Tumgik
#मुंबई उच्च न्यायालय
marathinewslive · 2 years
Text
दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा
दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा
राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण तापू लागलं आहे. मुंबई मनपाने अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. अशात हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मात्र, तत्पूर्वी दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली नाही, तर शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा घेतील, अशी धमकी शिवसैनिकांकडून देण्यात येत होती. यावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना इशारा दिला आहे. हेही वाचा –…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
शाळांमध्ये स्वच्छ शौचालय धोरणासाठी कोणती शुभ वेळ वाट पाहत आहे? मुंबई उच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला सवाल
शाळांमध्ये स्वच्छ शौचालय धोरणासाठी कोणती शुभ वेळ वाट पाहत आहे? मुंबई उच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला सवाल
महाराष्ट्रातील मुंबई शहर, उपनगरे आणि शेजारील जिल्ह्यातील शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार 235 शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यापैकी 207 शाळांमधील स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत खराब असल्याचे आढळून आले. मुंबई उच्च न्यायालय (फाइल फोटो). प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र शाळांमधील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबाबत मी सोमवारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mwsnewshindi · 2 years
Text
पीजी प्रवेश में सेवारत डॉक्टरों के लिए 20% कोटा नियम से अधिक उम्मीदवार बॉम्बे उच्च न्यायालय का रुख करते हैं
पीजी प्रवेश में सेवारत डॉक्टरों के लिए 20% कोटा नियम से अधिक उम्मीदवार बॉम्बे उच्च न्यायालय का रुख करते हैं
महाराष्ट्र में पोस्ट-ग्रेजुएशन (पीजी) मेडिकल कोर्स में प्रवेश से पहले, कुछ उम्मीदवारों ने इन-सर्विस डॉक्टरों के लिए नए लागू किए गए 20 प्रतिशत कोटा के खिलाफ बॉम्बे हाई कोर्ट का दरवाजा खटखटाया है�� उम्मीदवारों का दावा है कि नए आरक्षण का कार्यान्वयन असामयिक है क्योंकि इसे प्रवेश प्रक्रिया शुरू होने के बाद पेश किया गया था। प्रवेश प्रक्रिया 21 सितंबर को कॉमन एंट्रेंस टेस्ट (सीईटी) सेल द्वारा सूचना…
View On WordPress
0 notes
imranjalna · 12 days
Text
पूर्व न्यायमूर्ति विकास किनगांवकर को श्रद्धांजलि Tribute to former Justice Vikas Kingaonkar
जालना: जालना जिला वकील संघ की इमारत में मंगलवार को मुंबई उच्च न्यायालय के पूर्व न्यायमूर्ति स्व. विकास रामचंद्र किनगांवकर को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की गई. इस समय जिला वकील संघ के अध्यक्ष एड विकास पिसुरे, उपाध्यक्ष एड जगदीश बडवे, एड विष्णूपंत नाईक, एड सुरेश कुलकर्णी, और एड अरविंद मुरमे ने अपने विचार व्यक्त किए. इस श्रद्धांजलि सभा में जिला सरकारी अभियोक्ता एड बाबासाहेब इंगले, वकील संघ के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 1 month
Text
एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा को लगा बड़ा झटका, फर्जी एनकाउंटर मामले में हुई आजीवन कारावास की सजा
एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा को लगा बड़ा झटका, फर्जी एनकाउंटर मामले में हुई आजीवन कारावास की सजा
Mumbai News: मुंबई के पूर्व पुलिस अधिकारी और विवादास्पद ‘एनकाउंटर स्पेशलिस्ट’ प्रदीप शर्मा को मंगलवार को एक बड़ा कानूनी झटका लगा । बंबई उच्च न्यायालय ने उन्हें 2006 में मुंबई में गैंगस्टर छोटा राजन के कथित करीबी सहयोगी रामनारायण गुप्ता की फर्जी मुठभेड़ के मामले में दोषी ठहराया और आजीवन कारावास की सजा सुना दी। उच्च न्यायालय का फैसला सत्र अदालत के पहले के फैसले के बिल्कुल उलट है, जिसने शर्मा को…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 6 months
Text
जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय अधांतरी आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त
कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित समितीचा ११ तारखेपासून छत्रपती संभाजीनगर विभागाचा दौरा
रिझर्व बँकेनं द्वैमासिक पतधोरण जाहीर;सलग चौथ्यांदा रेपो दर जैसे थे कायम
आणि
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आज एका सुवर्ण, दोन रौप्यसह सहा कांस्य पदकांची कमाई
****
शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी एक सक्षम यंत्रणा निर्माण करण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. नक्षलवादासंदर्भात उद्‌वलेल्या परिस्थितीबाबत गृह मंत्रालयानं दिल्ली इथं विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीत ते आज बोलत होते. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गडचिरोलीसारख्या भागातील नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात लवकरच ��शस्वी होऊ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नक्षलवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद थांबवण्यासाठी वित्तीय गुप्तचर विभागाचा एक संयुक्त गट तयार करून याची सखोल चौकशी करावी अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. नक्षलग्रस्त भागात रेल्वे सेवा वाढवावी, जखमी पोलिसांवर तातडीने उपचार करण्यासाठी रात्री हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मिळावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच याठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी घेतला.
****
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि अन्य समिती सदस्य येत्या ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून माहिती दिली. समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर इथं ११ ऑक्टोबरला, जालना १२ ऑक्टोबर, परभणी १६, हिंगोली १७, नांदेड १८, लातूर २१, धाराशिव २२ तर बीड इथं २३ ऑक्टोबरला सकाळी समितीची बैठक होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात तर इतर ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारित दिवशी सकाळी ११ वाजता ही बैठक होईल. जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, तसंच राष्ट्रीय दस्तावेज या बैठकीदरम्यान समितीला उपलब्ध करुन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त नसल्याची खात्री करण्यास सांगितलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती डॉक्टर आरिफ यांच्या पीठाने महाराष्ट्र वैद्यकीय आणि साहित्य खरेदी कायद्यांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दोन आठवड्यांत नियुक्ती करण्याचे निर्देश राज्याला दिले आहेत. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या दोन सरकारी रुग्णालयात दोन दिवसांत रुग्णांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृत्यूची स्वत:हून दखल घेत न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे. न्यायालयाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाच्या प्रधान सचिवांना सर्व सरकारी रुग्णालयांमधील मंजूर पदं आणि या पदांवर भरलेल्या रिक्त पदांची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.
****
भारतीय रिझर्व बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये रेपो दरात कोणताही बदल न करता, तो साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या बँकेच्या पतधोरण समितीच्या द्वैमासिक आढावा बैठकीनंतर, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज ही माहिती दिली. सलग चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. भारत जगाच्या विकासाचं केंद्र बनत असल्याचं दास यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर पाच पूर्णांक चार टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी व्यक्त केला आहे.
****
जी-20 देशांच्या संसदेच्या अध्यक्षांची नववी परिषद या महिन्याच्या १३ आणि १४ तारखेला नवी दिल्ली इथं होणार आहे. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद हे या परिषदेचं घोषवाक्य आहे. या परिषदेत ५० पीठासीन अधिकारी आरोग्य, शिक्षण, कृषी, ऊर्जा आणि हवामान बदलावर चर्चा करणार आहेत.
****
मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन होण्याची गरज भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली आहे. नागपूर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. शब्दकोश कालबाह्य होत नसून त्यात नवनवीन शब्दांची भर पडत असते. अद्ययावत शब्दकोश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत यंत्रणेने त्याची संगणकीय प्रत उपलब्ध करून दिली पाहिजे, असं मत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं. भाषेच्या संवर्धनासाठी समितीनं पुढं यावं. राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करून सर्व मेट्रो स्थानकांची नावे मराठीत करावी. मराठी भाषा अभिव्यक्तीसाठी नवीन परिभाषा निर्माण, तसेच जुना परिभाषा कोश अद्यावत करण्यावर भर द्यावा, अशा सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या.
****
चीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज २२ वं सुवर्ण पदक पटकावलं. पुरुष हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं जपानच्या संघाचा पाच एकने पराभव केला. या व्यतिरिक्त भारताने आज पाच कांस्य पदकांची कमाई केली. तिरंदाजीत महिलांच्या संघानं रिकर्व्ह प्रकारात कांस्य पदक जिंकलं. अंकिता भाकत, सिमरनजित आणि भजन कौर यांच्या चमूनं व्हिएतनाम संघाचा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये एच एस प्रणॉयनं कांस्य पदक मिळवलं. फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात अमनने, महिलांच्या ७६ किलो वजनी गटात किरणने आणि महिलांच्या ६२ किलो वजनी गटात सोनमने कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या कबड्डीच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. तर क्रिकेट मध्ये भारतीय पुरुष संघाने बांगलादेश चा नऊ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
आज भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य तर सहा कांस्य पदकं पटकावली. आतापर्यंत या स्पर्धेत २२ सुवर्ण, ३४ रौप्य तर ३९ कांस्य पदकांसह एकूण ९५ पदकं मिळवत भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर कायम आहे.
****
मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत आज सिंधुदुर्गनगरी इथं आज अमृत कलश यात्रा काढण्यात आली. जिल्ह्यातल्या सर्व आठही नागरी भागातील मातीने भरलेल्या अमृत कलशांचं सिंधुदुर्ग नगरी इथं आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत सर्व कलशांतील माती जिल्हास्तरीय कलशात एकत्रित करण्यात आली. यावेळी उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली.
****
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त धुळे शहरात अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत आज प्रभातफेरी आणि तृणधान्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी प्रभातफेरीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला.
****
टोमॅटो तसंच कांद्याचे भाव वाढलेले असताना त्यांच्यावर नियंत्रण आणणाऱ्या केंद्र सरकारने या दोन्ही पिकां���े भाव पडलेले असताना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काय उपाययोजना केल्या असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगी जिल्ह्यात पैठण तालुक्यातील लोहगाव इथं होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते.
****
वर्धा जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेली इतर मागास वर्ग-ओबीसी जागर यात्रा आज गोंदिया इथं पोहोचली. याठिकाणी बाईक रॅली काढून यात्रेचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ओबीसी जागर सभा घेण्यात आली. यावेळी भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या धाड रस्त्यावरील दुधा घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला घाटात कोसळल्यामुळे अपघात झाला. ही बस मलकापूरहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होती. दुधा घाटात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस घाटात कोसळली. परंतु, २० ते २५ फुटावर असलेल्या एका झाडात बस अडकल्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांचा जीव वाचला, मात्र १३ प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बसमधील प्रवाशांना नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
nandedlive · 8 months
Text
निवडणूक निर्णय अधिकारी/ प्राधिकृत अधिकारी पदी एडवोकेट पायल ओझा (गुरावा) यांची नियुक्ती
Tumblr media
नांदेड :- नांदेड येथील एडवोकेट पायल ओमप्रकाश ओझा उर्फ पायल विजय गुरावा यांची निवडणूक निर्णय अधिकारी/ प्राधिकृत अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव श्री डॉ. पी. एल. खंडागळे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) 2014 मधील नियम 75 व 76 मधील तरतुदीमध्ये नमूद केलेल्या कवड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे करिता नांदेड जिल्ह्यासाठी परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींचा समावेश नाम तालिकेत दिनांक 31 जुलै 2026 पर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आला असून नामतालिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या नामतालिकेत नांदेड येथील एडवोकेट पायल ओमप्रकाश ओझा उर्फ पायल विजय गुरावा यांचा समावेश आहे. तसेच एडवोकेट पायल यांची अलीकडेच लवाद अधिकारी (Arbitrator) म्हणून देखील आयुक्त, सहकार व निबंधक यांचे कार्यालयाद्वारा औरंगाबाद विभागासाठी नामतालिकेत समावेश करण्यात आला होता. एडवोकेट पायल ओझा या मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ व जिल्हा सत्र न्यायालय नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, परळी येथे प्रॅक्टिस करत असून त्या दक्षिण भारत सारस्वत समाजाचे माजी अध्यक्ष तथा वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक स्वर्गीय ओमप्रकाश कन्हैयालालजी ओझा (ओ. के. ओझा ) यांची मुलगी असून नांदेड सारस्वत समाजाचे अध्यक्ष तथा दैनिक सिंहझेपचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी रमेशचंद्र बालकिशांची गुरावा (शर्मा) यांच्या सून आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Read the full article
0 notes
knowledgenews1 · 10 months
Text
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी. (Bombay High Court Bharti 2023)
मुंबई उच्च न्यायालयात 7वी, ते 10वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी! Bombay High Court Bharti 2023 Bombay High Court Bharti 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय (BHC) येथे काही जागांसाठी नवीन पदभरती निघाली आहे. (Bombay High Court Recruitment 2023) यासाठीची अधिसूचना बॉम्बे उच्च न्यायालय यांच्या Bombayhighcourt.Nic.In या अधिक���त संकेतस्थळावर ज��री करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
famethename · 10 months
Text
एंबुलेंस टेंडर: खारिज बोली लगाने वाले की याचिका पर आज सुनवाई करेगा पटना हाई कोर्ट, सरकार ने कहा- कुछ भी गड़बड़ नहीं
पटना उच्च न्यायालय मंगलवार को एक ऐसे मामले की सुनवाई करेगा जिसमें दो बोलीदाताओं ने एक ₹पूरे बिहार में राष्ट्रीय डायल 102 आपातकालीन सेवाओं की 2,125 एंबुलेंस के बेड़े को संचालित करने के लिए 1,600 करोड़ के अनुबंध ने उनकी बोलियों की अस्वीकृति को चुनौती दी है, यहां तक ​​कि राज्य सरकार ने दावा किया कि निविदा के पुरस्कार में कोई अनियमितता नहीं थी। पटना हाई कोर्ट. (एचटी फोटो) मामले में याचिकाकर्ता मुंबई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
राजकीय आंदोलनातील खटल्यांमधून खासदार – आमदारांची सुटका नाही ; इतर आंदोलकांवरील खटले मागे घेणार
राजकीय आंदोलनातील खटल्यांमधून खासदार – आमदारांची सुटका नाही ; इतर आंदोलकांवरील खटले मागे घेणार
मुंबई : राज्यात विविध प्रश्नांवर झालेल्या राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. परंतु अशा आंदोलनातील खटल्यातून आजी-माजी खासदार व आमदार यांची सहजासहजी सुटका केली जाणार नाही. उच्च न्यायालयाच्या संमतीनंतरच खासदार व आमदारांवरील खटले मागे घेतले जाणार आहेत. इतर आंदोलकांवरील खटले मागे घेण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
मधुर भांडारकर वाढदिवस: मॉडेल प्रीती जैन यांनी मधुर भांडारकरवर बलात्काराचा आरोप केला
मधुर भांडारकर वाढदिवस: मॉडेल प्रीती जैन यांनी मधुर भांडारकरवर बलात्काराचा आरोप केला
मधुर भांडारकर वाढदिवस: मॉडेल प्रीती जैन यांनी मधुर भांडारकरवर बलात्काराचा आरोप केला ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
satta-matkas-stuff · 1 year
Text
सट्टा मटका क्या है?
सट्टा मटका का इतिहास क्या है?
सट्टा मटका आजादी के बाद शुरू हुआ जहां मुंबई में कपास कारखाने के श्रमिकों ने कपास के खुलने और बंद होने की दर पर पैसा लगाना शुरू किया जो बॉम्बे कॉटन एक्सचेंज से न्यू यॉर्क कॉटन एक्सचेंज में प्रेषित होता है। सूती मिल मजदूरों को यह खेल दिलचस्प और अमीर बनने का सबसे तेज तरीका लगता है। विकिपीडिया के अनुसार सट्टा मटका श्री रतन खत्री नाम के एक व्यक्ति द्वारा शुरू किया गया था, इसलिए हम उन्हें सट्टा मटका के संस्थापक कह सकते हैं। बाद में खेल और उनकी खेलने की प्रक्रिया को परिष्कृत किया जाता है और अन्य खेल की उत्पत्ति कल्याण मटका के नाम से हुई है। कल्याण मटका का नाम खेल के संस्थापक श्री कल्याण जी भगत के नाम से जुड़ा है। सट्टा मटका शब्द एक हिंदी शब्द है और दो अलग-अलग शब्दों से उत्पन्न हुआ है एक है सट्टा (मतलब भाग्य, भाग्य या जुआ पर निवेश) जहां अन्य मटका (मतलब एक गोल मिट्टी का बर्तन) है। आजादी के बाद की शुरुआत में कपास कारखाने के श्रमिकों को वित्तीय संकट का सामना करना पड़ रहा था और इससे उबरने के लिए वे सट्टा मटका की योजना लेकर आए ��े, जहां अगर किसी की किस्मत अच्छी है तो वे एक दिन में अमीर बन जाएंगे। बाद में यह खेल मुंबई और भारत के अन्य हिस्सों में प्रसिद्ध हो गया। एक तरफ यह खेल दुनिया भर में अपने मौद्रिक पहलू के कारण प्रसिद्ध हो रहा है, वहीं कुछ लोग इस खेल का उपयोग लोगों को धोखा देने और अवैध धन कमाने के लिए कर रहे हैं। यही कारण है कि इस खेल पर मुंबई उच्च न्यायालय ने प्रतिबंध लगा दिया है। आजकल सट्टा मटका कानूनी है या अवैध, आप जिस भौगोलिक स्थिति में रह रहे हैं, उसके आधार पर आप ही इसे सही ठहरा सकते हैं। प्रौद्योगिकी की प्रगति के साथ आजकल मटका गेम एप्लिकेशन या वेबसाइटों का उपयोग करके ऑनलाइन खेला जाता है। बाजार में 100+ से अधिक वेबसाइटें और एप्लिकेशन उपलब्ध हैं, जिनके माध्यम से आप सट्टा मटका और संबंधित गेम खेल सकते हैं।
1 note · View note
imranjalna · 21 days
Text
आचरण का नियम यानी आचारसंहिता - एड शेरखाने Rules of conduct are code of conduct - Adv Sherkhane
* आदर्श आचारसंहिता पर मार्गदर्शन शिविर संपन्न जालना: आचार संहिता को लेकर लोगों में कई तरह के भ्रम हैं, लेकिन इस शब्द का अर्थ इसी में समाहित है. किस तरह का आचरण किया जाए, इसके लिए जारी दिशा-निर्देशों को ही आचार संहिता कहते हैं. यह प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ की विधिज्ञ व बाल कल्याण समिति की अध्यक्ष एड आशा शेरखाने ने किया. फोटो: शनिवार को रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन और ग्राहक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sharpbharat · 1 year
Text
Adityapur : आदित्यपुर औद्योगिक क्षेत्र के लघु उद्योगों पर की गयी छापेमारी को लेकर उद्यमियों ने की बैठक, कड़ी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए घटना को एक दुर्भाग्यपूर्ण एवं निंदनीय बताया
आदित्यपुर : मंगलवार को एशियन पेंट्स कंपनी द्वारा मुंबई उच्च न्यायालय में दाखिल सिविल सूट के आधार पर आदित्यपुर औद्योगिक क्षेत्र के लघु उद्योगों पर किए गए छापेमारी के आलोक में बुधवार को उद्यमियों ने आपात प्रेस कॉन्फ्रेंस कर छापेमारी के बिंदुओं पर कड़ी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए इसे एक दुर्भाग्यपूर्ण एवं निंदनीय घटना बताया. लघु उद्योग भारती ने एशियन पेंट्स के ट्रेड नेम का दुरुपयोग करते हुए उत्पाद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १३ हजार ८३७ प्रकरणांचा यशस्वी निपटारा
पक्षकारांनी केले समाधान व्यक्त गोंदिया, दि.१२  : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १३ हजार ८३७ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes