Tumgik
#मालवण
kokannow · 2 years
Text
मालवण तालुका खरेदी विक्री संघावर भाजपचे वर्चस्व
मालवण तालुका खरेदी विक्री संघावर भाजपचे वर्चस्व
सर्व १५ जागांवर भाजप पुरस्कृत पॅनल विजयी महाविकास आघाडीला धक्का मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी सहकार विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवला. दरम्यान महाविकास आघाडी पॅनल चा सुफडा साफ झाला भाजप पुरस्कृत पॅनेल विजयी उमेदवारविजयी उमेदवारश्री.महेश बाळकृष्ण मांजरेकरश्री.कृष्णा पांडरंग चव्हाणश्री.अभय सखाराम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Link
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला उद्यापासून प्रारंभ
अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाची सुमारे तेराशे ऐंशी कोटी रुपयांची मागणी
नौदल अधिकाऱ्यांसाठी नवी स्कंधपट्टिका जारी;छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश
आणि
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या आरोग्य शिबिरांचा दोन कोटींहून अधिक नागरिकांना लाभ
****
जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना रेल्वेस्थानकात उद्या सकाळी अकरा वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विशेष कार्य्रकमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी आज जालना इथं दिली. दरम्यान, काल या गाडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जालना रेल्वेस्थानक परिसरात जय्यत तयारी केली जात आहे. जागतिक दर्जाच्या मानकांशी जुळणाऱ्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही वंदे भारत रेल्वे सर्वात जलद, सोयीस्कर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा सक्षम पर्याय ठरत आहे.
****
राज्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १२ लाख ८७ हजार १८५ हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. त्यासाठी कृषी विभागानं राज्य सरकारकडे १ हजार ३७९ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांना ही मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी कृषी विभागानं शासनाकडे केली आहे.
****
राज्यात चालू वर्षाच्या ऊस गाळप हंगामात आतापर्यंत एकूण ३४० कोटी ४३ लाख मेट्रिक टन उसाचं गाळप झालं, त्यातून २९३ कोटी ८१ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे. दरम्यान, यंदा सरासरी उत्पादनात सत्तावन्न दशांश टक्क्यांनी घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील २२, तर नांदेड विभागातील २९ कारखान्यांमध्ये यंदा ऊस गाळप सुरू आहे.
****
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिलं जाईल, त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला काही वेळ द्यावा, असं आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. नाशिक इथं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं आज पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी आत्तापर्यंत राज्य सरकारच्या प्रत्येक भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांनी मुंबईत ट्रॅक्टरसह येऊ नये आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहनही महाजन यांनी यावेळी केलं.
****
भारतीय नौदलानं आज एडमिरल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशातील स्कंधपट्टिका अर्थात खांद्यावरच्या पट्टीवर लावायचे मानचिन्ह प्रसिद्ध केलं. या चिन्हाचा आकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेसारखा असून यात अशोक चिन्ह लावण्यात आलं आहे. सर्वसमावेशक दीर्घकालीन दृष्टीकोन असा या चिन्हाचा अर्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण इथं ४ डिसेंबरला झालेल्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात यासंदर्भातली घोषणा केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३१ तारखेला सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे आठावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. न्यूज ऑन एआयआर या वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरून देखील हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या यू टयूब चॅनलवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या आरोग्य शिबिरांचा आतापर्यंत दोन कोटींहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. एक लाखांहून अधिक ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिकांच्या क्षेत्रात यात्रेच्या वाहनानं भेट दिली. या आरोग्य शिबिरांमध्ये ८० लाखांहून अधिक नागरिकांची क्षयरोगासाठी चाचणी झाली आणि त्यातल्या पावणे पाच लाखांहून अधिक संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
क्षयग्रस्त रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यासाठी ३६ हजारांहून अधिक रुग्णांच्या बँक खात्याची माहिती या दरम्यान गोळा झाली. साडे ८ लाख नागरिकांची सिकल सेलसाठी चाचणी झाली आणि त्यातल्या २७ हजारांहून अधिक रुग्णांचा रुग्णालयातून उपचार घेण्याचा सल्ला यात्रेत मिळाला. उच्च रक्तदाब, मधुमेह यासाठीही दीड कोटी नागरिकांची चाचणी झाली. साडे ३२ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड याअंतर्गत वितरीत झाली असून सुमारे दीड कोटी कार्ड तयार झाली आहेत
****
ही यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात हनुमान नगर परिसरात पोहोचली. नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. मंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना आयुष्मान कार्ड आणि गॅस जोडणी देण्यात आली. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उर्वरित कालावधीत सर्व समाज घटकांतील सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश कराड यांनी दिले. नागरिकांनीही या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन कराड यांनी केलं. ते म्हणाले -
यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीबांना घर देणे, उज्वला योजनेअंतर्गत गरीबांना गॅस देणे, आयुषमान भारत अंतर्गत पाच लाखाचा आरोग्याचा विमा देणे आणि त्याचबरोबर विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन लाखाची मदत देणे अशा बऱ्याच योजना माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात शहरी भागात आणि ग्रामीण भागात चालू आहेत. मी जनतेला आवाहन करतो, की या विकासाच्या यात्रेमध्ये आपण सामील व्हा आणि स्वतःचा विकास करा. तुमचा विकास म्हणजे भारताचा विकास. गरीबीरेषेच्या वर आपल्याला या सर्व लोकांना आणायचंय.
२४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नांदेड महापालिका हद्दीत उद्या समारोप होणार आहे. या यात्रेअंतर्गत आज नांदेड शहरात अण्णाभाऊ साठे चौकात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आयुष्यमान भारत कार्डसाठी नागरिकांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती दिली. सुमन धनाडे आणि निहाल शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
बाईट - सुमन धनाडे आणि निहाल शेख, जि.नांदेड
****
फ्रांस इथं होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी २३ वर्षाखालील युवकांनी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. इच्छुकांनी गुगल प्ले स्टोअरवरून 'स्कील इंडिया डिजीटल' हे ॲप डाऊनलोड करावं, या ॲपमध्ये नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होता येईल. एक जानेवारी २००२ किंवा त्यानंतर जन्मलेल्या उमेदवारांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
****
परभणी इथं आज पालम तालुक्यातल्या सिरपूर ते केरवाडी रस्त्याचे भूमीपूजन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झालं. रस्त्यांचा विकास तसंच त्यांच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही, असं गुट्टे यावेळी म्हणाले. सिरपूरसाठी तीन वर्गखोल्यांची मंजूरी आणि सभागृहासाठी अकरा लाख रूपयांच्या निधीची घोषणा गुट्टे यांनी यावेळी बोलताना केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात आठ जानेवारीला लोकशाही दिनाचं तसंच विभागीय महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी तक्रारदारांनी आपले अर्ज विहित मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयात जमा करावेत, असं कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त अयोध्या इथून आलेल्या अक्षता कलशाची धाराशिव शहरातून उद्या ३० तारखेला शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या अक्षता रथयात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 7 months
Text
सिंधुदुर्ग : मालवण तळाशील येथील भर समुद्रात अज्ञात मच्छिमारांचा राडा
https://bharatlive.news/?p=181883 सिंधुदुर्ग : मालवण तळाशील येथील भर समुद्रात अज्ञात मच्छिमारांचा ...
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
जो कालपण, जो आजपण अन जो उद्यापण तो फक्त #मालवण 🚩❤️ . Follow @mechakarmani for all Konkan photo's video's meme's art's quotes poems and stories. ▪ Use #️⃣mechakarmani and Tag your pictures to @mechakarmani to get featured in our page. ▪ DM your photographs *HD pic only . 📫 Repost @ghadi_vinay 📷 Click by @droneandframes . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कोकण म्हणजे निसर्ग, जत्रा, शिमगा, मालवणी खाजा , गणपती उत्सव, नवरात्री दिवाळी, लालपरी, कोंकणरेल्वे, माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, काजू, फणस, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भात शेती... निसर्ग सौंदर्याने नटलेली कोंकण महाराष्ट्र भूमी 🌾 🍋🌴 त्याच कोकणातील छायाचित्र चाकरमान्यांच्या नजरेतून पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani . तुम्ही काढलेले अप्रतिम फ़ोटोस आणि विडिओ असतील तर @mechakarmani ला नक्की Dm✉️ करा सुंदर फोटो तुमच्या नावानीशी पोस्ट केले जातील🙏 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #malvan #dronephotography #konkan #beauty_nature #naturegeography #picoftheday #konkangram #naturehome #costalkonkan #beachphotography #sindhudurg_tourism #konkan_kattaa #naturewallpaper #konkantourism #amezingview #maharashtra_igers #followers #beautiful #tourism #blue #nature #unseen #ran_vata #beach #kokancha_nisarga #top #maharashtra_clickers ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा..💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 👉 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . 💞 Follow us for unique creative and original Konkan content💗😍👍 (at आमचा मालवण) https://www.instagram.com/p/CDkg4nMlSKo/?igshid=185f5jceb4w6s
0 notes
digimakacademy · 4 years
Text
Sindhudurg Boat Capsize सिंधुदुर्गात विचित्र दुर्घटनेत दोन नौकांना जलसमाधी; ७ जण बचावले, १ बेपत्ता
Sindhudurg Boat Capsize सिंधुदुर्गात विचित्र दुर्घटनेत दोन नौकांना जलसमाधी; ७ जण बचावले, १ बेपत्ता
[ad_1]
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सर्जेकोटच्या समुद्रात एका विचित्र दुर्घटनेत दोन मच्छिमार नौकांना जलसमाधी मिळाली आहे. या दुर्घटनेत ७ मच्छिमार सुदैवाने बचावले असून १ मच्छिमार बेपत्ता आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. समुद्र खवळलेला असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. ( Sindhudurg Boat Capsize )
वाचा: गणपतीला गावी कसं जाणार?; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
मालवणच…
View On WordPress
0 notes
malvanikattaa · 4 years
Photo
Tumblr media
#गोठणे #मालवण PC- @Swapnil_H Loation -गोठणे-आचरा रोड स्पर्धक क्रमांक . 27 मालवणी कट्टा आयोजित "कोकण फोटोग्राफी स्पर्धा " #प्राउड2Bमालवणी #malvanikatta🐟 #मालवणी_कट्टा #कोकण #निसर्ग (at Achara) https://www.instagram.com/p/B9ZbgLDlOro/?igshid=jwiooe7il1tz
0 notes
kokannow · 2 years
Text
मालवण तालुक्यातील हडी गावचा जागरोत्सव आजपासून
मालवण तालुक्यातील हडी गावचा जागरोत्सव आजपासून
मालवण : मालवण तालुक्यातील हडी गावातील श्री पावणाई देवीचा वार्षिक जागरोत्सव आज, १३ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पार पडणार आहे. याबाबतची माहिती श्री देव नागेश्वर, पावणाई देवी, कालिकादेवी बाराचा पूर्वस देवस्थान कमिटी-हडी यांनी दिली आहे.या जागरोत्सवात रविवार, १३ नोव्हेंबर संध्याकाळी ४ वाजता हडी गाव रहाठीचे प्रस्थान नागेश्वर मंदिर ते पावणाई मंदिर, रात्री १० वाजता पालखी प्रदक्षिणा होईल.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष गावडे
संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष गावडे
सिंधुदुर्ग चिरेखाण व्यावसायिक संघटनेची स्थापना मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांची सभा कसाल येथील सिध्दीविनायक हॉल या ठिकाणी पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग चिरेखाण संघटनेची स्थापना करण्यात येऊन संघटनेच्या अध्यक्षपदी चौके येथील चिरेखाण व्यावसायिक संतोष गावडे यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या उपाध्यक्षपदी मिलिद साटम देवगड, दत्ताराम राऊळ- दोडामार्ग, चंद्रकांत हडकर- आचरा, महादेव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सर्जेकोट सुवर्णकडा येथे समुद्र धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन
आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सर्जेकोट सुवर्णकडा येथे समुद्र धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन
बजेट अंतर्गत १ कोटी २८ लाख रु निधी मंजूर मालवण : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील सर्जेकोट पिरवाडी (सुवर्णकडा) येथे समुद्र धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर केला असून त्यासाठी बजेट अंतर्गत १ कोटी २८ लाख रु निधी मंजूर केला आहे. गुरुवारी सायंकाळी या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. धुपप्रतिबंधक बंधारा मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थ व मच्छिमारांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
मालवणचा ऐतिहासिक श्री देव रामेश्‍वर पालखी सोहळा २६ ऑक्टोबर रोजी
मालवणचा ऐतिहासिक श्री देव रामेश्‍वर पालखी सोहळा २६ ऑक्टोबर रोजी
देऊळवाडा येथून होणार प्रारंभ मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणी श्री देव रामेश्‍वर यांच्या वार्षिक पालखी सोहळ्याला बुधवार, २६ ऑक्टोबर २०२२ या दिवशी दुपारी १२ वाजता देऊळवाडा येथील श्री देव रामेश्‍वर मंदिर येथून प्रारंभ होणार आहे. श्री देव रामेश्‍वर आणि श्री देव नारायण यांच्या अधिपत्याखाली येणार्‍या भगिनींच्या भाऊबिजेकरिता काढण्यात येणारी ऐतिहासिक पालखी मिरवणूक हे मालवणच्या दिवाळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
मच्छीमार प्रतिनिधींनी मानले आम.नितेश राणे यांचे आभार.
मच्छीमार प्रतिनिधींनी मानले आम.नितेश राणे यांचे आभार.
मालवण : कोकण किनाऱ्यावरील रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर देवगड तालुक्यातील गिरये येथे मत्स्य महाविद्यालय प्रस्तावित आहे .तसेच सदरच्या महाविद्यालया बाबत मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे . सदरचे महाविद्यालय बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत असणार आहे असे कणकवली देवगड चे आमदार श्री. नितेश राणे यांनी नुकतेच जाहीर केले.रत्नागिरी ,सिंधुदुर्ग रायगड,पालघर,ठाणे या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांचा मित्रमंडळासह भाजप पक्षात प्रवेश
सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांचा मित्रमंडळासह भाजप पक्षात प्रवेश
भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश मालवण : मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी मित्रमंडळासह रविवारी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
असरोंडी येथील नवरात्रौउत्सव मंडळास आमदार वैभव नाईक यांची भेट
असरोंडी येथील नवरात्रौउत्सव मंडळास आमदार वैभव नाईक यांची भेट
मालवण : तालुक्यातील असरोंडी गावातील श्री लिंगेंश्वर पावणादेवी नवरात्रउत्सव मंडळ, असरोंडी त्याचप्रमाणे शिवसेना शाखा आणि प्रशांत सावंत मित्रमंडळ असरोंडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या नवरात्री उत्सवास कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी आमदार नाईक यांनी स्थापन केलेल्या देवीची आरती करून विभागातील सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
रोटरी क्लब मालवण तर्फे श्रवणदोष चिकित्सा शिबीर
रोटरी क्लब मालवण तर्फे श्रवणदोष चिकित्सा शिबीर
मालवण : दि २३ सप्टेंबर रोजी रोटरी क्लब मालवण तर्फे शालेय मुलांची श्रवणदोष तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते .यामधे कन्याशाळेतील तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ऑडिओमेट्रि मशीनद्वारे तपासणी करण्यात आली .रोटरी क्लब माहीम व मैत्रेयी महिला मंडळ ट्रस्ट च्या अध्यक्षा रो .डॉ .लतिका बांदेकर यांनी हि तपासणी केली .दोष आढळलेल्या मुलांना योग्य तो सल्ला देण्यात आला .यावेळी संस्थेचे अध्यक्ष रो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
हिंदी भाषेचा प्र���ार व प्रसार केला पाहिजे - प्रा. डॉ. देविदास बोर्डे
हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे – प्रा. डॉ. देविदास बोर्डे
मालवण : भारतात हिंदी भाषा जास्त लोक बोलू शकतात, म्हणूनच या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून निवडण्यात आले. हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे असे प्रतिपादन पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे प्रा. डॉ. देविदास बोर्डे यांनी येथे बोलताना केले.मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी भाषा दिन सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम गुरुवारी महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes