Tumgik
#शासकीय भरती
Text
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण Ukraine Students Education: फेब्रुवारीत रशिया-युक्रेनमधील संघर्षाने विघातक स्वरूप धारण केले. युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. त्यामध्ये हजारो भारतीयदेखील होते. भारत सरकारने सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणले होते. नागपुरातून एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचादेखील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 30 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट-भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह अमान्य - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात १९ रुपये कपात
आणि
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं ही माहिती दिली. शिवसेनेनं आज तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. नाशिकमधून हेमंत गोडसे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. ठाणे मतदारसंघात माजी महापौर नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार असतील.
****
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम परवा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी सुमारे २० वर्षानंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानं, राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या चर्चात्मक कार्यक्रमाचं आज आकाशवाणीवरुन प्रसारण होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरुन हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यात रोकडा सावरगाव इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रचार सभा घेतली. गरीब महिलांना मदत, सरकारी रिक्त पद भरती, शेतकरी कर्जमाफी, किमान हमी भाव कायदा, यासह अनेक मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं.
****
दरम्यान, मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, आपण केलेल्या कामाबद्दल ग्रामीण भागातले नागरिक समाधानी असल्याचा दावा औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केला आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक ही वैयक्तिक विषयांवर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढायला हवी, असं भुमरे यांनी सांगितलं.
****
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह मान्य ठरु शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पावित्र्य याबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी सारखे सोहळे आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. तरुण-तरुणींनी विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असं न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांनी नमूद केलं आहे.
****
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातल्या एका आरोपीने मुंबई पोलिसांच्या कोठडीत आत्महत्या केली आहे. अनुज थापन असं त्याचं नाव असून, त्याने चादरीच्या तुकड्याने स्वच्छतागृहात गळफास घेतल्याचं समोर आलं. कोठडीत झालेल्या या मृत्यूप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. गेल्या १४ एप्रिलला हा गोळीबार झाला होता.
****
व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो वजनी एलपीजी सिलिंडरच्���ा किमतीत १९ रुपयांनी घट झाली आहे. आजपासून ही दरकपात लागू झाली. आता या सिलिंडरची मुंबईत किरकोळ विक्री किंमत प्रतिसिलिंडर एक हजार ६९८ रुपये ५० पैसे असेल. दरम्यान, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
****
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन आज साजरा झाला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उद्यमशील, पुरोगामी, आणि कष्टाळू नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून, सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, तसंच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू या, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. नागरिकांनी मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी यावेळच्या भाषणातून केलं.
****
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिस मुख्यालयात पालकमंत्री मुंडे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संचलनाचं निरीक्षण केल्यावर उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोलिस उपनिरीक्षक अमोल आगलावे, हवालदार कृष्णा तंगे, पोलीस नाईक सचिन चौधरी, राजेश काळे, अनिल चंद्रहास, शिपाई किरण कणखर यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दहशतवाद विरोधी पथकातले दिलीप जाधव यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
****
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
****
हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी परेड सादर करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते, परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्याहस्ते तर, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
विभागात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या उन्हाळी शिबीरांमध्येही आज राज्यगीताचं गायन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
****
आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. विश्वात आर्थिक आणि सामाजिक अधिकार प्राप्तीसाठी श्रमिकांच्या बलिदानाची आठवण अर्थात श्रमिकांच्या योगदानाला सन्मानित करण्यासाठीचा हा दिवस मे दिन म्हणूनही ओळखला जातो.
****
आकाशवाणीच्या महासंचालक म्हणून मौसमी चक्रवर्ती यांनी आज पदभार स्वीकारला. भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेल्या मौसमी चक्रवर्ती यांचा माहिती क्षेत्रात तीन दशकांहून अधिक व्यापक अनुभव आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.
****
0 notes
itsmarttricks · 5 months
Link
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे भरती - GMC Nagpur Recruitment , जाहिरात क्र.: कॉलेज/गट ड वर्ग-4 /जाहिरात आस्था-4/24411/2023
0 notes
marmikmaharashtra · 8 months
Link
#सेनगाव #तहसील #कार्यालय #कंत्राटी #पद्धतीचे #सरकारी #नोकरी #भरती #जीआर #रद्द #करा #news #marmikmaharashtra
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
टिप्परची एसटी बसला धडक, अपघातात २२ प्रवासी जखमी
बुलढाणा : मेहकर-खामगाव मार्गावरील जानेफळ नजीकच्या समृद्धी महामार्गाच्या अंडरपास नजीक एसटी बस व रेतीवाहक टिप्परमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात सुमारे २२ प्रवासी जखमी झाले. जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. आज शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. Tipper collided with ST bus शेगाववरून मेहकरकडे ही मेहकर आगाराची बस येत असताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
अभियंत्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
अभियंत्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 28 : देशाच्या तसेच राज्याच्या विकासात अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. शासकीय सेवेतील त्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल. अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे राजपत्रित अभियंता संघटना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
अभियंत्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
अभियंत्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 28 : देशाच्या तसेच राज्याच्या विकासात अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. शासकीय सेवेतील त्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल. अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे राजपत्रित अभियंता संघटना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
दिव्यांग बांधवांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य द्या
दिव्यांग बांधवांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य द्या
एकता दिव्यांग विकास संस्थेची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वेधले लक्ष कणकवली : दिव्यांग बांधवांना शासकीय नोकर भरतीमध्ये चार टक्‍के आरक्षण आहे. मात्र प्रत्‍यक्ष नोकर भरतीमध्ये आरक्षणानुसार दिव्य��ंग बांधवांना न्याय दिला जात नाही. त्‍यामुळे यापुढील भरती मध्ये दिव्यांग बांधवांना आरक्षणानुसार प्राधान्य द्या अशी मागणी एकता दिव्यांग विकास संस्थेने आज केली. याबाबतचे निवेदन संस्थेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
GMC भरती: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1200 पदे रिक्त आहेत
GMC भरती: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1200 पदे रिक्त आहेत
मी ta प्रतिनिधी, औरंगाबादराज्यात डझनभर नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे; परंतु सध्या सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षकांची तब्बल १२०० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. ही पदे अनेक दिवसांपासून भरली जात नसताना आणि एकूणच वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावत असताना, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
snehalshelote · 2 years
Link
0 notes
Text
रिक्त पदांवर होणार शिक्षकांचे समायोजन
रिक्त पदांवर होणार शिक्षकांचे समायोजन
रिक्त पदांवर होणार शिक्षकांचे समायोजन Teachers in Schools:राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशत: अनुदानित शाळामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांचे पद कमी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येते. सेवा समाप्त होणाऱ्या शिक्षकांचे सद्यस्थिती असलेल्या नियमानुसार समायोजन करण्यात येत नाही. त्यामुळे राज्यातील वैयक्तिक मान्यता प्राप्त…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याच्या स्वप्नाला, महाराष्ट्र एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या रूपाने सहकार्य करेल - मुख्यमंत्र्यांची ग्वाही
विधीमंडळाचं हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित, आगामी अधिवेशन १० जून पासून मुंबईत
राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
आणि
उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
****
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला, महाराष्ट्र एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या रूपाने सहकार्य करेल, अशी ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधानसभेत काल राज्यातल्या कायदा सुव्यवस्था, उद्योग उभारणी, परदेशी गुंतवणूक, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी अनेक विषयांवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसह राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांतून शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत, एकूण ३५ हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सरकारने पुन्हा कार्यान्वित केल्याचं सांगत, ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विधीमंडळात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, हे अधिवेशन यशस्वी झाल्याचं नमूद केल. राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरच्या एकत्रित चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. राज्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्रानं पहिलं स्थान कायम राखलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
विधानसभेत काल विरोधकांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. या अर्थसंकल्पावरच्या चर्चेला अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. त्यांच्या उत्तरानं समाधानी नसलेल्या विरोधकांनी, या हंगामी अर्थसंकल्पात सामान्यांना न्याय मिळाला नसल्याचं कारण देत सभात्याग केला. त्यानंतर लेखानुदान प्रस्ताव मंजूर झाला.
****
यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्यातल्या जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका, विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वैनगंगा आणि नळगंगा प्रकल्प हा मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून, या प्रकल्पासाठी भरघोस निधी उपलध करून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
राज्याच्या विकासाचं हित न साधता सत्ताधाऱ्यांनी राजकारण करण्यासाठी या अधिवेशनाचा वापर केल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
****
राज्य विधीमंडळाचं हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. आगामी अधिवेशन १० जून पासून मुंबईत होणार आहे.
त्यापूर्वी महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयकाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. या विधेयकामध्ये मुंबई वगळून राज्यातल्या अन्य महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितींमध्ये, चार किंवा पाच सदस्य प्रभाग रचना करण्याची तरतूद आहे. सहकार आणि कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयकालाही दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. यासह एकूण नऊ विधेयकं संमत झाली, तर सहा विधेयक सयुंक्त समितीकडे पाठवण्यात आली. 
****
राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना, सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला. एक नोव्हेंबर २००५ रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू राहील. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी सुधारीत निवृत्तीवेतनाचा विकल्प दिल्यास, त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतकं निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसंच निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के इतकं कुटुंब निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. २००५ मध्ये भरतीची जाहिरात निघाली मात्र, भरती प्रक्रीया पूर्ण झाली नसल्यानं, कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांना जूनी निवृत्तवेतन योजना लागू क��ण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला, आव्हान दिलेल्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयात येत्या सात मार्च रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर, काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती केल्यानंतर, न्यायालयानं हे आदेश दिले. 
****
राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणं घटनाबाह्य असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीलाही त्यांनी आव्हान दिलं आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान, राजकीय पक्षांनी नियम आणि संकेतांचं पालन केलं पाहिजे, आचारसंहितेचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगानं दिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व लक्षात घेतानाच, प्रचार मोहिमा जबाबदारीनं पार पाडल्या जाणंही गरजेचं आहे, असंही आयोगानं म्हटलं आहे.
****
राज्यात उद्या तीन मार्च रोजी, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं लसीकरण करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत सुमारे दोन लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचं नियोजन आहे. यासाठी ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आल्याच महापालिकेच्या पत्रकात म्हटल आहे.
धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात तीन लाख ९९ हजार ६९८ बालकांना पोलिओ डोस दिला जाणार असून, दोन हजार ७६७ केंद्र तयार करण्यात आले आहेत.
लातूर शहरात एकूण २१५ पोलिओ लसीकरण केंद्रांसह, तीन फिरत्या पथकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
****
राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत जाहीर करणार असल्याचं, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिक्षकांना निवडणूकीची कामं दिली जातात, मात्र परीक्षेचं कामकाज आणि उत्तरपत्रिका तपासणीवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं गोसावी यांनी सांगितलं आहे.
****
वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढल्या, तरी लोकसभेच्या किमान सहा जागा आपण निवडून आणू शकतो, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीत लोकसभेसाठी १५ टक्के इतर मागासवर्ग - ओबीसीचे उमेदवार, किमान तीन अल्पसंख्याक उमेदवार असायला हवेत, यासाठी आपण आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अमरावती इथं मृद आणि जलसंधारण विभागाच्या पेपरफूटी प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांसह ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. २१ फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेत हा गैरप्रकार समोर आला होता. दरम्यान, ही परीक्षा रद्द करुन नव्यानं परीक्षा घेण्यात यावी तसंच पेपरफुटी प्रकरणी चौकशीची मागणी करत युवक काँग्रेसच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं ३९ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी, एकाला काल बीड स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. त्याच्याकडून नऊ लाख रुपये हस्तगत करण्यात आले. शहरातल्या राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची सुमारे ३९ लाख १६ हजार १६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग करुन चोरटे रोकड घेऊन फरार झाले होते.
****
लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने काल उदगीर इथ महासंस्कृती महोत्सवाचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याप्रसंगी 'मराठी बाणा' कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमापूर्वी स्थानिक कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर केले.
****
परभणी जिल्ह्यात लक्ष्मणनगर, गौंडगाव, आणि धारासूर डेपो गाळमिश्रित वाळू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीनं अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन वाळू खरेदी करता येणार असून याचा जास्तीत-जास्त जनतेनं लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
परभणी इथं येत्या पाच मार्च रोजी, जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या परिषदेच्या माध्यमातून, उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यवसाय यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.  
****
0 notes
nashikfast · 2 years
Text
पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार... talathi bharti in maharashtra 2022
पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार… talathi bharti in maharashtra 2022
♻️ नवीन जॉब अप्डेट्स येथे पहा..! ♻️ महाराष्ट्र तलाठी भरती 2022 : पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार 👉🏻 https://mahagov.info/talathi-bharti-2022-online-apply/ ♻️ शासकीय आयटीआय पिंपरी चिंचवड रोजगार मेळावा – 500 जागा 👉🏻 https://t.co/5tX8ArPZr7 ♻️ पुणे सिक्युरिटी गार्ड बोर्ड पात्र उमेदवारांनी प्रमाणपत्र ३१ मे२०२२ पर्यन्त पोर्टल वर जमा करावीत 👉🏻 https://t.co/aAZeDBRM3G ♻️ NHM वाशीम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे लवकरच भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन मुंबई, दि.22 : राज्यात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत दिली. (विधानपरिषद प्रश्नोत्तरे) नवीन शासकीय वैद्यकीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
विधानपरिषद प्रश्नोत्तरे - महासंवाद
विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे लवकरच भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन मुंबई, दि. 22 : राज्यात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
विधानपरिषद प्रश्नोत्तरे - महासंवाद
विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे लवकरच भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन मुंबई, दि. 22 : राज्यात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त…
View On WordPress
0 notes