Tumgik
#मिळाल्यानं
Text
रुग्णवाहिका न मिळाल्यानं मागितली भिक, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?
रुग्णवाहिका न मिळाल्यानं मागितली भिक, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?
रुग्णवाहिका न मिळाल्यानं मागितली भिक, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील धरमडोह येथील सरीता किशोर कासदेकर या महिलेचा चिमुकला दगावला. आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका व मदत मिळाली नाही. त्यामुळं अमरावतीपर्यंत मृतदेह एसटीत आणावा लागला. त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले. संबंधित डॉक्टरसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ निलंबन करा. कारवाई न झाल्यास…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 09 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०९ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मानव केंद्रीत दृष्टीकोनातून आपलं उत्तरदायित्व निभावत वाटचाल करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जी-20 राष्ट्रांना केलं आहे. नवी दिल्ली इथं १८व्या जी - 20 शिखर परिषदेची सुरुवात झाली. वन अर्थ अर्थात एक पृथ्वी या परिषदेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान संबोधित करत होते. आपण कोरोनावर यशस्वी मात केली त्याचप्रमाणे आपण संयुक्तरित्या एकत्र येऊन वैश्विक अविश्वासावर मात करू या, असं ते म्हणाले. अन्न आणि इंधन व्यवस्थापन, दहशतवाद, सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा, जलसुरक्षा, यासारख्या समस्यांवर भावी पिढ्यांसाठी ठोस उपाय शोधावे लागतील, जगाला नवी दिशा दाखवण्यासाठी २१ वं शतक हा महत्त्वाचा काळ असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. 
आफ्रिकन युनियनला जी-20 मध्ये स्थायी सदस्यत्व देण्याच्या भारताच्या प्रस्तावाला जी-20 शिखर परिषदेत मंजुरी देण्यात आली.
****
दरम्यान, परिषदेचं पहिल्या सत्रासाठी भारत मंडपम इथं आलेल्या सर्व राष्ट्र प्रमुख, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, अर्जेंटिनाचे राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडिस, नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टीनुबू, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, इटलीचे पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी, ओमानचे सुलतान आणि पंतप्रधान हैथम बिन तारिक, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेइ लावरोव, आणि बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा समावेश आहे.
****
जी - 20 परिषदेच्या आज होणार्या दुसर्या सत्राचा विषय वन फॅमिली अर्थात एक कुटुंब असा आहे. काही देशांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय बैठका आज होणार आहेत. जी - 20 देशांचे प्रमुख, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात आमंत्रित केलं आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात जालना इथल्या आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री उशीरा मुंबईत बैठक झाली. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. हे शिष्टमंडळ आज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना या बैठकीतील चर्चेसंदर्भात माहिती देईल, यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, या बैठकीला उपस्थित होते. मराठाआरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक पावलं टाकत आहे असं रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यासंदर्भातल्या शासन निर्णयामध्ये त्रुटी असल्याचं शिष्टमंडळानं या बैठकीत सांगितलं. यावेळी राज्य सरकारने मराठा समाजासाठी केलेल्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती शिष्टमंडळाला दिली. तसंच, पुढील कार्यवाहीसंदर्भात सुद्धा यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
****
सहकारी संस्था ग्रामीण आर्थिक विकासाचा पाया असून, युवकांना रोजगार देण्याचं सहकार हे उत्तम माध्यम आहे. म्हणूनच अधिकाऱ्यांनी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर द्यावा, असं आवाहन सहकार ���ंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित राज्यस्तरीय सहकारी अधिकारी परिषदेत ते काल बोलत होते. अधिकाऱ्यांनी रचनात्मक काम करुन सामान्य सभासदांचा विश्वास संपादन करावा, आणि तक्रारींचा निपटारा कालमर्यादेत करावा, असं त्यांनी सांगितलं. विशेषतः आदिवासी, डोंगराळ भागातल्या सोसायट्याना चांगल्या सेवा न मिळाल्यानं त्या अडचणीत जातात. बेकायदेशीर सावकारी मोडून काढण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं वळसे-पाटील यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलन केलं. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात बीड आणि शिरूर कासार या दोन तालुक्यातल्या महसूल मंडळांचा अग्रीम मंजुरीत नव्याने समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपा - मुधोळ मुंडे यांनी यासंदर्भात अधीसूचना जाहीर केली आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
सर्वात मोठी बातमी; एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण
Tumblr media
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून याकडे लक्ष लागलं होतं. 78 पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र असून ऑक्टोबर २०२२ पासून हे प्रकरण चर्चेत आले होते. याशिवाय शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळालंआहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्यानं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे ��टाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय. ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे हे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
khabarbharat · 3 years
Text
...म्हणून मी नाराज आहे; दीपक केसरकर स्पष्टच बोलले!
…म्हणून मी नाराज आहे; दीपक केसरकर स्पष्टच बोलले!
Tumblr media
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असल्याच्या चर्चेवर माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी खुलासा केला आहे. सिंधुदुर्ग: ‘महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही याचे मला अजिबात दु:ख नाही. पण सिंधुदुर्गाचं मंत्रिपद गेल्याचं दु:ख १०० टक्के आहे,’ असं स्पष्ट मत माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. भाजप-शिवसे…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
​सलाम ‘खाकी’तल्या माणुसकीला ! खारेपाटण : लॉकडाऊनमुळे सर्वच जण आहेत तिथेच अडकलेत. अशावेळी खारेपाटण जवळ एका निवारा शेड मध्ये बेवारसपणे जीवन जगणाऱ्याला आणि जेवण ना मिळाल्यानं अन्नान दशा झालेल्याला पोलीस बांधवानी जेवू खाऊ घालून त्याला ओरोस रुग्णालयात दाखल केलं.
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
धर्मा पाटील यांच्या पत्नी,मुलाला सरकारनं नजरकैदेत ठेवलं- अजित पवार
धर्मा पाटील यांच्या पत्नी,मुलाला सरकारनं नजरकैदेत ठेवलं- अजित पवार
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली तसे विविध राजकीय पक्षांनी यात्रांच्या माध्यमातून जनसंपर्काला सुरुवात केली आहे. या यात्रांमधून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या महाजनादेश यात्रेवरून गंभीर आरोप केला आहे.
जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यानं धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Palghar News : उपचारासाठी गर्भवती महिलेची पायपीट; रस्त्यातच डोळ्यांदेखत जुळ्या बाळांचा मृत्यू!
Palghar News : उपचारासाठी गर्भवती महिलेची पायपीट; रस्त्यातच डोळ्यांदेखत जुळ्या बाळांचा मृत्यू!
Palghar News : उपचारासाठी गर्भवती महिलेची पायपीट; रस्त्यातच डोळ्यांदेखत जुळ्या बाळांचा मृत्यू! Palghar Crime News Marathi : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतानाच आता पालघरमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यानं गर्भवती महिलेच्या दोन जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. Palghar Crime News Marathi : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतानाच आता…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
प्रशासकीय कामकाजात जाणारा वेळ वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असून, तसं केल्यानेच कामकाजात सुलभता येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नागरी सेवा दिनानिमित्त आज लोक प्रशासनातल्या सर्वोत्कृष्ट कार्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय आराखड्यानुसार काम केल्यास, लोकांच्या गरजा सुनिश्चित करता येतील, तसंच आगामी धोरण निश्चित करण्यासही ही बाब लाभदायक असेल, असं पंतप्रधान म्हणाले. देशवासियांच्या अपेक्षा वाढत असून, देशाच्या विकासासाठी तसंच व्यवस्थेत बदलासाठी नागरिक आतूर आहेत, त्यामुळे निर्णय क्षमता गतीमान करून पूर्ण क्षमतेनं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
या कार्यक्रमात राज्यातून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सन्मानित करण्यात आलं.
लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकारानं, आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ प्राथमिक आरोग्य केंद्र, आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचं निदान, उपचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची, प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
***
मराठा आरक्षणाबाबत विरोधकांच्या गैरप्रचाराला कोणी बळी पडू नये, सर्वोच्च न्यायालयातली लढाई अजून संपलेली नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार मराठा बांधवाच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, सामंत यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार हे नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आहेत. परिषदेच्या निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी ही भेट झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सर्व आमदारांची तातडीनं बैठक बोलावल्याची माहितीही सामं�� यांनी दिली.
***
एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकानं मोलाचा हातभार लावावा, असं आवाहन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केलं आहे. उद्याच्या वसुंधरा दिनानिमित्त एकल प्लास्टिकला पर्याय असलेल्या वस्तूंच्या, मुंबईत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. अशा प्लास्टिकला सक्षम पर्यायी वस्तू उपलब्ध होऊ शकतात, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यापक जागृती करण्याच्या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
***
परदेशातल्या एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्यानं त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता शिष्यवृत्ती मिळणार असून, या विद्यार्थ्यांचं शिक्षण व्यवस्थित होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी सरकारचे आभार मानले.
***
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या कुंजखेडा आरोग्य उपकेंद्रात, तात्काळ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन रुग्णालय सुरु करण्याची मागणी, खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. कुंजखेडा इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे, मात्र आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे याठिकाणी अद्याप वैद्यकिय अधिकारी आणि डॉक्टरांची भरतीच न केल्यानं रुग्णालय बंद असल्याचं खासदार जलिल यांनी या पत्रात म्हटलं आहे.
***
तुर्की इथं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अतनु दास, बी धीरज आणि तरुणदीप राय यांच्या रिकर्व संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. येत्या रविवारी होणाऱ्या सुवर्ण पदकासाठीच्या सामन्यात भारतीय संघासमोर चीनच्या संघाचं आव्हान असेल.
***
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
//**************//
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशातल्या वाघांची संख्या वाढून ३ हजार १६७- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला अभिमान.
नऊ वर्षांत दोन हजारांहून अधिक कालबाह्य कायदे रद्द - केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांची माहिती.
हिंदूत्वाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षांवर टीका.
आणि
प्रियांशू राजावतला फ्रान्समधल्या ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद.
****
वन्य जीवांचं संरक्षण हा एक वैश्र्विक मुद्दा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अंतर्गत स्थापन आंतरराष्ट्रीय व्याघ्र आघाडी ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ हा वाघांच्या संरक्षणाचा एक प्रयत्न असल्याची माहितीही त्यांनी आज दिली. त्यांच्या हस्ते कर्नाटकच्या मैसुरु इथं या प्रकल्पाचं उद्‌घाटन झालं, त्यावेळी मोदी बोलत होते. देशातल्या व्याघ्र जनगणना अहवालाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. देशातल्या वाघांची संख्या वाढली आहे. जगात सर्वाधिक म्हणजे ३ हजार १६७ वाघ देशात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जगातल्या एकूण वाघांच्या तुलनेत देशातल्या वाघांची संख्या सुमारे ७५ टक्के असणं ही आपल्यासाठी सुखद बाब असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केलं. भारतानं वाघांचं संरक्षण करण्यासह त्यांच्या संवर्धनासाठी एक उत्तम परिसंस्था तयार केली असून व्याघ्र प्रकल्पाचं यश केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानाची बाब असल्याचंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
****
केंद्र सरकारनं प्रशासन आणि व्यवसाय सुलभता आणण्याच्या दृष्टीनं मागिल नऊ वर्षात दोन हजारांहून अधिक कालबाह्य कायदे रद्द केल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. आज मुंबई इथं आयोजित एका समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नागरिकांना जाचक ठरणारे ब्रिटिशकालीन नियम रद्द करण्याचं धैर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शवलं, नागरिकांचं जीवनमान सुलभ करणं, हे सुशासनाचं ध्येय असतं, असं ते म्हणाले. आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन, नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणि नैतिक प्रशासन याला सरकारचं कायम प्राधान्य राहिलं असही सिंह यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्येमध्ये श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि महाआरती केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी श्रीरामाच्या नव्या मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली तसंच हनुमान गढीचं दर्शन घेतलं. त्यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले काही मंत्री तसंच खासदार, आमदारही या दौऱ्यात सहभागी झाले. या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी कडाडून टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर हिंदूत्व तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन शिंदे य���ंनी विरोधी पक्षांवर टीका केली. ते म्हणाले –
पवार साहेब मोठे नेते आहेत. परंतू सावरकर आमच्यासाठी हिंदू नेता नाही आमचं ते दैवत आहे. राज्याचं आणि देशाचं दैवत आहे. त्यांचा अपमान ज्यांनी केला त्यांच्या विरोधामध्ये सावरकर गौरव यात्रा सुरू झाली आहे. त्यांना जनता धडा शिकवणार आहे. पण आता जे कोण जे वारस म्हणतायत त्यांनी काय केलं? मूग गिळून गप्प बसले. साधा अधिवेशनामध्ये सावरकरांचा अभिनंदनाचा प्रस्ताव देखील आणू शकले नाही. हे दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत. त्यांच्या गळ्यात गळा घालतायत. हे कुठलं हिंदुत्व आहे? आम्ही हे सहन करणार नाही. सहन करणार नाही म्हणजे काय करणार? त्यांचा निषेध तरी करण्याची हिंमत आहे का? धाडस आहे का? दाखवा.
****
केरळमधल्या कुमारकोम इथं भारताच्या अध्यक्षतेखाली जी-ट्वेंटी परिषदेमध्ये सहभागी देशांच्या विकास कामविषयक समूह गटाची बैठक आज झाली. या बैठकीत भारतानं विकासासंदर्भात सादर केलेल्या विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली. यात विकास प्रकल्पांचा आढावा, महिलांच्या नेतृत्वातील विकास कामाची प्रगती यासह विविध विषयांवर चर्चा झाली. ही बैठक रचनात्मक आणि जी-ट्वेंटी देशांचं व्यापक समर्थन मिळाल्यानं फलदायी ठरल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी दिली आहे.
****
जम्मू कश्मीरमधे पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा मोठा प्रयत्न लष्करी जवानांनी हाणून पाडला आहे. काल मध्यरात्रीनंतर या भागात संशयास्पद हालचाली सुरु असल्याचा भारतीय लष्कराच्या जवानांना आढळलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडच्या बाजूनं घुसखोर कुंपणाजवळ येताच जवानांनी त्यांना हटकलं. यावेळी झालेल्या चकमकीत एकजण ठार झाला, तर इतर घुसखोर जंगलात पळून गेले. मात्र त्यानंतर जवानांनी या भागात शोधमोहीम सुरु केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईस्टरनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या समाजात बंधुभाव दृढ करणारा आहे. समाजाची सेवा करण्याची आणि दीनदुबळ्यांना सक्षम करण्यासाठी मदत करण्याची प्रेरणा हा सण लोकांना देतो. येशू ख्रिस्ताच्या धर्मविचारांची आठवण करुन देणारा, हा सण आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोरोना विषाणू संसर्गाचे ६६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ५४२ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुळे काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत राज्यातील एकूण ७९ लाख ९६ हजार, ३२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४८ हजार ४५८ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४ हजार ३६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक १२ शतांश टक्के, तर मृत्यू दर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.
****
येत्या दोन दिवसांत महाराष्ट्र तसंच मध्यप्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये वादळी वारं वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. पश्चिम राजस्थान आणि जवळपासच्या ठिकाणी चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामानशास्त्र विभागानं येत्या पाच दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली आहे. वायव्य, पश्चिम, मध्य आणि पूर्व भारताच्या बहुतांश भागांत तापमानात हळूहळू दोन ते चार अंशांनी वाढ होईल परंतु पुढल्या पाच दिवसांत देशाच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
नागपूर नजिक हिंगण्याजवळील जुनापाणी इथं दिव्यांग लहान मुलांच्या पुनर्वसनासाठीच्या विशेष केंद्राचं उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आलं. हे देशातलं पहिलं सर्वसमावेशक असं दिव्यांग लहान मुलांसाठी काम करणारं केंद्र आहे. बालअस्थी शल्यचिकीत्सक डॉक्टर विराज शिंगाडे, डॉक्टर रश्मी शिंगाडे यांच्या पुढाकारातून या केंद्राची स्थापना झाली आहे. केंद्रामध्ये दिव्यांग मुलांना एकाच ठिकाणी सर्व उपचार मिळणार आहेत.
****
भारताचा बॅडमिंटनपटू प्रियांशू राजावतनं फ्रान्समधल्या प्रतिष्ठेच्या ऑरलिन्स मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. ��ज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रियांशूनं डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्सनवर मात केली. प्रियांशूनं रंगलेल्या अंतिम लढतीत २१-१५, १९-२१, २१-१६ असा विजय मिळवला. प्रियांशूनं काल उपांत्यफेरीच्या सामन्यात आयर्लंडच्या नहत गुयेनला पराभूत केलं होतं.
****
गुजरात टायटन्सनं आज अहमदाबाद इथं सुरू आयपीएल टीट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर २०५ धावाचं आव्हान ठेवलं आहे. विजय शंकरनं नाबाद ६३, साईसुदर्शननं केलेल्या ५३ धावांमुळं गुजरात टायटन्सला २०० धावांचा पल्ला ओलांडता आला. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा कोलकाता नाईट रायडर्स संघानं सात षटकांमध्ये दोन बाद ५५ धावा केल्या आहेत. या स्पर्धेतला दुसरा सामना आज संध्याकाळी साडे सात वाजता सनरायजर्स हैद्राबाद आणि पंजाब किंग्ज या संघांदरम्यान होणार आहे.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीच्या वतीनं आज मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात अनेक नागरिकांची विविध आजारांसंदर्भात तपासणी करण्यात आली.
****
व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातील २२३ पत्रकारांचा मोफत विमा काढण्यात आला. संघटनेच्या वतीने देशभरातील पत्रकारांच्या पाल्यांसाठी शिक्षण तसंच आरोग्य सेवासंदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या डहाणूच्या महालक्ष्मी यात्रोत्सवाला हनुमान जयंती पासून सुरुवात झाली आहे. चैत्र पौर्णिमेपासून सुरू होणारी ही महालक्ष्मीची यात्रा सलग पंधरा दिवस अमावस्येपर्यंत चालते.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 February 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
राज्यात नव्यानं सुरु झालेल्या दोन्ही वंदे भारत रेल्वेमुळे पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आता १४ मार्चला सुनावणी
राज्यसभेतल्या कामकाजाचं चित्रण केल्याप्रकरणी बीडच्या काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचं निलंबन
दहावी आणि बारावीच्या परिक्षेत निर्धारित वेळेच्या दहा मिनिटं आधी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा रद्द
४०९ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लिमिटेड विरोधात सीबीआयचा गुन्हा दाखल
लाच घेतल्याप्रकरणी एच डी एफ सी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचं आजपासून औरंगाबादमध्ये संमेलन
मध्य प्रदेशात सुरु असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचा आज समारोप
आणि
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या दिवसअखेर सात बाद ३२१ धावा
****
राज्यात काल नव्यानं सुरु झालेल्या दोन्ही वंदे भारत रेल्वेमुळे पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मुंबई - सोलापूर आणि मुंबई - साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वेंना मुंबईत शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते. शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनमुळे साईबाबांचं दर्शन, नाशिक, त्र्यंबकेश्वर या सगळ्या ठिकाणी भेट देणं सुकर आणि सुखकर होणार आहे. सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारतमुळे आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरपूर या ठिकाणी जाणं सोपं होणार असल्याचं ते म्हणाले. या रेल्वेंमुळे नागरिकांचं जीवनमान उंचावणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले –
‘‘इससे कॉलेज आनेजानेवाले, ऑफिस और बिझनेस के लिए आनेजाने वाले, किसानों और श्रद्‌धालुओं सभी को सुविधा होगी। ये महाराष्ट्र मे पर्यटन और तीर्थयात्रा को बहोत अधिक बढावा देनेवाली है। वंदे भारत ट्रेन आज के आधुनिक होते हुये भारत की बहोत ही शानदार तस्वीर है। ये भारत की स्पीड, भारत के स्केल दोनों का प्रतिबिंब है।’’
पंतप्रधान मोदी यांच्या काळात राज्याला रेल्वे विकासासाठी दरवर्षी निधी वाढवून देण्यात आला असून, यावर्षीच्या अर्थसंकल्पात तो साडे तेरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्पात भरीव निधी मिळाल्यानं महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई -सोलापूर वंदे भारत रेल्वेमुळे नागरिकांना सोलापूरसह तुळजापूर आणि अक्कलकोट इथं दर्शनाला जाण्यासाठी सोयीस्कर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या कुर्ला ते वाकोला टप्प्याचं उद्घाटन, पश्चिम द्रुतगती मार्गाच्या मालाड आणि कुरार बाजूंना जोडणाऱ्या बोगद्याचं लोकार्पण करण्यात आलं.
****
मुंबईतल्या मारोळ इथं काल दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या, द सैफी अकादमीच्या नवीन परिसराचं उद्घाटन, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात सरकारनं अमुलाग्र बदल केल्याचं सांगत, वैद्यकीय आणि तंत्र शिक्षण प्रादेशिक भाषांमधून घेता येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले –
‘‘शिक्षा के क्षेत्र मे भारत कभी नालंदा और तक्षशिला जैसे विश्वविद्यालयोंका केंद्र हुआ करता था। पुरी दुनिया से लोग यहा पढने और सिखने आते थे। अगर हमे भारत के वैभव को वापिस लाना है, तो हमे शिक्षा के उस गौरव को भी वापिस लाना होगा। इसलिये आज भारतीय कलेवर मे ढली आधुनिक शिक्षा व्यवस्था ये देश की प्राथमिकता है। देश ने शिक्षा व्यवस्था मे एक अहम बदलाव किया है। ये बदलाव है, एज्यूकेशन सिस्टम मे स्थानिय भाषा को महत्व देना। अब मेडिकल और इंजिनिअरिंग जैसी पढाई भी स्थानिय भाषा मे कि जाएगी।’’
****
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आता १४ मार्चला सुनावणी होणार आहे. मंगळवारी सात फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार होती, मात्र त्यादिवशी कामकाजात हे प्रकरण आलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयानं संकेतस्थळावर या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख २१ मार्च दर्शवली. यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर तातडीचं म्हणून नोंदवलं. सरन्यायाधिशांनी आम्ही लवकर प्रकरणावर सुनावणी घेण्याचा प्रयत्न करु, असं सांगत १४ मार्च ही सुनावणीची तारीख निश्चित केली.
****
राज्यसभेतल्या कामकाजाचं चित्रण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बीड जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचं सभापतींनी निलंबन केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी हे निलंबन करण्यात आलं आहे. गुरुवारच्या कामकाजाचं चित्रीकरण पाटील यां��ी केलं होतं.
****
राज्यात गेल्या सात महिन्यांपासून दादागिरी, धमक्या, अधिकाऱ्यांना मारहाण, आमदारांनाही मारहाण होत असून, कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या शिरड शहापूर इथल्या आदिवासी आश्रम शाळा इमारत पायाभरणी आणि शेतकरी कार्यकर्ता मेळाव्यात ते काल बोलत होते. राज्य सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी असल्याचं ते म्हणाले.
लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेले विक्रम काळे यांचा, तसंच अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातले नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार काल अजित पवार यांच्या हस्ते झाला.
****
यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेपासून निर्धारित वेळेच्या दहा मिनिटं आधी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा रद्द करण्यात येत असल्याचं, राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितलं. समाज माध्यमांवर होणार्या पेपरफुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा पार पडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. कॉपीमुक्त परिक्षेसाठी भरारी पथकांशिवाय बैठी पथकं, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांच्या समन्वयातूनही भरारी पथक नियुक्त करण्यात य��णार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पुण्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी, संभाजी ब्रिगेड आणि आम आदमी पक्षानं माघार घेतली आहे. आम आदमी पक्षाचे किरण कद्रे यांनीही कसबा पेठ विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली.
दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सुनील शेळके आणि शिवसेनेचे सचिन अहिर यांनी चर्चा केल्यानंतरही पिंपरी चिंचवडमधील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी मात्र निवडणुकीतून माघार घेतली नाही.
****
४०९ कोटी २६ लाख रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लिमिटेड विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुट्टे हे गंगाखेड शुगर कंपनीचे संचालक असून, त्यांनी २००८ ते २०१५ या कालावधीत युको बँकेच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या समूहाकडून ५७७ कोटी १६ लाख रुपयांचं कर्ज उचललं होतं. ही रक्कम गुट्टे आणि त्यांच्या कुटुंबियांनी इतरत्र वळवली आणि संपत्तीचं अवास्तव मूल्य वाढवून आणखी खेळतं भाडंवल पदरात पाडून घेतलं. त्यामुळे कंपनी तोट्यात जाऊन बँकांचं कर्ज थकलं, असा आरोप सीबीआयनं केला आहे.
****
लाच घेतल्याप्रकरणी एच डी एफ सी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा, पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयानं सुनावली आहे. ३० जुलै २०२० रोजी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. पुण्यातल्या बारामती शाखेचा व्यवस्थापक नितीन निकम यानं ९९ लाख रुपयांचं कर्ज मंजूर करण्यासाठी, तक्रारदाराकडे दोन लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सव्वादोन लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला. त्यातले दोन लाख रुपये लाच घेताना सीबीआयनं निकमचा सहाय्यक गणेश धायगुडेला रंगेहात अटक केली होती.
****
अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचं अकरावं दोन दिवसीय अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन आजपासून औरंगाबाद इथं सुरु होत आहे. शहरातल्या तापडिया नाट्य मंदिरात होणार्या या संमेलनाचं उद्घाटन सिने अभिनेते डॉ. अशोक लोखंडे यांच्या हस्ते आणि संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रकाश त्रिभूवन, खासदार सुधाकर श्रृंगारे, अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
औरंगाबाद मध्ये जी २० परिषदेनिमित्त आज आणि उद्या राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेचं उद्धाटन, काल पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते झालं. या शहर स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि आपलं शहर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनीच कटिबद्ध राहीलं पाहीजे, असं आवाहन भुमरे यांनी यावेळी केलं. कचरा वेचक वीस घंटा गाड्यांचं लोकार्पणही त्यांनी यावेळी केलं. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय आणि महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. दररोजच्या एकूण उष्मांकापैकी ७० ते ८० टक्के उष्मांक तृणधान्यापासून मिळतात. या व्यतिरिक्त तृणधान्यांमधून आपल्याला प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्व "अ' आणि "ड' चांगल्या प्रमाणात मिळतात. तृणधान्याचा आहारात उपयोग केल्यास यापासून आपणास बरेच फायदे मिळतात. राळ या तृण धान्यापासून मिळणारे फायदे सांगत आहेत आहारतज्ज्ञ स्नेहा वेद -
****
औरंगाबाद इथं येत्या २५ आणि २६ फेब्रुवारीला होणाऱ्या वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठीचे तिकीट दर काल निश्चित करण्यात आले. सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम अशी आसन व्यवस्था करण्यात आली असून, सिल्वर-१५० रुपये, गोल्ड-३०० आणि प्लॅटीनिअम -६०० रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे तीन दिवसांसाठी हे दर राहतील. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यालय आणि संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी तिकीट विक्री केली जाणार असल्याचं संयोजन समितीतर्फे सांगण्यात आलं आहे.
****
मध्य प्रदेशात सुरु असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचा आज भोपाळ इथं समारोप होणार आहे. या स्पर्धेत ५३ सुवर्ण, ५३ कांस्य आणि ४७ रौप्य पदकांसह एकूण १५३ पदकं जिंकून महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम आहे.
दरम्यान, या स्पर्धेत महाराष्ट्रानं काल जलतरणात तीन सुवर्णपदकांसह सहा पदकांची कमाई केली. मुलींच्या २०० मीटर्स वैयक्तिक मिडले शर्यतीत मुंबईच्या अपेक्षा फर्नांडिसनं स्वतःचं चौथं सुवर्णपदक जिंकलं. दोनशे मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत मुंबईच्या पलक जोशीनं सुवर्ण पदक, तर प्रतिष्ठा डांगीनं कांस्यपदक पटकावलं. प्रतिष्ठा डांगी, झारा जब्बार, अपेक्षा फर्नांडिस आणि अनन्या नायक यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघानं, चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत, सुवर्णपदक जिंकलं. मुलांच्या आठशे मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत वेदांत माधवननं रौप्य पदक पटकावलं. तर, दोनशे मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत ऋषभ दासनं कांस्यपदक जिंकलं.
कुस्तीमध्ये फ्री स्टाईल ६५ किलो वजनी गटात अजय कापडेनं, तर ग्रीको रोमन विभागातल्या ७१ किलो वजनी गटात सुमित कुमार भास्कर यानं सुवर्णपदक पटकावलं.
तलवारबाजी मध्ये महिला संघानं इप्पी गटात सांघिक सुवर्णपदक मिळवलं. तर, सेबरच्या सांघिक गटात पुरुष संघानं सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नागपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं काल दुसऱ्या दिवसअखेर, सात बाद ३२१ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक १२० धावा केल्या असून, क्रिकेटच्या तीनही प्रकारात कर्णधार म्हणून शतक झळकवणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे. रविंद्र जडेजा ६६ तर अक्षर पटेल ५२ धावांवर खेळत आहेत. भारतानं पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी घेतली आहे.
****
प्रगतशील शेतकरी होण्यासाठी काळानुरुप बदल स्वीकारणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं श्री तुळजाभवानी जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळ आणि अतिवृष्टी मुळे मुख्य पीकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करतांना जोडधंदा असल्यास आपलं  आर्थिक चक्र सुरळित चालेल असं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
आभासी चलन फसवणूक प्रकरणात जालना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलेल्या चार संशयितांची पोलीस कोठडी चार दिवसांनी वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही संशयितांची नावं समोर येण्याची शक्यता असून, बनावट संकेतस्थळ चालवणारे तसंच जालना इथल्या फरार प्रमोटरचा शोध सुरू असल्याचं पोलीस यांनी सांगितलं.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
वंदे भारत रेल्वेमुळे राज्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आता १४ मार्चला सुनावणी.
वीज निर्मिती कायदा २०२२ लागू होऊ देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा इशारा.
खेलो इंडिया युवा स्पर्धेत १३३ पदकांसह महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम.
आणि
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या दिवसअखेर सात बाद ३२१ धावा.
****
आजपासून सुरु झालेल्या दोन्ही वंदे भारत रेल्वेमुळे राज्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आज मुंबईत मुंबई - सोलापूर आणि मुंबई - साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वेंना शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते. शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनमुळे साईबाबांचं दर्शन, नाशिक, त्र्यंबकेश्वर या सगळ्या ठिकाणी भेट देणं सुकर आणि सुखकर होणार आहे. सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारतमुळे आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरपूर या ठिकाणी जाणं सोपं होणार असल्याचं ते म्हणाले. या रेल्वेंमुळे नागरिकांचं जीवनमान उंचावणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले -
इससे कॉलेज आनेजानेवाले, ऑफिस और बिझनेस के लिए आनेजाने वाले, किसानों और श्रद्‌धालुओं सभी को सुविधा होगी। ये महाराष्ट्र मे पर्यटन और तीर्थयात्रा को बहोत अधिक बढावा देनेवाली है। वंदे भारत ट्रेन आज के आधुनिक होते हुये भारत की बहोत ही शानदार तस्वीर है। ये भारत की स्पीड, भारत के स्केल दोनों का प्रतिबिंब है।
पंतप्रधान मोदी यांच्या काळात राज्याला रेल्वे विकासासाठी दरवर्षी निधी वाढवून देण्यात आला असून यावर्षीच्या अर्थसंकल्पात तो साडे तेरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्पात भरीव निधी मिळाल्यानं महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेमुळे नागरिकांना सोलापूरसह तुळजापूर आणि अक्कलकोट इथं दर्शनाला जाण्यासाठी सोयीस्कर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या कुर्ला ते वाकोला टप्प्याचं उद्‌घाटन, पश्चिम द्रुतगती मार्गाच्या मालाड आणि कुरार बाजूंना जोडणाऱ्या बोगद्याचं लोकार्पण करण्यात आलं. तसंच मरोळ इथं दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या द सैफी अकादमीच्या नवीन परिसराचं उद्‌घाटनही पंतप्रधान मोदी यांनी केलं.
****
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आता १४ मार्चला सुनावणी होणार आहे. मंगळवारी सात फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार होती, मात्र त्यादिवशी कामकाजात हे प्रकरण आलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयानं संकेतस्थळावर या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख २१ मार्च दर्शवली. यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर तातडीचं म्हणून नोंदवलं. सरन्यायाधीशांनी आम्ही लवकर प्रकरणावर सुनावणी घेण्याचा प्रयत्न करु, असं सांगत १४ मार्च ही सुनावणीची तारीख निश्चित केली. इतर मागसवर्गीयांना ९२ नगर परिषदांमध्येही आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारनं न्यायालयात याचिका दाखल केली आहे, यामुळे राज्यातील २३ महानगरपालिका, २०७ नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका प्रलंबित आहेत.
****
वीज निर्मिती कायदा २०२२ लागू होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. नाशिक इथं महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाच्या विसाव्या त्रैवार्षिक महाधिवेशनाचं उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नुकताच सुधारित विद्युत निर्मिती कायदा संसदेत सादर करण्यात आला, या कायद्याला आमचा विरोध आहे असं पवार म्हणाले. राज्यातील सरकारी वीज कंपन्यांमध्ये ४० ते ४५ हजार कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रासह देशभरात कंत्राटी कर्मचारी रोजंदारी कर्मचारी म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय व्हावा असं पवार यावेळी म्हणाले.
****
पुण्यातील कसबा पेठ पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी संभाजी ब्रिगेड आणि आम आदमी पार्टीनं माघार घेतली आहे. शिवसेना नेते आमदार सचिन अहिर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानुसार दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचं संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितलं.
आम आदमी पार्टीचे प्रभारी गोपाळ इटालिया यांनी पुण्याच्या पोटनिवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार किरण कद्रे यांनी कसबा पेठ विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सुनील शेळके आणि शिवसेनेचे सचिन अहिर यांनी चर्चा केल्यानंतरही पिंपरी चिंचवडमधील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही.
****
मध्य प्रदेश इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदकं पटकावत महाराष्ट्रानं आपलं प्रथम स्थान कायम ठेवलं आहे. राज्याच्या खात्यात सध्या १३३ पदकं असून त्यात ४४ सुवर्ण, ४९ रौप्य, ४० कांस्य पदकांचा समावेश आहे. सायकलिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत, महाराष्ट्राच्या संघा���ं १२ पदकांची कमाई केली आहे. तसंच सायकल रोड रेस मध्ये चॅम्पियनशिप देऊन महाराष्ट्राला गौरवण्यात आलं. कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजा दानोळेनं आपलं वर्चस्व अबाधित ठेवत, सहा पदकं मिळवली. कबड्डीत महिला संघाला यावर्षी रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. जलतरण स्पर्धेत वेदांत माधवन यानं या स्पर्धेतलं चौथं सुवर्ण पदक जिंकलं. ज्युदोत श्रद्धा चोपडेनं सुवर्ण, तर आकांक्षा शिंदे आणि समृद्धी पाटील यांनी रौप्य पदक पटकावलं. तलवारबाजीत महाराष्ट्राच्या महिला संघानं सांघिक प्रकारात कांस्य पदक पटकावलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नागपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसअखेर सात बाद ३२१ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक १२० धावा केल्या असून क्रिकेटच्या तीनही प्रकारात कर्णधार म्हणून शतक झळकवणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे. रविंद्र जडेजा ६६ तर अक्षर पटेल ५२ धावांवर खेळत आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीनं सर्वाधिक पाच बळी घेतले असून नाथन लॉयन आणि पॅट कमिन्सनं प्रत्येकी एक बळी घेतला आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात १७७ धावा केल्या असून भारतानं आतापर्यंत १४४ धावांची आघाडी घेतली आहे.
****
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील कृषिपंपांच्या प्रलंबित वीजजोडण्या ताबडतोब देण्यात याव्यात, असे निर्देश महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. आज औरंगाबाद इथं झालेल्या परिमंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महावितरणकडून गेल्या दहा महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या १ लाख ४ हजार ७०९ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५४ हजार वीज जोडण्या केवळ गेल्या तीन महिन्यांमध्ये दिल्या आहेत. हा वेग आणखी वाढवून येत्या मार्चपर्यंत जास्तीत जास्त कृषि पंपांच्या नवीन वीज जोडण्या देण्याचे नियोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं उद्‌घाटन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज केलं. उद्‌घाटनानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना झाला. शहरातल्या गरवारे स्टेडियमवर बारा फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा होणार आहेत. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर ॲथलेटिक स्पर्धांचं उद्‌घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झालं. यावेळी सर्व नऊ तालुक्यातील सहभागी स्पर्धकांनी पथ संचलन करुन मानवंदना दिली.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार - रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे.
पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा.
राजकारण आणि निवडणुका दारूवर विसंबून असल्यानं मद्य प्रश्नांच्या समस्येला बगल - सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग यांचा आरोप.
अपक्ष निवडून आलो अपक्ष म्हणूनच कार्यरत राहणार - आमदार सत्यजित तांबे यांची भूमिका स्पष्ट.
आणि
प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचं चेन्नईत निधन.
****
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून आमच्यात कुणीही नाराज नाही, असं रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं आज ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या वैधते संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे आरोप चुकीचे आहेत. असं असतं तर पहिला मंत्रिमंडळ विस्तारही झाला नसता, असं भुमरे म्हणाले. पक्षाने आदेश दिल्यास औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवण्याची आपली तयारी असल्याचंही भुमरे यांनी स्पष्ट केलं.
****
भारतीय जनता पक्षानं पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा पेठ मतदार संघातून हेमंत रासने यांना तर पिंपरी-चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय कार्यालयानं आज ही उमेदवारी घोषित केली. पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत.
****
राजकारण आणि निवडणुका दारूवर विसंबून असल्यानं मद्य प्रश्नांच्या समस्येला बगल देण्यासाठीच दारूबंदीचा बागुलबुवा उठवला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केला आहे. वर्धा इथं सुरु असेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही मुलाखत लेखिका मुक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाठ आणि विवेक सावंत यांनी घेतली. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून उनाड इच्छा विरुद्ध समाजहीत असा दारूचा प्रश्न आहे, एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी दोन लाख कोटींची दारू विकली जाते, असंही बंग यांनी सांगितलं.
दरम्यान, आज साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरच्या बसोली ग्रुप, स्कूल ऑफ स्कॉलर्स, वि. सा. संघ, नागपूर आयोजित दिवंगत मनोहर म्हैसाळकर स्मृती वैदर्भीय काव्य नक्षत्रमालेत बालचित्रकारांनी वैदर्भीय काव्य नक्षत्रमाला साकारली.
अनुवाद म्हणजे दोन भाषा, संस्कृती, प्रांत यांना जोडणारा पूल आहे, अनुवाद करतांना दोन्ही भाषा आंतरिक मनानं समजून घेत भाषेचं सौंदर्य जपत अनुवाद करावा, असं मत ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमलेनात “भारतीय आणि जागतिक साहित्य विश्��ात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक” या विषयावर झालेल्या परिसंवादात उपस्थित व्यक्त्यांनी सूर मांडला. या परिसंवादात डॉ.विनया बापट, डॉ.बळीराम गायकवाड आणि अरूणा जोशी उपस्थित होते.
****
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले उमेदवार आमदार सत्यजित तांबे यांनी आपण अपक्ष निवडून आलो असून भविष्यातही अपक्ष म्हणूनच राहणार असल्याची भूमिका आज स्पष्ट केली. नाशिकमध्ये आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेस पक्षानं आपल्याला सातत्यानं वारंवार संधी नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यानं आपला अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आला, असंही तांबे यांनी सांगितलं. अर्ज भरण्यापूर्वी आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण कुणाशीही चर्चा होऊ शकली नाही असं तांबे म्हणाले. पक्षानं आपल्याला माफीनामा लिहायला सांगितला, मात्र दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीनं दुसऱ्या उमेद्वाराला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्यानं दु:ख झाल्याचं तांबे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी निवडणुकीत पाठींबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
****
विधान परीषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या शुभांगी पाटील यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
****
देशातील जनतेनं मोठ्या कष्टानं कमावलेले हजारो कोटी रुपये शासनाने अदानींच्या कंपन्यांना दिले, ते पैसे बुडण्याची भीती निर्माण झाली असूनही शासन मूग गिळून गप्प बसलं आहे, अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. ‘अदानी समूहातील गैरव्यवहाराची चौकशी करावी आणि जनतेचा पैसा सुरक्षित रहावा’ यासाठी काँग्रेस पक्ष येत्या सोमवारी ६ फेब्रुवारीला भारतीय स्टेट बँक आणि आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या राज्यातल्या सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करणार असल्याची माहीतीही पटोले यांनी यावेळी दिली.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा वर्ष २०२३-२४ साठीचा अंदाजित अर्थसंकल्प आज महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.इक्बालसिंग चहल यांनी सादर केलं. ५२ हजार ६१९ कोटी ७ लाख रुपयांचा हा अर्थसंकल्प असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत साडे चौदा टक्क्यानं अधिक आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३७ हजार ९२२ कोटी ५५ लाख रुपये इतकं प्रत्यक्ष महसुली उत्पन्न महापालिकेला झालं असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या वतीनं पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथं आयोजित करण्यात येणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ सोहळा पुढं ढकलण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयानं दिली आहे. पुरस्कारार्थी बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत, तसंच बद्रीनाथ तनपुरे महाराज हे प्रकृती अस्वस्थपणामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्यानं हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार आल्याचं संचालनालयानं कळवलं आहे. वर्ष १९-२०, २०-२१, २१-२२ आणि २२-२३ या वर्षांचे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्यात येणार होते.
****
प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचं आज चेन्नईत निधन झालं, त्या ७७ वर्षांच्या होत्या. नुकताच त्यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झाला होता. चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. गेल्या ५० वर्षांपासून वाणी जयराम या व्यावसायिक गायिका म्हणून संगीत क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी कारकिर्दीत दहा हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आर.डी. बर्मन, के व्ही महादेवन, ओ पी नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह अनेक प्रसिद्ध संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं होतं.
****
मध्य प्रदेशात सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध खेळांमध्ये १४ सुवर्णपदकांसह एकूण ४३ पदकं पटकावत महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महाराष्ट्रानं सर्वाधिक पदकं योगासनांमध्ये पटकावली असून यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. त्याखालोखाल सायकलिंग मध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य, एक कांस्य तर टेबल टेनिसमध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. याव्यतिरिक्त नेमबाजी, तिरंदाजी, ऍथलेटिक्स आणि खो-खो मध्ये प्रत्येकी एका सुवर्ण पदकासह रौप्य आणि कांस्य पदकांवरही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विजयी मोहोर उमटवली. याशिवाय, बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्रानं एक रौप्य पदक पटकावलं आहे.
दरम्यान, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांच्या सार्थक आणि संकल्पना गीत आणि गणवेशाचं उद्घाटन आज केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत जम्मू इथं झालं. खेलो इंडियाच्या तिसऱ्या हिवाळी क्रीडा स्पर्धा येत्या १० फेब्रुवारीपासून गुलमर्ग इथं होणार आहेत. हिमाच्छादनावर धावण्याची स्पर्धा, बर्फावरचं स्केटींग, हॉकी, स्कीईंग, स्नो बोर्डींग अशा विविध ९ खेळांचा त्यात समावेश असून पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धा महोत्सवात देशभरातून सुमारे ५०० खेळाडू सहभागी होत आहेत.
****
धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे प्रतिभा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं, त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. येत्या ८ फेब्रुवारीला विशेष महासभेत केवळ औपचारीक घोषणा करण्यात येणार आहे.
****
राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धेस उद्या मुंबई इथं सुरुवात होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना, लोअर परेल इथं आमदार अजय चौधरी, कामगार विभागाचे अवर सचिव दिलीप वणिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
मराठवाडा, विदर्भातल्या नद्यांना जोडणाऱ्या १६ प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मान्यता.
राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला मान्यता.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
आणि
भारतासमोर दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं २१६ धावांचं आव्हान.
****
मराठवाडा आणि विदर्भातल्या नद्यांना जोडणाऱ्या १६ पुलांच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. यामुळं नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. यामध्ये उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण ते निम्न पैनगंगा प्रकल्प क्षेत्रापर्यंत एकूण सात बंधारे, पूर्णा नदीवरचे चार बंधारे यांचा समावेश आहे. कयाधू नदीवर १२ प्रस्तावित बंधाऱ्यांपैकी नऊ बंधाऱ्यांचं काम जलसंधारण विभागमार्फत करण्यात आलं असून उर्वरीत कामांना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले. या प्रकल्पामुळं सदर भागातल्या ऊस, हळद उत्पादक शेतकऱ्यांचा किमान ४० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे.
****
राज्यात २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला मान्यता मिळाली असून लवकरच पदभरती सुरु करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी या बैठकीत सांगितलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोविड काळातल्या उल्लेखनीय सेवेबद्दल प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत येत्या १६ आणि १७ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. यावेळी सुमारे २० उद्योगांबरोबर एक लाख ४० हजार कोटी रुपयांचे करार होणार असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. मुख्यमंत्र्यांसह या शिष्टमंडळात उद्योग मंत्री उदय सामंत तसंच वरिष्ठ अधिकारी असतील. मॅग्नेटिक महाराष्ट्राची नवी बलस्थाने संपूर्ण जगाला कळून राज्याकडे जगाचा ओढा कसा वाढेल यावर या जागतिक महत्वाच्या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे या परिषदेत बदलत्या पर्यावरणाचे शहरांच्या विकासापुढील आव्हान आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास यावर मार्गदर्शन करणार आहेत.
****
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे तसंच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती चौक इथून मिरवणुकीद्वारे अर्ज दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आघाडीतून बाहेर पडणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला. ते म्हणाले –
बुथ लेवलपासून तर विधानसभा लेवलपर्यंत, काही लोकसभा लेवलपर्यंतही ज्यांनी काम केलं आहे, काँग्रेसमधले असे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात येण्याकरता उत्सुक आहेत. राष्ट्रवादीमधले आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर उद्‌धवजीकडले कार्यकर्ते, नेते हे एकनाथ शिंदेजींच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत, या पक्षांमध्ये पुढच्या काळामध्ये खिंडार पडणार आहे. आम्ही अनेक वेळा सांगितलं आहे, की २०२४ मध्ये अशी परिस्थिती होईल लोकसभा आणि विधानसभा लढवण्याकरता सुद्‌धा उमेदवार मिळणार नाहीत, अशी स्थिती महाराष्ट्रात होणार आहे.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रहार आणि इंग्रजी शाळा संस्था चांलकाच्या संघटनेतर्फे डॅा.संजय तायडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेले धनंजय जाधव आणि धनराज विसपुते यांना अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ९७ वावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक नमो ॲप किंवा मायजीओव्ही या खुल्या मंचावरून आपली मतं आणि विचार मांडू शकतात.
****
भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षासोबत आपली कोणतीही तडजोड नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली. भारतीय जनता पक्ष ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्या बरोबर आपण कधीही गेलेलो नाही. हा पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातलं आपलं भांडण व्यवस्थे विरोधातलं आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा निरोप आल्यामुळं आपण काल त्यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली तर आपण त्यांच्यासोबत जाऊ, असंही त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांशी भेटी दरम्यान इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत विविध विषयांबाबत चर्चा केली, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षासोबत युती कधी करायची ते ठरवावं, असं आवाहनही आंबेडकर यांनी यावेळी केलं.
****
राजमाता जिजाऊ तसंच स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. या निमित्तानं राज्यात आज सर्वत्र अभिवादनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथं महानगरपालिका मुख्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला आणि शहरातल्या टीव्ही सेंटर इथल्या स्वामी विवेकानंद उद्यानात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त ब.भि.नेमाने आणि रविंद्र निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरातल्या टीव्ही सेंटर परिसरातल्या स्वामी विवेकानंद उद्यानातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे तसंच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिवादन केलं. जालना शहरासह जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयं, शासकीय, निमशासकीय कार्यालयं आणि पक्ष संघटनांकडून विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातल्या छत्रपती संभाजी उद्यानापासून सकाळी दुचाकी फेरी काढण्यात देखील आली होती. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा इथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या स्मृतीस्थळी भेट देवून अभिवादन केलं.
****
भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात तीन बाद ६२ धावा केल्या आहेत. कोलकाता इथं इडन गार्डन मैदानावर सुरू या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करलेल्या श्रीलंका संघाचा डाव ३९ षटकं आणि चार चेंडुंमध्ये २१५ धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजनं ३० धावांमध्ये तीन तर कुलदीप यादवनही ५१ धावांमध्ये तीन गडी बाद केले. उमरान मलिकनं दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला. श्रीलंकेचा सलामीवीर नुवानीदू फर्नांडो यानं ६३ चेंडुंमध्ये ५० धावा करतांना एकाकी झुंज दिली.
****
रंगांचं संगीत ज्याला चित्रपटात खेळवता येतं तो खरा दिग्दर्शक असतो असं प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी केलं आहे. त्यांनी आज आठव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिनेमा आणि रंग’ या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन केलं, त्यावेळी खोपकर बोलत होते. रंग किंवा प्रकाश योजना हा चित्रपट दिग्दर्शकाचा दृष्टीकोन असतो. तो जेवढे रंग सिनेमातून दाखवतो तेवढेच रंग लपवून ठेवतो आणि ते फार महत्वाचं असतं, असंही खोपकर म्हणाले.
****
राज्यात परवा, शनिवारी मकर संक्रांती-भोगी सणाचा दिवस पौष्टिक तृण धान्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या गावांमध्ये कृषि विभागामार्फत १४ जानेवारी या दिवशी प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद मधील साजापूर पंचायत समितीचा ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण निकम याला नऊ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं आज अटक केली. शेतीचा नमुना क्रमांक आठ अचा उतारा देण्यासाठी रामकृष्ण निकम यानं ही लाच मागितली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.  
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
जी ट्वेंटी बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नये-मुख्यमंत्र्यांची सूचना
राज्यात कधीही निवडणुका झाल्या तरी महाविकास आघाडीचं सरकार येणार-खासदार संजय राऊत
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दिलासा
यंदाचा ग.दि.माडगुळकर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी यंत्रणा सज्ज
विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत महाराष्ट्राला हरवत सौराष्ट्र संघ विजयी
आणि
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून राज्य क्रीडा महोत्सव
****
जी ट्वेंटी परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नये अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतला, त्यावेळी ते बोलत होते. भारताला जी २० परिषदेचं अध्यक्षपद मिळालं असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारताकडे राहणार आहे. या कालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका होणार असून त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या महानगरांमध्ये होणार आहेत. या परिषदेच्या आखणी आणि नियोजनाकरता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमली आहे. भारताला जी २० परिषदेचं अध्यक्षपद मिळणं ही अतिशय गौरवशाली बाब असून राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं ब्रँडींग करण्याची ही संधी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता या वर भर द्यावा, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं येत्या १३ आणि १४ फेब्रुवारीला ही बैठक होणार आहे.
****
जत तालुक्यातील गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सीमा भागातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, वीज तसंच पायाभूत सुविधांबाबत संबंधित विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.
****
राज्यातील जनता शिवसेने सोबत असल्यामुळे कधीही निवडणुका झाल्या तरी कोणत्याही चिन्हावर राज्यात शिवसेनेसहित महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि शिवसेना त्याचं नेतृत्व करेल असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते काल नाशिक इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिकाही शिवसेनाच जिंकेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल तसंच पर्यटन मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं कथित आक्षेपार्ह विधान, सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सोडलेलं पाणी, आदी मुद्यांवरूनही राऊत यांनी राज्यसरकारवर कडाडून टीका केली.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम सुध��रणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकाला मान्यता मिळाल्यानं मुंबईतील धोकादायक तसंच उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले किंवा रखडलेले उपकरप्राप्त -सेस इमारत प्रकल्प म्हाडामार्फत ताब्यात घेऊन त्याचा पुनर्विकासही शक्य होणार आहे.
****
इटली मधल्या एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क या ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित असलेल्या कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जेसह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलं आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या कंपनीचे ग्लोबल बिझनेस डेवलपमेंट विभागाचे प्रमुख मार्सेलो कॅस्टीलो आगुर्तो यांनी काल फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर फडणवीस यांनी ही माहिती दिली. आगुर्तो यांनी, ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकी सोबतच त्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ भारतातच उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठीची व्यवस्था करणार असल्याचं सांगितलं.
****
भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिलासा दिला आहे. मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या २०१५ मधील आर्थिक अनियमितता प्रकरणात दरेकर यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रांद्वारे १२३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप दरेकरांवर करण्यात आला होता.
****
पोलिस विभागातल्या विविध संवर्गातल्या पदोन्नतीसाठी तात्पुरती निवड यादी तसंच सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याकरता एक हजार ३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. २८ नोव्हेंबर २०२२ ते काल ०२ डिसेंबर २०२२ या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार तासातच लोकसेवा आयोगाने निवड यादी तसंच सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमी इथं येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. सर्व सुविधांचा आढावा घेतल्यानंतर काल ते बोलत होते. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची तसंच बिस्किटांची सोय, आरोग्य सुविधा, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आच्छादन आणि कार्पेट टाकण्याची सूचना त्यांनी केली. फिरती स्वच्छतागृहं, थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटची व्यवस्था आदींचाही आढावा त्यांनी घेतला. अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था शिवाजी पार्क इथं करण्यात आली आहे.
****
गदिमा प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा ग.दि.माडगुळकर पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गदिमा यांच्या स्मृतिदिनी येत्या १४ तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासोबतच साधना बहुलकर यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार, अभिनेते प्रवीण तरडे यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका योगिता गोडबोले यांना विद्याप्रज्ञा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या समारंभात शितल माडगुळकर यांनी लिहिलेलं ‘गदिमांच्या पंचवटीतून’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
****
आकाशवाणीवरून आज डॉ राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानाचं प्रसारण होणार आहे. अमृत काल में भारतीयता हा यंदाच्या व्याख्यानाचा विषय आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला या विषयावर व्याख्यान देणार आहेत. आकाशवाणीवरून रात्री साडेनऊ वाजता या व्याख्यानाचं प्रसारण केलं जाईल. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९६९ पासून या व्याख्यानमालेला सुरूवात झाली आहे.
****
सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजने अंतर्गत नागरी विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, सोलापूर विकास मंचचे सदस्य केतनभाई शहा आणि योगीन गुर्जर यांच्या शिष्टमंडळानं काल शिंदे यांची भेट घेतली, त्यावेळी शिंदे बोलत होते. या विमानसेवेच्या मागणीसाठी सुरू असलेलं उपोषण थांबवण्याची विनंती शिंदे यांनी केली. या उपोषणाबाबत सोलापूर विकास मंचच्या इतर पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यंदाचा विजय हजारे क्रिकेट करंडक सौराष्ट्र संघानं जिंकला आहे. अहमदाबाद इथं काल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल सौराष्ट्र संघानं महाराष्ट्र संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्रानं निर्धारीत ५० षटकात ९ गडी बाद २४८ अशी धावसंख्या उभारली. त्यात कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीचा मोठा वाटा होता. वि़जयासाठी २४९ धावांचं लक्ष्य सौराष्ट्रनं २१ चेंडू आणि ५ गडी शिल्लक असताना सहज पार केलं. सौराष्ट्रनं दुसऱ्यांदा हा करंडक जिंकला आहे.
****
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आजपासून अंतिम १६ संघात लढती सुरू होणार आहेत. आज रात्री साडे आठ वाजता अमेरिका आणि नेदरलंड तर रात्री साडे बारा वाजता अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया संघात सामने होणार आहेत.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून सुरू होत असलेल्या राज्य क्रीडा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. या क्रीडा सोहळ्यात पाच खेळांचा समावेश करण्यात आला असून, दोन हजाराहून अधिक खेळाडू यात सहभागी होणार आहेत अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि खो-खो पुरुष तसं महिला गटात सहभागी होणारे संघ कालपासून दाखल व्हायला सुरवात झाली. विद्यापीठात क्रीडा विभाग परिसर इथं आज दुपारी तीन वाजता या स्पर्धांचं उद्‌घाटन होणार आहे.
****
प्रगतिशील लेखक संघाच्या वतीनं औरंगाबादेत आजपासून दोन दिवस ११वं कॉम्रेड अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे. आज सकाळी दहा वाजता तापडीया नाट्यमंदिर इथं कवी सतीश काळसेकर ग्रंथ दालनाचं उद्धाटन होऊन मुख्य उद्धाटन समारंभाला सुरुवात होईल. त्यापूर्वी सकाळी ८ वाजता औरंगपुरा परिसरातल्या सावित्रीबाई आणि जोतिबा फुले पुतळा परिसरातून संमेलन स्थळापर्यंत कविता फेरी काढण्यात येईल. या फेरीत मराठी - हिंदीतल्या निवडक कवींच्या कवितांचं खुल्या वाहनावरून सादरीकरण होईल. विविध विषयावरील परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, आणि अण्णाभाऊंची गाणी सादर होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
****
मीटर कॅलिब्रेशन तपासणीच्या नावाखाली अन्यायकारक दंड आकारणी बंद करावी या आणि अन्य मागण्यांसाठी आयटक संलग्न लाल बावटा रिक्षाचालक मालक संघटनेनं काल औरंगाबाद इथं प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शनं केली. मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदना द्वारे देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकानं मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला होता, या पार्श्वभूमीवर आर टी ओ ने रिक्षा स्टॅन्डवर जाऊन जागृती करावी अशीही मागणी करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत एक गावठी पिस्तुल, दोन काडतुसं आणि एक लोखंडी खंजीर जप्त केला आहे. कुरुंदा ते बोल्डा मार्गावर एका चारचाकीच्या तपासणीत ही शस्त्रं जप्त करण्यात आली. या प्रकरणी वसमत इथल्या कैलास शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
****
राज्यातली स्वस्त धान्य दुकानं महानगरपालिका क्षेत्रात नगरसेवकांच्या आणि नगरपंचायतीत सदस्यांच्या अध्यक्षतेखाली चालवण्यासाठी देण्यात यावी अशी मागणी राज्य प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. सगळ्या स्वस्त धान्य दुकानांचं लेखापरिक्षण करण्यात यावं, स्वस्त धान्य दुकानं महिन्याचे २४ दिवस उघडी ठेवण्यात यावीत आदि मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात एस टी बस आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी झाला. जांभरून आंध ते भोसी मार्गावर जांभळीफाट्याजवळ काल सकाळी हा अपघात झाला. मारुती जुमडे असं मृताचं नाव आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
जी - ट्वेंटी परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी भारताला मिळाली असून, या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा आज ९५वा भाग प्रसारित झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला इतक्या मोठ्या समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानं, ही बाब अधिकच खास झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जी - ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक आणि अभिमान बाळगला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 मध्ये सामील व्हा, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या माध्यमातून भारतानं पहिलं रॉकेट विक्रम एसचं यशस्वी उड्डाण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतातल्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय असून, आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात असल्याचं ते म्हणाले. ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात असल्याचं सांगुन पंतप्रधानांनी, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती, त्या गोष्टी आज आपले नागरिक आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत असल्याचं नमूद केलं. अलिकडच्या वर्षांत, आपल्या देशाने यशाचा मोठा पल्ला गाठला असून, आपण भारतीय, विशेषत: आपली तरुण पिढी आता थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात वाढली असून, यावरून भारतीय संस्कृती आणि संगीताचं वेड जगभरातच वाढलं आहे, हे लक्षात येत असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. विविध देशांमध्ये भारतीय संगीताबद्दलची आत्मियता त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून यावेळी विषद केली.
भारत देश जगातल्या सर्वात प्राचीन परंपरांचं माहेरघर आहे, याचा आपण खूप अभिमान बाळगतो. त्यामुळे आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित आणि जपून ठेवावं, त्याचं संवर्धन करावं आणि जितकं शक्य असेल तितकं त्याला पुढे न्यावं, ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशात सध्या शिक्षणाचं क्षेत्र उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, उत्तर प्रदेशचे जतिन ललितसिंह आणि झारखंडचे संजय कश्यप या दोन शिक्षकांच्या कार्याची माहिती दिली.
आज प्रत्येक देशवासी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य समजून आहे, देशावासियांच्या या प्रयत्नांना नमन करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 
****
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसि हे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून येणार आहेत. इजिप्तच्या राष्ट्रपतींची प्रजासत्ताक दिनाच्या येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि इजिप्तमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून, दोन्ही देश या वर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. भारताच्या जी-20 च्या अध्यक्षतेदरम्यान इजिप्तला 'अति��ी देश' म्हणून आमंत्रित करण्यात आलं असल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं.
****
स्पेन मध्ये झालेल्या जागतिक युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतानं चार सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकासह एकूण ११ पदक जिंकत दुसरं स्थान पटकावलं आहे. काल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुरेश विश्वनाथ, वंशराज, देविका घोरपडे आणि रविना यांनी सुवर्ण पदक जिंकलं. भावना शर्मा, कीर्ति आणि आशिष यांनी रौप्य, तर तमन्ना, कुंजरानी देवी, लशु यादव आणि मुस्कान यांनी कांस्य पदक जिंकलं.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता जपान विरुद्ध कोस्टारिका, संध्याकाळी साडे सहा वाजता बेल्जियम विरुद्ध मोरोक्को, रात्री साडे नऊ वाजता क्रोएशिया विरुद्ध कॅनडा, तर रात्री साडे बारा वाजता स्पेन विरुद्ध जर्मनी हे सामने होणार आहेत.
काल या स्पर्धेत अर्जेंटिनानं मेक्सिकोचा दोन - शून्य असा, तर फ्रान्सने डेन्मार्कचा दोन - एक असा पराभव केला. अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं ट्यूनिशियाचा एक - शून्य असा, तर पोलंडनं सौदी अरेबियाचा दोन - शून्य असा पराभव केला.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला. सामना सुरु झाल्यानंतर लगेच पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला, नंतर सामना २९ षटकांचा घेण्याचा निर्णय झाला. मात्र पाऊस सुरुच राहील्यानं सामना रद्द करण्यात आला. मालिकेत पहिला सामना जिंकून न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes