Tumgik
#tarunbharatnews
dailybharat-blog · 4 years
Photo
Tumblr media
The full story👇👇.. The Indian Army on Thursday said that 76 soldiers were injured in the violent face-off with Chinese forces in eastern Ladakh’s Galwan Valley, PTI reported. The army added that 18 soldiers, who were grievously injured in the clash, were being treated at a hospital in Leh while the remaining 58 were admitted to other hospitals. The army added that none of the soldiers were in a critical condition. The clash between Indian and Chinese troops in Galwan Valley on Monday was the most violent incident between the two neighbouring countries in over 40 years. The incident marked a massive escalation of border tensions between India and China, which have been rising since May. Twenty Indian soldiers were killed in the clash and there were casualties on the Chinese side too. China has, however, not given an official count of the casualties. #indiachina #indiachinawar #followforupdates #dailybharat #historicbharat #daytodaylife #ladakhstandoff #bharatdarshan #indiannews #dailynews24 #dailynewsdigital #dailynewspaper #beupdated #tarunbharatnews #followfornews #indianewsupdates #indianewspaper #liveindia #armylover #armylovers #indianarmylovers #indianarmyofficers #armyofficer #armysoldiers #indianarmynews #liveupdates #keepsupportingme #realnewsrightnow #newspost #armylovemyself (at Ladakh, India) https://www.instagram.com/p/CBo9pB3jZap/?igshid=1hszyx07yftas
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
वॉशिंग्टनः स्वित्झर्लंडच्या दावोस येथे वार्षिक आर्थिक मंचात सहभागी होण्यासाठी 20 जानेवारी 2020 रोजी व्हाईट हाऊसमधून निघताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हावभाव केले. Washington: President Donald Trump gestures as he leaves the White House, Monday, Jan. 20, 2020, in Washington to attend the annual economic forum in Davos, Switzerland. #tarunbharatnews #donaldtrump #whitehouse #annualeconomicforum (at Washington D.C.) https://www.instagram.com/p/B7krS7BBuYD/?igshid=1ve11si7unvgh
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
आजचा सोने चांदी बाजार. दि. २१-०१-२०२० #tarunbharatnews #tbdsocialmedia #Helo वार्ताहर #सोने चांदी दर #आजचा बाजार (at Belgaum - Smart City) https://www.instagram.com/p/B7kpxaqhzNw/?igshid=k6drlgorxzam
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
अमृतकण दि. २१-०१-२०२० #tarunbharatnews #tbdsocialmedia #motivationalquotes #good thoughts #अमृतकण (at Belgaum - Smart City) https://www.instagram.com/p/B7kprkUhqBh/?igshid=j5ugwbqb7sgv
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
विचारमोती दि. २१-०१-२०२० #tarunbharatnews #tbdsocialmedia #motivationalquotes #good thoughts #विचार मोती #Helo वार्ताहर (at Belgaum - Smart City) https://www.instagram.com/p/B7kpjPlBphp/?igshid=17eh53vg7gh03
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
मंगळूर विमानतळावर बॉम्बमुळे खळबळ  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा कट उधळला : निर्जन स्थळी बॉम्ब केला निकामी प्रतिनिधी/ बेंगळूर अज्ञात व्यक्तीने ठेवलेल्या बॉम्बमुळे (टाईम बॉम्ब) सोमवारी सकाळी मंगळूरच्या बाजपे विमानतळावर खळबळ उडाली. सदर बॉम्ब सायंकाळी निर्जन स्थळी सुरक्षितपणे नेऊन स्फोट घडवून निकामी करण्यात आला. त्यामुळे संभाव्य घातपात टळला. प्रजासत्ताक दिन जवळ आलेला असतानाच विमानतळावर बॉम्ब आढळून आल्याने मंगळूर शहरात भीतीचे वातावरण होते. दरम्यान खबरदारी म्हणून राज्यातील सर्व विमानतळांवर सतर्कतेची सूचना देण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ऑटोरिक्षातून आलेल्या अज्ञात व्यक्तीने बॉम्ब असणारी लॅपटॉपची बॅग विमानतळावरील तिकीट काऊंटरजवळ सोडून दिली. 10 च्या सुमारास सदर बॅग आढळून आल्यानंतर औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी याविषयी पोलीस कंट्रोल रुमला माहिती दिली. त्यानंतर विमानतळावरील प्रवासी व इतरांना तेथून दूर जाण्याची सूचना देण्यात आली. बॅगमध्ये जिवंत बॉम्ब असल्याचा संशय बळावल्याने बेंगळूरमधील बॉम्ब निकामी पथकाला संदेश देण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ती बॅग कंट्रोल एक्पोसिव्ह डिफ्युस मशीनमधील वाहन घालून अतिमहनिय व्यक्तींची वाहने पार्किंगसाठी असलेल्या जागेत उभी केली #tarunbharatnews #bomb #bombdisposal #manglorenews #cisf #bajpeairport (at Mangalore) https://www.instagram.com/p/B7korEshrZW/?igshid=osg1wyjrdxu4
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
ब्रिटिश कंपनीकडून भारतात 4 हजार चार्जिंग स्टेशन?  देशभरात मार्च 2023 पर्यंत कार्यान्वित : 2 हजार जणांना रोजगाराची शक्यता वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ब्रिटनची इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेवा पुरविणारी कंपनी ‘ईओ चार्जिंग’ पुढील तीन वर्षात भारतामध्ये 4 हजारांपेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन निर्माण करणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये पहिल्या निशुल्क चार्जिंग स्टेशनच्या उद्घाटनाच्यावेळी  ईओ चार्जिंगची भारतातील एकमेव वितरण कंपनी याहवी इंटरप्रायजेसचे सीईओ संदीप यादव यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतातील सादरीकरणानंतर कंपनी मार्च 2023 पर्यंत देशभरात 4 हजारांपेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. मार्च 2022 पर्यंत गुजरातमध्ये 300 पेक्षा अधिक स्टेशन असतील. तर यात 40 स्टेशन एकटय़ा अहमदाबादमध्ये असणार आहेत. कंपनीने डिसेंबरपासून रितसर चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे काम हाती घेतले असून, आत्तापर्यंत देशभरात 20 स्टेशन सुरू केली आहेत. कंपनी घरगुती, मध्यम आणि मोठय़ा अशा तिन्ही प्रकारच्या चार्जिंग पॉईंटसाठी उपकरणे आणि सेवा पुरविते. बॅटरीवर चालणाऱया वाहनांसाठी आणि कंपनीच्या सेवेच्या प्रसारासाठी सुरुवातीला सर्व चार्जिंग स्टेशन निशुल्क असणार आहेत. #tarunbharatnews #britishcompany #charging #chargingstation (at New Delhi) https://www.instagram.com/p/B7knMv1B9Cy/?igshid=1hrwfi7177dzo
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
भारताची सागरी सुरक्षा अधिकच भक्कम  स्वदेशी के-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी : पाण्यातूनही पाक-चीनवर प्रतिहल्ला शक्य नवी दिल्ली / वृत्तसंस्था चीनची राजधानी बीजिंगपासून पाकिस्तानमधील सर्व शहरांना टार्गेट करू शकणाऱया स्वदेशी ‘के-4’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच भारताकडून यशस्वीपणे घेण्यात आली. जवळपास 3 हजार 500 किलोमीटर दूर पर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून ते शस्त्र घेऊन जाण्यासही सक्षम आहे. या चाचणीनंतर भारतीय सुरक्षा दले पाणबुडीमधून शत्रूंच्या ठिकाणावर लक्ष्य भेदण्यासाठी आणखी मजबूत झाली आहे. आयएनएस अरिहंत या आण्विक पाणबुडीवरून ‘के-4’ क्षेपणास्त्र पाणबुडीची चाचणी आंध्र प्रदेशच्या किनाऱयावर करण्यात आली. समुद्राच्या पाण्यातून ही यशस्वी चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करण्यात येत होते.  स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या दोन क्षेपणास्त्रांपैकी ‘के-4’ हे एक आहे. के-4 शिवाय दुसरे क्षेपणास्त्र बिओ-5 आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. ही क्षेपणास्त्रे अरिहंत वर्गातील पाणबुडीवर तैनात करण्यात येणार आहेत. 2000 किलो वजनापर्यंत शस्त्रे घेऊन जाण्याची त्याची क्षमता आहे. 12 मीटर लांब असलेले हे क्षेपणास्त्र 1.3 मीटर गोलाकार आहे. 17 टन वजन असलेल्या या क्षेपणास्त्राची 20 मीटर खोल पाण्यात हल्ला करण्याची क्षमता आहे. #tarunbharatnews #marinesafety #missile #attack #retaliation (at New Delhi) https://www.instagram.com/p/B7kmU2Nh2Qe/?igshid=mrqr877fdgc1
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात  ‘हलवा सेरेमनी’ने प्रारंभ : अर्थमंत्र्यासह अधिकारी, कर्मचाऱयांची उपस्थिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला दुसऱयांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्प दस्तावेजांच्या छपाईच्या कामाच्यापूर्वी ‘हलवा सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांच्यासह अर्थ मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. हलवा सरेमनीनंतर आजपासून अर्थसंकल्प बनविण्याच्या कामाशी संबंधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱयांना अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापर्यंत अर्थ मंत्रालयात राहावे लागणार आहे.. हलवा सेरेमनी ही एक अशी परंपरा आहे, जी बऱयाच काळापासून सुरू आहे. अर्थसंकल्पापूर्वी मोठय़ा कढईत हलवा तयार केला जातो आणि मंत्रालयातील सर्व कर्मचाऱयांना त्याचे वाटप केले जाते. या गोड पदार्थाच्या वाटपालाही एक विशेष महत्त्व आहे. मंत्रालयातील अधिकारी आणि साहाय्यक कर्मचारी मोठय़ा संख्येने या अर्थसंकल्पाच्या कामात गुंतलेले असतात त्यांना अर्थसंकल्प तयार करण्यापासून ते छपाई होऊन सादरीकरण होण्यापर्यंत आपल्या कुटुंबाच्या संपर्कात राहता येत नाही. तसेच कोणत्याही माध्यमांशी संपर्क साधता येत नाही. त्यांना एकप्रकारे नजरकैदमध्ये ठेवले जाते. #tarunbharatnews #halwaceremony #nirmalasitharaman #anuragsinghthakur (at New Delhi) https://www.instagram.com/p/B7klYcYh-yK/?igshid=12nn4c78pdkuv
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
सांबरा विमानतळावर खबरदारी  प्रतिनिधी/ बेळगाव मंगळूर विमानतळावर सोमवारी सकाळी जीवंत बॉम्ब आढळल्यानंतर बेळगावात खबरदारी बाळगण्यात आली आहे. सोमवारी सांबरा विमानतळ व रेल्वे स्थानक परिसरात श्वान पथक व स्फोटक तज्ञांनी तपासणी केली. मंगळूर विमानतळावर दहा किलोचा बॉम्ब आढळून आला होता. सायंकाळी तो स्फोटकतज्ञांनी स्फोट घडवून निकामा केला. या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरातही व्यापक खबरदारी घेण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी मारिहाळचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन��नूर यांनी विमानतळाला भेट देवून पाहणी केली. विमानतळाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले पोलीस व औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी मार्गदर्शन केले. मंगळूर घटनेच्या पार्श्वभूमीवर सांबरा विमानतळाकडे जाणाऱया वाहनांवरही पोलिसांनी बारकाईने नजर ठेवली आहे. एका अनोळखीने ऑटोरिक्षातून येवून मंगळूर विमानतळावर जीवंत बॉम्ब ठेवल्याचे उघडकीस आल्यानंतर विमानतळाकडे येणाऱया प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवण्यात येत होते. यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याशी संपर्क साधला असता बेळगाव परिसरातही खबरदारी घेण्यात आली असून मोक्मयाच्या ठिकाणी तपासणी वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. #tarunbharatnews #belgaumnews #airport #bomb #sambraairport (at Belgaum - Smart City) https://www.instagram.com/p/B7kkorvBlrk/?igshid=nw4x5el0enjt
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
देशातील अब्जाधीशांची संपत्ती वार्षिक बजेटपेक्षा अधिक  ऑक्सफेमचा अहवाल सादर : 1 टक्का अब्जाधिशांकडे 70 टक्के गरिबांपेक्षा 4 पट संपत्ती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील आर्थिक असमानतेचा अंदाज सद्यस्थितीवरून लावला जातो. ते म्हणजे फक्त एक टक्का श्रीमंतांकडे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 70 टक्के गरिबांच्या तुलनेत चार पटीने अधिक संपत्ती आहे. ऑक्सफेमकडून वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या 50 व्या वार्षिक बैठकीत ‘टाईम टू केअर’ अहवाल मांडण्यात आला आहे. देशातील सर्व अब्जाधिशांची एकूण संपत्ती देशाच्या वार्षिक बजेटपेक्षा अधिक आहे. जगातील 2153 अब्जाधिशांकडे 4.6 अब्ज लोकांपेक्षा (जगातील 60 टक्के लोकसंख्या) सर्वाधिक संपत्ती आहे, असेही या अहवालातून सांगण्यात आले आहे. जगभरातील आर्थिक असमानता तेजीने वाढत असल्याचेही या अहवालातून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी अब्जाधिशांच्या एकत्रित संपत्तीत काहीशी घट झाली आहे. मात्र, गेल्या दशकात अब्जाधिशांची संख्या दुप्पटीपेक्षा अधिक वाढली आहे. श्रीमंत आणि गरिबांमधील फरक असमानता कमी करण्याच्या धोरणांनी कमी होणार नसून, काही सरकार अशा फरकाला कमी करण्याच्या दिशेने काम करत आहेत, असे ऑक्सफेम इंडियाचे सीईओ अमिताभ बहर यांनी सांगितले.  #tarunbharatnews #timetocare #finance #oxfamindia #amitabhbahar (at New Delhi) https://www.instagram.com/p/B7kfQrDhpD-/?igshid=bbeg5hvgfsxh
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
भरदिवसा उपनगरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ   दिवसभरात सात घरफोडय़ा, चोऱया, घरफोडय़ांच्या सत्राने नागरिक चिंतातूर, बंद घरे चोरटय़ांचे लक्ष्य प्रतिनिधी/ बेळगाव उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ांच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी दिवसभरात शहापूर, विजयनगर, जयनगर, गोकुळनगर, रामतीर्थनगर परिसरात सात बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लांबविण्यात आली आहे. सोमवारी चोरटय़ांनी दिवसभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चोऱया, घरफोडय़ांच्या सत्राने एकच खळबळ माजली आहे. या चोऱयांमागे एकच टोळी कार्यरत आहे की वेगवेगळय़ा टोळय़ा सक्रिय आहेत. याचा तपास करण्यात येत आहे. चोऱयांच्या सत्राने पोलीस अधिकारीही हबकून गेले आहेत. एपीएमसी, शहापूर, माळमारुती पोलीस स्थानकात या चोरी प्रकरणांची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. भोज गल्ली, शहापूर येथील चंद्रकला मल्लाप्पा फुटाणे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बारा तोळे सोन्याचे दागिने व 13 तोळे चांदी असा एकूण पावणे तीन लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. सोमवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत. #tarunbharatnews #belgaumnews #theft #burglaries (at Belgaum - Smart City) https://www.instagram.com/p/B7kdQNGhIHS/?igshid=18kavosspwdcc
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
अजमेर बॉम्बस्फोटातील आरोपी ‘डॉ. बॉम्ब’ फरार  ऑनलाईन टीम / मुंबई : देशभरातील अनेक बॉम्बस्फोट प्रकरणात सहभाग असलेला डॉ. बॉम्ब उर्फ मोहम्मद जालीस अन्सारी काल हा अग्रीपाडा पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आलाच नाही. सध्या तो पॅरोलवर बाहेर असून, तो फरार झाला आहे. डॉ. बॉम्ब याच्या कुटुंबियांनीही तो फरार झाल्याची पोलिसात तक्रार दिली आहे. अग्रीपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 1993 मध्ये अजमेर येथील बॉम्बस्फोट प्रकरणात तो दोषी आढळला. त्यानंतर चौकशीअंती त्याचा देशभरातील अनेक बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून, सध्या तो 21 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आहे. उद्या त्याची पॅरोलची मुदत संपत आहे. यापूर्वी तो दररोज सकाळी 10 ते 12 या वेळेत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी येत होता. मात्र, कालपासून तो फरार आहे. #tarunbharatnews #attack #bombspot #mohammadansari #ajmer (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/B7an92WhSDA/?igshid=jfdp2wmskpgt
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
सिनेटमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव  वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था : प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी सिनेटला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाचे दोन दस्तऐवज गुरुवारी सोपविले आहेत. या दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी पेलोसी यांनी खासदारांना पेनचेही वाटप केले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतःच्या पदाच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले असून राष्ट्रीय सुरक्षेकडे डोळेझाक करत निवडणूक प्रक्रियेला धोक्यात आणल्याचा दावा पेलोसी यांनी यावेळी केला आहे. दस्तऐवज सोपविण्यात आल्यावर महाभियोगाच्या सुनावणीसाठी निवडण्यात आलेल्या सभागृह व्यवस्थापकाने (हाउस मॅनेजर) सिनेटच्या चेम्बरमध्ये सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांच्यावरील आरोपांचे वाचन केले आहे. पहिल्या दस्तऐवजात ट्रम्प यांच्यावर सत्तेच्या गैरवापराचा आरोप आहे. तर दुसऱया दस्तऐवजात महाभियोगाच्या सुनावणीदरम्यान संसदेच्या कामकाजात अडथळे आणल्याचा आरोप नमूद आहे. #tarunbharatnews #donaldtrump #nancypelosi #senatechamber (at Washington D.C.) https://www.instagram.com/p/B7abrGYh757/?igshid=8dvdzgzap7yi
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
इम्रान खान यांना भारत दौऱयाचे निमंत्रण शक्य नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चालू वर्षाच्या अखेरीस भारत दौऱयाचे निमंत्रण मिळणार आहे. वर्षाच्या अखेरीस शांघाय सहकार्य परिषदेचे (एससीओ) नवी दिल्ली येथे आयोजन होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने सदस्य देशाचा प्रमुख या नात्याने भारत सरकार इम्रान खान यांनाही परिषदेत सामील होण्यासाठी निमंत्रित करणार आहे. भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याची पुष्टी दिली आहे. दोन्ही देशांमधील चर्चा बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट संवाद होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. सर्वसाधारणपणे एससीओ परिषदांमध्ये विदेशमंत्री सहभागी होतात. पण काही देशांचे पंतप्रधानही यात भाग घेत आहेत. भारताच्या बाजूने शासनप्रमुखांच्या बैठकीत विदेश मंत्री सहभागी होतात. तर एससीओ राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत पंतप्रधान सामील होत असतात. पाकिस्तान एससीओचा सदस्य असल्याच्या त्याच्यावतीने भारत दौऱयावर कोण येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. #tarunbharatnews #imrankhan #visitindia #pmmodi #shanghaicooperationcouncil (at New Delhi) https://www.instagram.com/p/B7aaIZaBJYW/?igshid=12wmd62s7aimu
0 notes
tarunbharatmedia · 4 years
Photo
Tumblr media
भोपाळ: खासदार आयएएस ऑफिसर असोसिएशनतर्फे भोपाळ येथे शुक्रवार, १७ जानेवारी, २०२० रोजी आयोजित 'आयएएस सर्व्हिस मीट २०२०' दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ संबोधित करत आहेत. Bhopal: Madhya Pradesh CM Kamal Nath addresses during 'IAS Service Meet 2020,' organised by MP IAS Officers Association, in Bhopal, Friday, Jan. 17, 2020. #tarunbharatnews #ias #iasservicemeet #kamalnath #iasservicemeet2020 (at Bhopal, Madhya Pradesh) https://www.instagram.com/p/B7aYFRjB0JG/?igshid=k8mvtkz2tt5a
0 notes