Tumgik
#अधिकाऱ्यांवर
Text
रुग्णवाहिका न मिळाल्यानं मागितली भिक, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?
रुग्णवाहिका न मिळाल्यानं मागितली भिक, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?
रुग्णवाहिका न मिळाल्यानं मागितली भिक, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील धरमडोह येथील सरीता किशोर कासदेकर या महिलेचा चिमुकला दगावला. आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका व मदत मिळाली नाही. त्यामुळं अमरावतीपर्यंत मृतदेह एसटीत आणावा लागला. त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले. संबंधित डॉक्टरसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ निलंबन करा. कारवाई न झाल्यास…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
माझा अधिकाऱ्यांवर दबाव आहे पण.. , रोहित पवार काय म्हणाले ?
माझा अधिकाऱ्यांवर दबाव आहे पण.. , रोहित पवार काय म्हणाले ?
अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून सर्व सामान्य जनतेची कामे अडवणूक न होता झाली पाहिजेत त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन काम करावे लागते. त्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय सर्वांगीण विकास करता येत नसतो माझा अधिकाऱ्यांवर दबाव आहे मात्र दबाव आदरयुक्त आहे हे विरोधकांना माहीत नसावे असे प्रत्युत्तर आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना दिले आहे. काही दिवसापूर्वी विरोधकांनी रोहित पवार यांचा अधिकार्‍यांवर दबाव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
माझा अधिकाऱ्यांवर दबाव आहे पण.. , रोहित पवार काय म्हणाले ?
माझा अधिकाऱ्यांवर दबाव आहे पण.. , रोहित पवार काय म्हणाले ?
अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून सर्व ���ामान्य जनतेची कामे अडवणूक न होता झाली पाहिजेत त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन काम करावे लागते. त्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय सर्वांगीण विकास करता येत नसतो माझा अधिकाऱ्यांवर दबाव आहे मात्र दबाव आदरयुक्त आहे हे विरोधकांना माहीत नसावे असे प्रत्युत्तर आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना दिले आहे. काही दिवसापूर्वी विरोधकांनी रोहित पवार यांचा अधिकार्‍यांवर दबाव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
अंबादास दानवे यांचा आरोग अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप..
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार - विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची माहिती.
मैत्री विधेयकाअंतर्गत उद्योगांसाठी एक खिडकी योजना पारदर्शक हवी -  विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांची विधान परिषदेत मागणी.
आयएसआयएसच्या राज्यातल्या कारवायांप्रकरणी आणखी एकाला अटक.
आणि
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका आजपासून.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असल्याचं विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. आज मुंबईत विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी उपसभापती गोऱ्हे बोलत होत्या. दरम्यान, मुंबईत आझाद मैदानात गिरणी कामगारांचं आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी या बैठकीत केली.
****
राज्यात उद्योगधंद्यांच्या वाढीस चालना मिळावी यासाठी मैत्री विधेयकाअंतर्गत उद्योगांसाठी एक खिडकी योजना पारदर्शक असावी, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली. ते परिषद सभागृहात उद्योग विभागानं मांडलेल्या मैत्री विधेयकावर बोलत होते. इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यात उद्योगांना जास्तीतजास्त सवलती देण्यात याव्यात, असं दानवे म्हणाले. अन्य राज्यांत उद्योगांना लागणाऱ्या परवानग्या २४ तासांत दिल्या जातात. आपल्या राज्यात उद्योजकांना यासाठी आठ महिन्यांपर्यंत थांबावं लागतं, अशी टीका त्यांनी केली. उद्योजकांना परवानग्या काढण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अधिकारी त्यांना फेऱ्या मारायला लावतात, असा आरोप त्यांनी केला. तेलंगणा, गुजरात, राजस्थान आदी राज्यांत कशाप्रकारे उद्योगांना पोषक वातावरण दिलं जातं, त्याचा आदर्श आपल्या राज्यानं घेण्याची आवश्यकता असल्याचं दानवे यांनी नमुद केलं. राज्यात उद्योगांना वीज अतिशय महागड्या दरानं दिली जाते. आपल्या राज्यातल्या मराठी उद्योजकांवर राज्यात अन्याय होत असल्यानं उद्योग अन्य राज्यात नेले जात असल्याची टीकाही दानवे यांनी केली.
****
राज्यात सर्पदंशावरच्या औषधांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केला आहे. रायगडच्या पेण इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशावरचं औषध उपलब्ध नसल्यामुळं बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेचा बळी असल्याची टीका त्यांनी केली. सर्पदंशावरचं औषध उपजिल्हा रुग्णालयात ठेवणं सक्तीचं असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते का उपलब्ध नव्हतं याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तसंच यात बेजबाबदार आणि बेफिकीर आरोग्य अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई झाल्याशिवाय सभागृहाचं कामकाज पुढं चालवू नये, अशी मागणी थोरात यांनी यावेळी केली.
****
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करणार असून या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्या ट्विटर हॅंडलवरुन हा बदनामीकारक मजकूर प्रसारित झाला, त्याच्या चालकाची माहिती मिळण्यासंदर्भात ट्विटर इंडियाशी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला असून संबंधिताची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले.
****
राष्ट्रीय अन्वेषण संस्था- एनआयएनं दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या राज्यातल्या कारवायांप्रकरणी आज आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी राज्यातून अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवायांना प्रोत्साहन दिल्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या कोंढवा इथं छापा टाकून डॉ. अदनान अली सरकार या ४३ वर्षीय आरोपीला त्याच्या निवासस्थानी अटक करण्यात आली आहे. त्याच्या घराच्या झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयएसआयएसशी संबंधित अनेक दस्तऐवज यांसारखी अनेक अपराधी सामग्री जप्त करण्यात आली आहे. त्यावरुन त्याचे या दहशतवादी संघटनेशी असलेले संबंध आणि तरुणांना फसवून भरती करत दहशतवादी संघटनेच्या हिंसक कार्यक्रमाला चालना देण्यातली त्याची भूमिका स्पष्ट झाल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. हा आरोपी आयएसआयएसच्या कटाचा भाग म्हणून देशाच्या सरकारच्या विरोधात युद्ध पुकारात होता, असंही एनआयएतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. हवामान विभागानं पुढचे दोन दिवस नांदेड तसंच ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी नारंगी बावटा फडकवला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं लाल बावटा फडकवला आहे. त्यामुळं या भागात अती मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्हृयाच्या सर्व भागात आज दुपारीही मुसळधार पाऊस कोसळला. सिरोंचा तालुक्यातल्या प्राणहिता आणि गोदावरी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या आणि परवा सुटी जाहीर केली आहे.
****
भारतीय डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं २०१८ पासून अमेरिकेनं इथल्या डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि प्लांट कॉरंटाईन इंडिया यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून २०२२ पासून ही निर्यात बंदी उठली आहे. ती उठल्यानंतर आज प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर डाळिंबाची ४५० खोकी म्हणजे १५० किलो डाळिंब विमानानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्क इथं पाठवण्यात आलं. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापक विनिता सुधांशू यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या निर्यातीनंतर अमेरिकेतली डाळिंबाची मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्यात १४ हजार कृषी समृद्धी केंद्रांतून शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळणार असल्याचं भारताय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानातील सीकर इथं झालेल्या कृषी केंद्रांच्या लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आज नाशिक कांदा-बटाटा भवनमध्ये करण्यात आलं. यानिमित्तानं नाशिकमध्ये बावनकुळे यांच्या उपस्थितीत कृषी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांची विविध कारणांनी होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे केंद्र सर्वोत्तम पर्याय ठरणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
****
अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातल्या वडगावच्या आदिवासी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी शाळेत आज सकाळी २६ विद्यार्थ्यांना अल्पोपहारातून विषबाधा झाली. या शाळेत ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. सकाळी अल्पोपहार झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळं त्यांना तात्काळ अचलपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज बार्बाडोस इथं खेळला जाणार असून, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर शनिवारी होणार आहे. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना येत्या एक ऑगस्ट रोजी त्रिनीदाद इथं होईल.
****
उस्मानाबाद इथं आज ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व लिंगनिदान कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तसंच वरिष्ठस्तर न्यायाधीश वसंत यादव यांनी यावेळी गर्भलिंग निदान किंवा स्त्री भ्रूणाचे गर्भपात होत असेल तर याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इथं संपर्क करुन माहिती देण्याचं आवाहन केलं. जिल्हा डाँक्टर संघटना आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी या संदर्भात कठोर पावलं उचलून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी असंही ते म्हणाले.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी औरंगाबाद इथल्या केंद्रीय विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात असल्याचं विद्यालयाचे प्राचार्य अनिल यादव यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. केंद्रीय विद्यालयात पी एम श्री, विद्या प्रवेश, बालवाटिका, निपूण भारत, परख, कौशल्य विकास, पी एम इ विद्या आणि विद्यांजली पोर्टल या शैक्षणिक उपक्रमांचा समावेश आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
नगरपंचायत कार्यालयाला नगरसेवकांनी लावले कुलूप
स्थगनादेश मिळू नये यासाठी न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार, अतिक्रम आणि निकृष्ट बांधकामांविरुद्ध रोष अर्जुनी-मोरगाव : मुख्याधिकाऱयांनी शासकीय जागेवरील अतिक्रमणे व निकृष्ठ सिमेंट रस्ते बांधकामाच्या केलेल्या तक्रारीत सापत्न वागणुक दिली. या विरोधात नगरसेवकांनी गुरुवारी नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. बांधकाम सभापती व नगरसेवकांवर ही वेळ यावी याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘हो, अधिकाऱ्यांवर माझा दबाव’, कारण… विखे-पाटलांच्या आरोपावर रोहित पवारांचे उत्तर
‘हो, अधिकाऱ्यांवर माझा दबाव’, कारण… विखे-पाटलांच्या आरोपावर रोहित पवारांचे उत्तर
‘हो, अधिकाऱ्यांवर माझा दबाव’, कारण… विखे-पाटलांच्या आरोपावर रोहित पवारांचे उत्तर कर्जत जामखेडमधील अधिकार्‍यांवर दबाव असल्याचा आरोप भाजपा खासदार विखे पाटील यांनी केला होता. मात्र, सामान्य लोकांची कामे करत असताना अधिकाऱ्यांवर माझा दबाव असतोच, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. सोमवारी काटोल दौ-यासाठी नागपूर येथे आले असता माध्यमांशी बोलत होते. ते पीए नाहीत कॉर्डिनेटरआमदार एवढा काम करत असेल आणि…
View On WordPress
0 notes
journalist27 · 1 year
Text
दीपक मोहिते,
समस्याग्रस्त वसई तालुक्यातील नागरिक जगताहेत उपेक्षित जीवन,
मुंबईच्या वेशीवर असलेल्या वसई तालुक्याचे गेल्या काही वर्षात प्रचंड वेगाने नागरीकरण झाले.आजमितीस या तालुक्याची लोकसंख्या १८ ते २० लाखाच्या घरात पोहोचली आहे.
त्यामुळे या उपप्रदेशातील चार शहरे व ग्रामीण भागातील ५२ गावातील नागरिकांना योग्य प्रमाणात नागरी सुविधा मिळू शकत नाहीत.रेल्��े,परिवहन,पाणी,आरोग्य,शिक्षण,पार्किंग,
मोकळे पदपथ,अद्ययावत हॉस्पिटल,प्राथमिक आरोग्य केंद्रे व दर्जेदार वैद्यकीय सेवा इ.नागरी सुविधा येथील नागरिकांना मिळू शकल्या नाहीत.आजच्या घडीला विरार-मुंबई हा रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे.नालासोपारा,वसई व नायगाव रेल्वे स्थानकातुन प्रवाश्यांना ट्रेनमध्ये साधं शिरता येत नाही.त्यामुळे अनेक प्रवासी मृत्युमुखी पडले.तालुक्याच्या अनेक भागात पुरेसे पाणी मिळत नाही.दोन दिवस आड सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर करदाते आपली तहान भागवत आहेत.आजही पाण्याच्या टँकर्सचा सुळसुळाट सुरूच आहे.महानगरपालिका मात्र पाणीपट्टी पूर्णपणे वसूल करत असते,तर त्यांच्या मालकीच्या एकही शाळा नसतानाही भरमसाठ शिक्षणकर वसूल करते.कर देऊनही हद्दीत चालायला धड रस्ते नाहीत,प्रभावी वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.गंभीर आजारावरील उपचारासाठी लोकांना मुंबई गाठावी लागते.फेरीवाला व पार्किंग झोन नाहीत.त्यामुळे सारे पदपथ अनधिकृत फेरीवाल्यानी व्यापले आहेत.महानगरपालिका आल्यानंतर नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल,अशी अपेक्षा करणाऱ्या करदात्यांचा भ्रमनिरास झाला. महानगरपालिका स्थापन होऊन १२ वर्षे झाली पण परिस्थितीमध्ये कोणताही बदल होऊ शकला नाही.सध्या या महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे.संपूर्ण कारभार नोकरशाहीच्या ताब्यात गेला आहे.प्रशासकीय राजवटीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात हा उपप्रदेश किमान १० वर्ष मागे गेला आहे.आज या उपप्रदेशात ३० हजार अनधिकृत बांधकामे डौलात उभी आहेत.त्यावर अधून मधून कारवाई करण्याचे नाटक होत असते,पण ही बांधकामे काही थांबायचं नाव घेत नाहीत.त्यामुळे तालुक्याची ओळख दुसरी धारावी,अशी होऊ लागली आहे.त्यामुळे या महानगरपालिकेची निवडणूक लवकरात लवकर होणे,गरजेचे आहे.आज लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नाही.
Tumblr media
0 notes
loksutra · 2 years
Text
'भ्रष्ट बीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी', भाजप आमदाराने बीएमसीला पत्र लिहून मागणी केली आहे
‘भ्रष्ट बीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’, भाजप आमदाराने बीएमसीला पत्र लिहून मागणी केली आहे
भाजप आमदार नितेश राणे यांनी घाटकोपरच्या किरोळ गावातील इमारतीला दिलेल्या अर्धवट व्यावसायिक प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘आदित्य सेने’मुळे बीएमसीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याचे आमदार म्हणाले. भाजपचे आमदार नितेश राणे. प्रतिमा क्रेडिट स्रोत: (फाइल) मुंबईतील घाटकोपर येथील किरोळ गावातील एका इमारतीला आंशिक व्यवसाय प्रमाणपत्र दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे प्रश्न…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
रु. 3,000-कोटी वीज बिलामुळे कुटुंबाला धक्का बसला, ते रु. 1,300 होते
रु. 3,000-कोटी वीज बिलामुळे कुटुंबाला धक्का बसला, ते रु. 1,300 होते
मध्य प्रदेश सरकार चालवल्या जाणार्‍या वीज कंपनीने बिलासाठी “मानवी त्रुटी” असल्याचा ठपका ठेवला आहे. नवी दिल्ली: ग्वाल्हेरच्या एका रहिवाशाला 3,419 कोटी रुपयांचे धक्कादायक वीज बिल मिळाल्यानंतर मध्य प्रदेशातील सरकारी वीज कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. ग्वाल्हेरच्या शिव विहार कॉलनीतील रहिवासी असलेल्या प्रियंका गुप्ता यांना 3,419,53,25,293 कोटी रुपयांचे मासिक वीज बिल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार कंपनी, हायवे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा!
अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार कंपनी, हायवे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा!
कणकवली कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजवर गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूला महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे. गेली दोन वर्ष महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत अनेक समस्या प्रलंबित आहेत. कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिजवर महामार्गाच्या दोन्ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
सराफ विजय बिरारी मृत्यू प्रकरण : ३ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
सराफ विजय बिरारी मृत्यू प्रकरण : ३ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
नाशिक : चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून पडून मृत्यूमुखी पडलेले विजय बिरारी यांच्या मृत्यूपूर्वी नेमके काय झाले, याचा शोध राज्य अन्वेषण विभागाकडून सुरू होता. अखेर या तपासात तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकार्‍यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी तीन पोलीस अधिकार्‍यांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
'ईडी' अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची 'एसआयटी'
‘ईडी’ अधिकाऱ्यांवरील गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची ‘एसआयटी’
–अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू करणार चौकशी : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘ईडी’ अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी (SIT) नेमून चौकशी करण्यात येईल, असे सांगतानाच अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल व त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
बिडेन प्रशासन अधिक कठोर झाले, रशियन व्यावसायिक आणि पुतीनच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले गेले
बिडेन प्रशासन अधिक कठोर झाले, रशियन व्याव���ायिक आणि पुतीनच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले गेले
युक्रेन-रशिया युद्धाच्या हल्ल्याचा आज 9वा दिवस आहे. युक्रेनवरील हल्ल्याला अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देश विरोध करत आहेत. दरम्यान, अमेरिका रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादत आहे. यावर एक पाऊल पुढे टाकत राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाने रशियन उद्योगपती आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निकटवर्तीयांवर नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. पुतीन यांच्या जवळच्या मित्रांवर कारवाई करण्यात आली…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 18 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्राम पंचायतीला कार्बन उत्सर्जन नियंत्रण गटात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यू होण्याची घटना दुर्दैवी, कोणत्याही पद्धतीचं राजकारण न करण्याची पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त
उष्माघातामुळे झालेल्या मृतांची संख्या १३ वर, २० जणांवर उपचार सुरु, तर २६ जणांना रुग्णालयातून सुटी
काँग्रेस पक्षाने नेते के सी वेणुगोपाल यांची शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून आमदारांची बैठक बोलावल्याच्या वृत्ताचं खंडन
रुग्णालयात तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी रुग्णाच्या सहा नातेवाईकांना दोन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५८ हजार रुपये दंडाची नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाची शिक्षा
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर आठ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्राम पंचायतीला कार्बन उत्सर्जन नियंत्रण गटात राष्ट्रीय पंचायत पुरस्कारानं काल गौरवण्यात आलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाचं उद्घाटन आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, पंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, पाटोद्याच्या सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार सोहळ्यात राज्यातल्या पाटोद्यासह पाच ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कारानं गौरव करण्यात आला. गरिबी निर्मूलन आणि जीवनमान सुधार संकल्पनेसाठी सांगली जिल्ह्यातल्या खंडोबाची वाडी ग्राम पंचायतीला, स्वच्छता आणि पर्यावरण स्नेही संकल्पनेसाठी सांगलीतल्याच कुडाळ ग्राम पंचायतीला, महिला स्नेही उपक्रमांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अलबाड ग्रामपंचायतीला, आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार पुणे जिल्ह्यातल्या टिकेकरवाडी ग्राम पंचायतीला प्रदान करण्यात आला.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातल्या घटनेबद्दल पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ही आपल्या कुटुंबावर कोसळलेली आपत्ती असल्याचं त्यांनी जारी केलेल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. झाला प्रकार दुर्दैवी होता, त्यात कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेतल्या मृत्युंची जबाबदारी घेत, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. खारघर इथल्या रुग्णालयांत दाखल रुग्णांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. सांस्कृतिक खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. या कार्यक्रमासाठी आलेल्या श्रीसेवकांना पाणी आणि सावलीसह आवश्यक सुविधा देणं ही आयोजकांची जबाबदारी होती, या सुविधा देणं शक्य नव्हतं, तर खुल्या मैदानावर कार्यक्रम घ्यायला नको होता, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. या आयोजनात योग्य ती खबरदारी घेतली होती की नाही, याची चौकशी व्हायला हवी, असं मत पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, हा कार्यक्रम कडाक्याच्या उन्हात न ठेवता सायंकाळी घेण्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली नाही का, असा प्रश्न विचारला आहे. एका ट्विट संदेशात ठाकरे यांनी, भविष्यात अशा घटना होऊ नयेत, आणि प्रशासन अशा चुका करणार नाही, याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे.
दरम्यान, उष्माघातामुळे झालेल्या मृतांची संख्या आता १३ झाली असून, २० जणांवर उपचार सुरु आहेत, तर २६ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा कार्यक्रम श्रीसदस्यांशी चर्चा करूनच ठरवण्यात आला होता, कार्यक्रमस्थळी डॉक्टर, नर्स, मदतनीस आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली. या घटनेतल्या पीडित कुटुंबांना दिलासा देण्यापेक्षा सरकारवर टीका करण्यात, काही लोक मग्न आहेत, असंही सामंत म्हणाले.
****
राज्यातल्या शाळांनी शुल्कासाठी विद्यार्थ्यांचे निकाल अडवून ठेवू नयेत, तसंच पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असे स्पष्ट निर्देश, शिक्षण विभागानं दिले आहेत. काही शाळांनी शुल्क वसुलीचा तगादा लावला असून, शुल्क न भरल्यास निकाल देणार नाही, तसंच पुढील वर्गात प्रवेशही मिळणार नाही, अशी भीती दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारी, पालकांकडून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना हे निर्देश दिले.
****
देशात तूर तसंच उडदाचे साठे जाहीर करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. ग्राहक कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या या निर्देशांमध्ये, राज्य सरकार तसंच जिल्हा प्रशासनांनी या साठ्यांची पडताळणी करण्यास सांगितलं आहे, त्याचप्रमाणे बेकायदा साठ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही मंत्रालयानं दिले आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूत केलेल्या सर्वेक्षणातून या साठ्यामध्ये वाढ होत असल्याचं निर्दशनास आलं आहे.
****
सामाजिक न्यायासाठी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता, राज्यसभेतले विरोधीपक्षनेते तथा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली आहे. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये होऊ शकलेली नाही, ती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे. जातीनिहाय जनगणनेच्या अभावामुळे सामाजिक न्याय विभागाकडची माहिती अपुरी असल्याची शक्यताही खरगे यांनी वर्तवली आहे.
****
काँग्रेस पक्षाने नेते के सी वेणुगोपाल यांनी काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत असल्याचं सांगितलं. तर ठाकरे यांच्या या लढ्यात काँग्रेस त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी असल्याची ग्वाही वेणुगोपाल यांनी दिली. भाजप सत्ताभक्षक असल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली.
****
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. काल त्यांनी ट्विटरवर याबाबतचा खुलासा करताना, या बातम्या पूर्णपणे असत्य असून, आपण अशी कोणतीही बैठक बोलावलेली नसल्याचं म्हटलं आहे. कालही आपले कोणतेही नियोजित कार्यक्रम नव्हते, आजही आपण विधानभवनातल्या आपल्या कार्यालयात उपस्थित राहणार असून, कामकाज नियमित सुरू राहणार असल्याचं सांगितलं आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नाट्य कलावंत आणि अभिनेते प्रशांत दामले यांच्या नेतृत्वातल्या रंगकर्मी पॅनलनं मोठा विजय मिळवला आहे. मुंबईत १४ पैकी १० जागांवर रंगकर्मी पॅनलचे उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित महाराष्ट्रात ५० पैकी ४५ ठिकाणी सामंत यांचा पाठिंबा असलेले उमेदवार विजयी झाले. मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरू, आणि आणि नाट्य परिषदेला शिखरावर नेऊ, असा विश्वास रंगकर्मी पॅनलच्या सर्व उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
****
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळली. त्यामुळे मुंबईत २२७ प्रभागच कायम राहणार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही संख्या २३६ केली होती, त्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारनं ती रद्द करत पूर्वीची २२७ प्रभागांची रचना कायम ठेवली होती. या विरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ठाकरे सरकारनं मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारे केली होती, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलानं केला होता. या याचिकेवर दोन महिन्यांपूर्वी युक्तिवाद पूर्ण होऊन न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. काल निकाल देताना ही याचिका फेटाळण्यात आली.
****
मुंबईतील आरे कॉलनीमधली झाडं तोडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत, मुंबई मेट्रोला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयानं मेट्रो रेल्वे महामंडळाला ८४ झाडं तोडण्याची परवानगी दिली होती, तरी महामंडळानं वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा अवमान केल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. आदेशाचं उल्लंघन करून आणखी झाडं तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आल्याचं न्यायालयानं सांगितलं.
****
राज्य विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीप्रकरणी पुढच्या सुनावणीपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. याप्रकरणी आता २५ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
****
पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत, काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी, जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं.
लातूर शहर आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्यांनी निदर्शनं करत, सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
****
हिंगोली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी हळदीच्या ऑनलाईन लिलाव पद्धतीला विरोध दर्शवल्यानं, काल जवळपास दोन तास लिलाव बंद होता. शेतकऱ्यांना कुठलीही माहिती न देता, खरेदीदार, आडते यांनी अचानक ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पद्धतीनं लिलाव सुरू केल्यानं, शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे आडते, खरेदीदारांना लिलाव बंद करावा लागला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय गाठत, ऑफलाईन पद्धतीनं लिलाव करण्याची मागणी केली. बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सर्वांशी एकत्रित चर्चा केल्यानंतर ऑफलाईल लिलावाला सुरूवात झाली. बाजार समितीत काल हळदीच्या दहा हजार कट्ट्यांची आवक झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.
****
रुग्णालयात तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं रुग्णाच्या सहा नातेवाईकांना दोन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मार्च २०१० मध्ये जानापुरी इथल्या श्रीरंग पावळे या रुग्णाचा साप चावल्यानं रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. कायदेशीर कारवाई करुन प्रेत देऊ, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरांना मारहाण केली होती. याप्रकरणी सहा जणांना न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे.
****
पुणे जिल्ह्यात पिंपरी मधल्या किवळेजवळ वादळी वाऱ्यार्यामुळे मोठा जाहिरात फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण काल संध्याकाळच्या सुमारास पावसापासून संरक्षणासाठी आडोशाला उभे असताना ही दुर्घटना घडली.
****
बीड जिल्हा परिषद शाळेतले इयत्ता पाचवी ते आठवी वर्गाचे तेहतीस विद्यार्थी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इसरोच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी काल रवाना झाले. या अभ्यास दौऱ्���ासाठी बावीस हजार दोनशे शहात्तर विद्यार्थ्यांनी केंद्रस्तर, तालुकास्तर, आणि जिल्हास्तर अशा तीन स्तरांवर परीक्षा दिली होती, त्यातून या तेहेतीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिऊर पोलीसांनी मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करून, त्यांच्या ताब्यातून १६ मोटर सायकल हस्तगत केल्या आहेत. या दुचाकींची किंमत सुमारे चार लाख ५५ हजार रुपये एवढी असल्याचं, पोलिसांनी सांगितलं. आसीफ शेख, अजय चव्हाण, पारस पुरे, विजय अभंग, आणि संदेश खिल्लारे ,अशी या पाच चोरट्यांची नावं असून, हे सर्वजण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले रहिवासी आहेत.
****
महारोजगार मेळावा हा रोजगार देण्यासोबतच ग्रामीण भागात उद्योजक घडवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं, पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. युवकांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावं, असं आवाहन कराड यांनी केलं. या मेळाव्यासाठी सुमारे सतराशे युवकांनी नोंदणी केली आहे.
****
धाराशिव शहराच्या सर्वंकष विकासासाठी २०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यापैकी ४० कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समिती आणि राज्य सरकारकडून थेट मंजूर करून घेतला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात मुंबई - पुण्याच्या धर्तीवर धाराशिव शहरात पाच उद्यानं उभारणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं, महाज्योतीच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. सर्व संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडीच्या नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती- फेलोशीप देण्यात यावी, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
****
परभणी इथं काल दोन युवकांचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. एका घरात कुलर बसवताना ही दुर्घटना घडली असून, संभाजी थोरे आणि रोहित उमरीकर अशी या युवकांची नावं आहेत.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीच्या वतीनं धाराशिव शहरात हुतात्मा स्मारक इथं प्रत्येक महिन्याच्या सतरा तारखेला अभिवादन करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. काल स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं.
****
अहमदनगर इथं २० ते २३ एप्रिल दरम्यान होणाऱ्या छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेसाठी लाल मातीचा आखाडा सज्ज करण्यात आला आहे. ही स्पर्धा माती तसंच गादी विभागात रंगणार आहे. विजेत्या मल्लाला हॉलमार्क असलेली २४ कॅरेटची पाचशे ग्रॅम वजनाची सोन्याची गदा बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल बंगळुरु इथं झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर आठ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईच्या संघाने निर्धारित षटकात २२६ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला बंगळुरुचा संघ २० षटकात २१८ धावाच करु शकला.
****
0 notes
beednews · 2 years
Text
बीड जिल्ह्यात वक्फ जमीन हडपल्याप्रकरणी भूमाफियासह अधिकाऱ्यांवर गुन्हे. https://beed24.in/crimes-against-officials-including-land-mafia-for-grabbing-waqf-land-in-beed-district/
0 notes