामांकित अशा शारदा इंग्लिश स्कुल येथील विद्यार्थ्यांनी विठू माऊली आणि वारकऱ्यांची वेशभूषा करून ग्यानबा तुकाराम आणि विठ्ठल रुखुमाईचा गजर करीत टाळ, मृदंग, पखवाज आणि भगव्या पताका घेऊन वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशात केज पंचायत समिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Eknath Shinde : निधीची कमी नाही वारकऱ्यांची सेवा महत्वाची, शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..!
Eknath Shinde : निधीची कमी नाही वारकऱ्यांची सेवा महत्वाची, शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..!
Eknath Shinde : निधीची कमी नाही वारकऱ्यांची सेवा महत्वाची, शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..! राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. आता खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातले सरकार स्थापन झाले आहे. असे असले तरी त्याच बरोबरीने नागरिकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी 24 तास उपलब्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामाबाबत कटीबध्द…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ सोलापूर : पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आषाढी एकादशीच्या अनुषंगाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
श्री संत वासुदेव महाराजांची पालखी पंढरपुरा, फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजीत भव्य दिव्य स्वागत....
श्री संत वासुदेव महाराजांची पालखी पंढरपुरा, फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजीत भव्य दिव्य स्वागत….
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला दि. 05 जुलै :- जिल्ह्यातील श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट गुरुवर्य वासुदेव महाराज श्रद्धा सागर आकोट येथून निघालेला 250 वारकऱ्यांची पैदलरवारी पालखी हभप वासुदेवराव महल्ले पाटील यांच्या मार्गदर्शनात निघाली असून तीचा 25 दिवसाचा प्रवास 650 किलोमीटर चे अंतर या पालखीने पार करून श्रद्धा सागर अकोट ते वारकऱ्यांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र पंढरपूर पर्यंत चा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान
ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान
पुणे, दि.२१ : ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
माझ्या आठवणीतील वारी.🚩🚩
दर वर्षी शेकडो लोक ही पंढरपूरची वारी करतात. पंढरपूरची वारी करणे म्हणजे आपल्या घरातून निघून पायी चालत पंढरपूरला आपल्या आवडत्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला जाणे. भरपूर मैलाचा प्रवास. पण थकेल तो वारकरी कसला. संपूर्ण प्रवासात, फक्त दोन जोडी कपडे घेऊन वाटेत मिळेल ते खाउन, रात्री जागा मिळेल तिथे पाठ टेकवून हा वारकरी हरी नामाचा जप करत फक्त पुढे चालत राहतो. प्रत्येकाच्या तनात, मनात, ह्रदयात फक्त विठ्ठल कोरलेला असतो. मी हे वर्णन कुठे वाचून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून लिहीत आहे. मी आजपर्यंत तिनदा आळंदी ते पुणे असा २५ मैलाचा (इतर वारकऱ्यांच्या तुलनेने) छोटा वारी प्रवास केलाय. खरंतर वारीची आणि माझी ओळख माझ्या शाळेमुळे, मी आठवीत असताना झाली. तेव्हा मी माझी पहिली वारी केली. त्यावेळी फार कळत नव्हतं पण आम्ही ४० लहान मैत्रीणी एवढा मोठा प्रवास करणार, तेही शाळे अंतर्गत यातच एक thrill होतं. मला आठवतंय, एका वारीला आम्ही मुलींनी वाटेतील कचरा, कागद, केळीचे सालं, plastic च्या पिशव्या हे सगळं उचलून माउलींसाठी वाट स्व��्छ केली. ८वी व ९वीत तुलनेने कमी अंतर पार केलं. १०वीत आळंदी ते पुणे अशी वारी केली. त्यानंतर २०१८ व २०१९ या दोन वर्षी देखील आळंदी ते पुणे असा प्रवास झाला. या संपूर्ण प्रवासात खूप वेगवेगळे अनुभव आले. इथे सगळेजण भेटणाऱ्या प्रत्येकाला 'माउली' अशी हाक मारतात. कारण देव कधी कुठे कसा व कुणाच्या रूपात भेटायला येईल हे सांगता येत नाही. या प्रवासात वेगवेगळ्या दिंडीतील वारकर्यांशी बोलण्याचा अनुभव देखील खूप काही सहज शिकवून गेला. एकदा एक आजी आपल्या ३ वर्षाच्या नातवाला सोबत घेऊन आलेली, कारण नातवाने सोबत यायचा हट्ट केला. आता एवढ्या प्रवासात जिथे या वयात स्वतःला सांभाळण अवघड, तिथे ही आजी आपल्या नातवाला बरोबर घेऊन आलेली. जसं जमेल तसं चालत नाहीतर नातवाला कडेवर घेऊन ही माउली पुढे चालत राहीली. एक काका घरची शेतीची सर्व कामं मार्गाला लाउन पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले. काही जणांच्या पायात फाटक्या चपला व काहींच्या पायात तर त्याही नाहीत, पण मनातील हरीभक्ती व विठुरायाला भेटायची इच्छा तेवढी दांडगी. इथे एकात्मतेचं जे दर्शन होईल ते इतरत्र कुठेही होणार नाही. गरीब - श्रीमंत, जात-पात, धर्म-पंथ, आपला- परका असा कुठलाच भेद इथे पहायला मिळणार नाही. इथे दिसतील ते फक्त भक्तीरसात न्हाऊन निघालेले हे लक्ष दशलक्ष वारकरी. उन, वारा, पाउस, दगड, चिखल, काटे, माती या कशाचीच पर्वा न करता प्रसंगी एकमेकांना मदत करत, उभारी देत ही यात्रा अखंड चालत राहते. ती थेट आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाउन थांबते. या यात्रेत वाटेत भजन, हरीनामाचा जप, कथा, मुक्कामी किर्तन असे विविध कार्यक्रम चालू असतात. वाटेतील लोकसुद्धा आपापल्या परीने जमेल तशी या वारकऱ्यांची सेवा करतात. या वर्षी जमलं तर आळंदी ते पंढरपूर, अथवा पुणे ते पंढरपूर अशी वारी करण्याची माझी मनापासून इच्छा होती. परंतु ह्या lockdown मुळे ते काही जमले नाही. माझा इतर वेळी देवावर फारसा विश्वास नाही, पण वारी म्हटलं की आवर्जून जावसं वाटतं, आणि याचं मला नेहमी आश्चर्य वाटत राहतं.
असो. वारीतील अनुभव, किस्से यासाठी हे व्यासपीठ पुरणारच नाही. बाकीचे अनुभव पुन्हा कधीतरी सांगीन. शेवटी आम्हाला शाळेत (आषाढी एकादशीच्या निमित्ताने) शिकवलेल्या व मला आवडलेल्या एका अभंगांच्या चार ओळी लिहिते आणि थांबते.
तुझी आण वाहीन गा देवराया ।
बहु आवडसि जिवांपासुनियां ॥१॥
कानडिया विठोबा कानडिया ।
बहु आवडसि जीवापासूनियां ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु राया ।
बहु आवडसि जीवांपासूनियां ॥३॥
2 notes · View notes
jagdamb · 3 years
Photo
Tumblr media
विठ्ठला दर्शनासाठी तुझ्या झाली आतुर वारकऱ्यांची स्वारी, कार्तिक एकादशीला भक्तांच्या जल्लोषात न्हाऊदे पंढरीची नगरी !! #कार्तिक_एकादशी #करवीरस्थाय (पद्मपुराणातील पांडुरंगाचे नाव) (Content © Copyrights) ®️ Jagdamb Creative Hub Pvt.Ltd. ©️ डिजिटल युगात, नो टिव टिव, ओन्ली CREATIVE !! #ekadasi #krishna #srirangam #tirumala #harekrishna #radhakrishna #lordkrishna #bhagavadgita #krishnaconsciousness #radhekrishna #radheradhe #rama #जगदंब #jagdambcreativehubpvtltd #व्यवसायवाला #lovekeshrameshkachi #pune #digitalmarathi #marathicalligraphy #hinduvyavasayik #marathivyavsayik #vyavasaywala (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CW3PJRWq0PY/?utm_medium=tumblr
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१०
Date – 30 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
मानसिकता बदलणं हा प्रगतीचा मुख्य पैलू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
`ग्रीन एक्सप्रेस-वे`मुळं औरंगाबाद ते पुणे अंतर अडीच तासांत शक्य होणार - नितीन गडकरी. 
राज्यात वारकऱ्यांची बँक उभारण्याचा मंत्री संदीपान भुमरे यांचा मनोदय.
आणि
टीट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा डाव कोसळला.
****
मानसिकता बदलणं हा प्रगतीचा एक मुख्य पैलू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये बडोदा इथं २२ हजार कोटी रुपयांच्या विमान निर्मिती प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण झालं, त्यावेळी मोदी बोलत होते. सरकारनं गेल्या आठ वर्षात कौशल्य विकासावर भर दिल्यामुळं आज उत्पादन क्षेत्रात देशानं मोठा टप्पा गाठला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. 'मेक-इन-इंडिया' आणि 'मेक-फॉर-वर्ल्ड' हा भारताचा दृष्टिकोन असेल आणि भविष्यात जगातली प्रवासी विमानंही भारतात तयार होतील आणि त्यावर `मेड इन इंडिया` असं लिहिलं जाईल, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. आगामी काळात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी संरक्षण आणि हवाई क्षेत्र हे दोन महत्त्वाचे स्तंभ असतील, असं त्यांनी नमुद केलं. उद्या सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातमधल्या केवडिया जिल्ह्यात `स्टॅच्यू ऑफ युनिटी` इथं पंतप्रधान सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण करतील.
****
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला औरंगाबाद जवळ `ग्रीन एक्सप्रेस-वे` नी जोडण्यात येणार असल्याचं केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यामुळं पुणे - औरंगाबाद प्रवास अडीच तासांत करता येणं शक्य होणार असून नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात होईल, असं त्यांनी सांगितलं. पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर स्थानिक वाहतूक आणि औद्योगिक वाहतुकीमुळं अतीभार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचा उपयोग होईल. दक्षिण भारतातून गोवा, बंगळुरू आणि कर्नाटकातले अन्य जिल्हे पुणे - बंगळुरू महामार्गे पुढे औरंगाबाद, नागपूर आणि पुढं मध्यप्रदेश आणि उत्तर भारतापर्यंत जोडलेला असेल. पुणे ते औरंगाबाद दरम्यान १२० किलो मीटर प्रतितास वेगानं सर्वाधिक आर्थिक आणि वेगवान मालवाहतूक करणारं क्षेत्र विकसित केलं जाणार आहे. यामुळं या भागातल्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
राज्यात लवकरच वारकऱ्यांची बँक उभारण्याचा मनोदय रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं आज संत स्नेह मिलन कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. मठांच्या विकासाला निधी देणार तसंच पैठण इथल्या संतपीठाला पूर्ण विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही भुमरे यांनी यावेळी दिलं. ते म्हणाले...
आपल्या वारकऱ्यांची एक बँक असली पाहिजे. तुम्ही जर पुढाकार घेतला माझी जी काही मदत असेल, ती मदत मी तुम्हाला करेल. पण एक वारकऱ्यांची बँक जर असेल तर वेळोवेळी निश्चित मदत झाल्याशिवाय राहत नाही. कोणाकडंही आपल्याला हात पसरवायचं काम पडणार नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस आपल्या हक्काची, वारकऱ्यांची बँक राहीन.
****
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं पाच लाख अनुदानातून राज्यातल्या कामगारांसाठी घरकुल बांधून देण्यात येणार असल्याची घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमांचं थेट प्रेक्षपण ‘मोदीजी की मन की बात कामगारोंके साथ’ हा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात कामगारांसाठी रुग्णालय, कामगार भवन, आणि कामगार क्रीडा भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणाही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी केली. यावेळी एक हजाराहून जास्त कामगार सहभागी झाले होते.
****
सातत्यानं महाराष्ट्राची दिशाभूल केली जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना, सरकारनं जबाबदारीनं वागावं, असा सल्ला दिला आहे. प्रकल्प राज्या बाहेर जात असल्यानं आपल्याला दुःख होत आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी. पंतप्रधानांबरोबर या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज आहे, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. पोलीस संग्रहालयासही राज्यपांलानी भेट दिली. संग्रहालयात मांडण्यात आलेल्या सुरूवातीपासून आतापर्यंतच्या पोलीस व्यवस्थेतील बदलांची त्यांनी यावेळी माहिती घेतली. राज्यपालांनी यावेळी पोलीसांच्या स्मृतीला नमन करुन आदार व्यक्त केला.
****
प्रसिद्ध तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्तं ११ डिसेंबर रोजी भारतीय भाषा उत्सव साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय भाषा समितीनं घेतला आहे. याबाबतचं परिपत्रक आणि संकल्पनापत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या अनुषंगानं विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारतीय उत्सव साजरा करण्याचे निर्देश देशातल्या सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना दिले आहेत.
****
येत्या एक नोव्हेंबरपासून, राज्यातून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातमीपत्राच्या वेळांमधे काही बदल होणार आहेत. त्यानुसार, आ��ाशवाणी पुणे केंद्रावरुन प्रसारित होणारं सकाळचं राष्ट्रीय बातमीपत्र सकाळी ९ वाजून २० मिनिट ते साडे नऊ ऐवजी सकाळी साडे आठ ते ८ वाजून ४० मिनिटे या वेळेत प्रसारित होईल.
****
पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी यासह विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु केलेलं उपोषण आज मागं घेतलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची आज सकाळी उपोषणस्थळी भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागं घेतलं. विमा कंपनीसोबत बैठक घेऊ, तसंच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाचे पैसे लवकरात लवकर देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलं. 
****
जालना - तिरूपती साप्ताहिक विशेष रेल्वेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज हिरवा झेंडा दाखवून या गाडीला रवाना केलं. ही साप्ताहिक रेल्वे दर रविवारी आणि परतीच्या प्रवासात दर मंगळवारी धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टीट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं २० षटकांत नऊ बाद १३३ धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं ६८ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवातच डळमळीत झाली होती. दहा षटकांमध्ये संघानं पाच फलंदाज गमावून केवळ साठ धावा केल्या होत्या. आज सकाळच्या सत्रात झालेल्या अन्य सामन्यात बांगलादेशनं झिम्बाब्वेचा तीन धावांनी पराभव केला. बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत सात गडी बाद १५० धावा केल्या. सलामीवीर नजमुल हुसेन शांतोनं सर्वाधिक ७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १४७ धावाच करू शकला.
****
अमरावती शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील एक इमारत कोसळून आज पाच जणांचा मृत्यू झाला. आज दुपारी ही दूर्घटना झाली. या ठिकाणी बचाव पथकानं चौघांचे मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहेत. मदत कार्य सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही इमारत मोडकळीस आली होती, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात लिंगी शिवारात आज हाटा पोलीस पथकानं शेतात छापा टाकुन ४६ हजार २०० रुपयांच्या किंमतीची गांजाची झाडं जप्त करण्याची कारवाई केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत तालुक्यातील लिंगी शिवारात शेतकरी केशव डांगरे यांच्या कापसाच्या पिकात गांजाची झाडे संगोपन करण्यात आल्याच्या मिळलेल्या माहीतीवरून ही कारवाई करण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या औरंगाबादमध्ये विभागीय क्रीडा संकुल ते गजानन महाराज मंदीर या मार्गावर एकता दौड होणार आहे. सकाळी सात वाजता एकता दौड सुरू होईल.
****
0 notes
amhikastkar · 4 years
Text
पंढरपूरची कार्तिकी वारी यंदा नको; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांचा प्रस्ताव   
Tumblr media
[ad_1]
सोलापूर : पंढरपूरची कार्तिकी वारी येत्या २६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यातच मंदिर खुले करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे वारीसाठी होणारी वारकऱ्यांची लाखोंची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा धोका वाढू शकतो, प्रसंगी आरोग्य यंत्रणा अपुरी पडू शकते. त्यामुळे यंदा प्रतिकात्मक वारी साजरी करावी, किंबहुना वारीच भरवू नये, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत
पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत
मुंबई, दि. ७ : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन आर्थिक मदत केली. तसेच अपघातग्रस्त वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार आणि आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून समुपदेशन करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत
पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत
मुंबई, दि. ७ : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन आर्थिक मदत केली. तसेच अपघातग्रस्त वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार आणि आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून समुपदेशन करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला…
View On WordPress
0 notes