Tumgik
#किदाम्बी श्रीकांत
dainiksamachar · 8 months
Text
फाइनल में हार भी बैडमिंटन टीम ने रचा इतिहास, 37 साल बाद भारत ने जीता मेडल
हांगझाऊ: चोटिल एच एस प्रणय की कमी भारत को खली और शुरूआती दो मैच जीतने के बाद चीन के हाथों फाइनल 2-3 से हारने के कारण उसे एशियाई खेलों में पुरूष टीम चैम्पियनशिप में सिल्वर मेडल से संतोष करना पड़ा। दुनिया के सातवें नंबर के खिलाड़ी प्रणय कमर की चोट के कारण नहीं खेल सके। लक्ष्य सेन ने पहला सिंगल और सात्विक साइराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी ने युगल मैच जीतकर भारत को 2-0 की बढत दिलाई थी। इसके बाद दारोमदार किदाम्बी श्रीकांत पर था जिन्होंने दक्षिण कोरिया के खिलाफ सेमीफाइनल में उम्दा प्रदर्शन किया था। इस बार वह उस लय को कायम नहीं रख सके और हार गए। चीन ने बाकी दोनों मैच जीतकर अपना दबदबा बरकरार रखा। लक्ष्य सेन ने दुनिया के छठे नंबर के खिलाफ शि युकी के खिलाफ पहला मैच 22-20, 14- 21, 21-18 से जीता। इसके बाद दुनिया की तीसरे नंबर की जोड़ी सात्विक और चिराग ने दुनिया की दूसरे नंबर की जोड़ी लियांग वेइ केंग और वांग चांग को 21-15 ,21-18 से हराया। श्रीकांत को आल इंग्लैंड चैम्पियन लि शिफेंग ने 24-22, 21-9 से हराया। दूसरे युगल मुकाबले में ध्रुव कपिला और साइ प्रतीक कृष्णा प्रसाद को दुनिया की आठवें नंबर की जोड़ी लियू यू चेन और यू शुआन यि ने 21-6, 21-15 से मात दी। वहीं प्रणय की जगह खेल रहे मिथुन मंजूनाथ को वेंग होंग यांग ने 21-12, 21- 4 से हराया। इस हार के बावजूद भारतीय टीम का प्रदर्शन शानदार रहा जिसने बैडमिंटन में दूसरा सिल्वर मेडल दिलाया। इससे पहले 2018 में पी वी सिंधू ने महिला सिंगल में सिल्वर मेडल जीता था। भारतीय बैडमिंटन पुरूष टीम ने इससे पहले 1986 में सियोल में मेडल जीता था जब प्रकाश पादुकोण और विमल कुमार टीम का हिस्सा थे। http://dlvr.it/SwrvzC
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 16 June 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १६ जून  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
सर्व शाळांमध्ये सिनियर आणि ज्युनियर केजीचे वर्ग सुरू करण्याचा राज्यसरकारचा निर्णय
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात;शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्री
चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारकडून खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात
औरंगाबाद इथं राज्य कामगार विमा आयुक्तालय दोनशे खाटांचं सुसज्ज रुग्णालय उभारणार
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
आणि
स्कॅश विश्वचषक स्पर्धेत भारत प्रथमच उपान्त्य फेरीत दाखल
सविस्तर बातम्या
शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्ग अर्थात सिनियर आणि ज्युनियर केजीचे वर्ग सुरू केले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यात आलं असून, दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेलं एकच पुस्तक आणयचं असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
****
नवीन शैक्षणिक वर्षाला कालपासून सुरुवात झाली. राज्यभरात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला.
औरंगाबाद शहरात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प, मिठाई  देऊन स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्या दिवशी करावयाच्या कार्यवाही संदर्भात शिक्षण विभागानं दिलेल्या निर्देशानुसार सकाळी शाळेच्या परिसरात गीत, घोषणाबाजी करत प्रभातफेरी काढण्यात आली. तसंच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं.
शहरालगत नारेगाव इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शाळा काल उत्साहात सुरू झाल्या. सर्व शाळांमध्ये सजावट करुन विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.
धुळे शहरासह जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्येही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
सोलापूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुलाबाची फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.
नाशिक इथं विद्यार्थ्यांची घोड्यावर मिरवणूक, ढोलताशांचा गजर, शाळेच्या प्रांगणात काढलेल्या रांगोळ्या अशा प्रसन्न वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्य��त आला.
****
राज्यात साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यातले शेतकरी, ऊस वाहतूकदार तसंच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. तसंच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं. राज्यातल्या ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजार ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला, शेतमाल शहरात आणि विविध परिसरात सहजपणे पोहचतो. यासाठी, वाहतूक परवाना आणि अनुषंगिक बाबींसाठी पणन विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 
****
पालघर इथं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी मेळावा झाला. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 
Byte…
अतिशय उदंड असा प्रतिसाद शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मिळतोय.  शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी विद्यार्थी तरूण हे सगळे केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय. सर्वसामान्यांचा आयुष्यामधे चांगले दिवस आणणे हाच आमचा उद्देश आहे. यापूर्वी देखील सहा - सात ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम झाले. हा एक दिवसाचा कार्यक्रम नाहीये. आत्तापर्यंत जवळपास ३५ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपला शासन पोहचलेलं आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती दिली.
****
राज्यातलं शिंदे - फडणवीस सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. नंदुरबार इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते काल बोलत होते. हर सरकार जनतेचा पैसा जाहिरातबाजीवर खर्च करत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केलं.
****
राज्यात काही समाज कंटकांकडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून, यामुळे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्यानं या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालण्याची विनंती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या सर्व घटनांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी, त्यांनी या पत्रात केली आहे.
****
भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाअंतर्गत डब्ल्यू - 20 कार्यगटाची तिसरी बैठक काल चेन्नईनजीक महाबलिपूरम इथं सुरू झाली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी डब्ल्यू-20 प्रतिबद्धता गटाचं निवेदन जारी केलं. लिंगाधारित डिजिटल तफावत दूर व्हायला हवी, तसंच गरीब आणि आदिवासी समुदायांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करणारा भाषेशी संबंधित  भेदभाव दूर व्हायला हवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, जी - 20 कृषी मंत्र्यांची बैठक काल हैदराबाद इथं सुरु झाली. कृषी क्षेत्रातल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यायला हवं, आणि यासाठी जी - 20 हे योग्य व्यासपीठ असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. ते काल या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. पीक विविधतेसाठी धोरण आखणं आणि हवामान बदलाशी सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवं असं ते म्हणाले.
****
ग्राहकांना परवडणाऱ्या दरात खाद्यतेल उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकारनं खाद्यतेलांवरचं मूलभूत आयात शुल्क कमी केलं आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं याबाबतचा आदेश जारी केला होता. त्यानुसार रिफाईन्ड सोयाबीन तेल, आणि रिफाईन्ड सूर्यफूल तेलावरचं मूलभूत आयात शुल्क कालपासून साडे सतरा टक्क्यावरून साडेबारा टक्के करण्यात आलं आहे. हा दर ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे किरकोळ विक्रीचे दर कमी व्हायला मदत होईल.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२१ चा अंतिम निकाल काल जाहीर झाला. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद चौगुले हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रथम,  सोनाली म्हात्रे महिलांमधून, तर विशाल यादव मागासवर्ग उमेदवारांमधून प्रथम आले आहेत.
****
औरंगाबाद इथं राज्य कामगार विमा आयुक्तालय यांच्याकडून कामगार रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असून, त्यामध्ये वाढीव दोनशे खाटांचं सुसज्ज रुग्णालय सुरू होणार असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितलं आहे. काल औरंगाबाद इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.  या रुग्णालयासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने तातडीनं जागा उपलब्ध करून द्यावी, आणि राज्य शासनाकडे रुग्णालयाचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना कराड यांनी यावेळी केल्या.
****
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतनं भारताच्याच लक्ष्य सेनचा २१-१७, २२-२० असा पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं हाँगकाँगच्या अँगस एनजी कालाँग याचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला तैवानच्या ताईत्झू-यिंगकडून २१-१८, २१-१६ असा पराभव पत्करावा लागला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या स्कॅश विश्वचषक स्पर्धेत भारत पहिल्यांदाच उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. ब गटातल्या काल झालेल्या सामन्यात भारतानं जपानचा तीन - एक असा पराभव केला. उपान्त्य फेरीत भारताचा सामना मलेशियासोबत होणार आहे.
****
बिपरजॉय चक्रीवादळ काल रात्री गुजरातच्या क��्छ आणि सौराष्ट्रच्या किनाऱ्याला धडकून पुढे सरकलं, त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. ताशी १४५ किलोमीटर वेगानं धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे. किनारपट्टीच्या भागातून एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हे वादळ उद्या दक्षिण राजस्थानमध्ये पोहोचेल. त्यामुळे तिथे हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सखल भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
संपूर्ण देशभरात येत्या २३ जून पासून मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. २३ जूनपासून मध्य भारत तसंच महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनची सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
****
राज्य ��रकारनं गायरानधारकांना जमिनी सोडण्यासंदर्भात बजावलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीसाठी लाल बावटा शेत मजूर संघातर्फे काल औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं. राज्यातल्या दोन लाख २२ हजार १५३ गायरान धारकांना गेल्या सहा महिन्यांपासून या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये गायरान जमिनीवर राहत असलेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून घर मंजूर झाली आहेत त्यांना बेघर करु नये, सुमारे तीस ते चाळीस वर्षांपासून जमिनी कसणाऱ्यांना शेती करू द्यावी, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
****
नांदेड रेल्वे विभागात काल आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विभागीय रेल्वे व्यवस्थापन नीति सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रेल्वे फाटकांवर जनजागृती अभियान राबवण्यात आलं. नगरसोल, आदिलाबाद, परभणी आणि पूर्णा रेल्वे स्थानकाजवळच्या फाटकांवर नागरीकांमध्ये पत्रकांद्वारे जनजागृती करण्यात आली. तसंच उद्घोषणा प्रणालीद्वारे मुदखेड - परभणी सेक्शन मधल्या नागरीकांचं समुपदेशन करण्यात आलं.
****
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहकांना महावितरणने टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप, मिस कॉल आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध करून ‍दिलेली आहे. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार याच पर्यायांद्वारे करावी, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाद्वारे करण्यात आलं आहे. मिस कॉलद्वारे तक्रार करण्यासाठी शून्य २ २ - ५० ८९ ७१ शून्य शून्य हा क्रमांक असून, महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
****
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये नांदेडमधल्या इंग्रजी माध्यमाच्या काही नामांकित निवासी शाळांत शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पालकांनी येत्या ३० तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असं आवाहन नांदेडच्या समाज कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
****
0 notes
navabharat · 2 years
Text
श्रीकांत ने सेन को हराया, समीर की अप्रत्याशित जीत
श्रीकांत ने सेन को हराया, समीर की अप्रत्याशित जीत
पेरिस. भारत के किदाम्बी श्रीकांत ने हमवतन लक्ष्य सेन को हराकर फ्रेंच ओपन सुपर 750 बैडंिमटन टूर्नामेंट के दूसरे दौर में प्रवेश कर लिया. वहीं समीर वर्मा ने इंडोनेशिया के एंथोनी सिनिसुका ंिगंिटग पर अप्रत्याशित जीत दर्ज करके दूसरे दौर में जगह बनाई . विश्व चैम्पियनशिप 2021 रजत पदक विजेता श्रीकांत ने सेन को 46 मिनट में 21 . 18, 21 . 18 से मात दी. श्रीकांत का सामना अब डेनमार्क के रास्मस गेमके और आयरलैंड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Japan Open 2022: पराभवानंतर लक्ष्य सेन आणि सायना नेहवाल स���पर्धेतून बाहेर
Japan Open 2022: पराभवानंतर लक्ष्य सेन आणि सायना नेहवाल स्पर्धेतून बाहेर
Japan Open 2022: पराभवानंतर लक्ष्य सेन आणि सायना नेहवाल स्पर्धेतून बाहेर जपान ओपनमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी काही विशेष झाली नाही. पीव्ही सिंधूच्या अनुपस्थितीत लक्ष्य सेन आणि सायना नेहवालसारख्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण दोघांनीही निराशा केली आहे. आता किदाम्बी श्रीकांत हा भारतात एकमेव आहे. श्रीकांतने … जपान ओपनमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी काही विशेष झाली नाही. पीव्ही सिंधूच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कॉमनवेल्थ गेम्स 2022 दिवस 7 लाइव्ह अपडेट्स: अमित पंघलची चढाओढ सुरू होणार आहे, पीव्ही सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत विजयी | राष्ट्रकुल खेळ बातम्या
कॉमनवेल्थ गेम्स 2022 दिवस 7 लाइव्ह अपडेट्स: अमित पंघलची चढाओढ सुरू होणार आहे, पीव्ही सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत विजयी | राष्ट्रकुल खेळ बातम्या
CWG 2022: अमित पंघाल कृतीत आहेत.© एएफपी राष्ट्रकुल खेळ, दिवस 7, थेट अद्यतने: हिमा दासने महिलांच्या 200 मीटरच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर शटलर पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या 32 च्या फेरीतील सामना जिंकला आहे. किदाम्बी श्रीकांत अॅक्शनमध्ये आहे. भारतीय संघाने आतापर्यंत चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पाच सुवर्णांसह 18 पदके जिंकली आहेत. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेच्या सातव्या दिवशी दीपिका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
राष्ट्रपतींनी थॉमस चषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले, देशाला आपल्या चॅम्पियन्सचा अभिमान आहे
राष्ट्रपतींनी थॉमस चषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले, देशाला आपल्या चॅम्पियन्सचा अभिमान आहे
थॉमस कप 2022: भारतीय बॅडमिंटन संघाने रविवारी इतिहास रचला. त्यांनी 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करून थॉमस कप जिंकला. त्यानंतर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी रविवारी प्रथमच थॉमस चषक जिंकल्याबद्दल भारतीय बॅडमिंटन संघाचे अभिनंदन केले आणि म्हटले की भारताला त्यांच्या चॅम्पियन्सचा अभिमान आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन केले त्यांनी ट्विट केले की, “थॉमस कपमध्ये भारतीय…
View On WordPress
0 notes
onlyhindinewstoday · 4 years
Text
Badminton PV Sindhu and Kidambi Srikanth to Lead India in Thomas and Uber Cup Final
Badminton PV Sindhu and Kidambi Srikanth to Lead India in Thomas and Uber Cup Final
विश्व चैम्पियन पी वी सिंधु और दुनिया के पूर्व नंबर एक खिलाड़ी किदाम्बी श्रीकांत अगले महीने थॉमस और उबेर कप फाइनल में भारत की 20 सदस्यीय बैडमिंटन टीम की अगुवाई करेंगे। भारतीय बैडमिंटन संघ ने गुरुवार को यह जानकारी दी। विश्व चैम्पियनशिप कांस्य पदक विजेता बी साइ प्रणीत ने घुटने की चोट के कारण टूर्नामेंट से नाम वापिस ले लिया है। एकल में दारोमदार पारूपल्ली कश्यप और फॉर्म में चल रहे लक्ष्य सेन पर…
View On WordPress
0 notes
doonitedin · 5 years
Photo
Tumblr media
इंडोनेशिया मास्टर्स: आज खेलेंगे साइना,सिंधु और श्रीकांत सायना नेहवाल, पी. वी. सिंधु और किदाम्बी श्रीकांत जकार्ता में इंडोनेशिया मास्टर्स बैडमिंटन टूर्नामेंट के क्वार्टर फाइनल में पहुंच गए हैं। महिला सिंगल्स में सायना ने इंडोनेशिया की फितरानी फितरानी को, सिंधु ने इंडोनेशिया की ग्रेगोरिया मारिस्का को, जबकि पुरूष सिंगल्स में श्रीकांत ने जापान के केंटा निशिमोतो को हराया। इंडोनेशिया मास्टर्स में आज भारतीय बैडमिंटन के तीन स्टार खिलाड़ी साइना सिंधु और श्रीकांत की तिकड़ी क्वार्टरफ़ाइनल मुक़ाबला खेलने कोर्ट पर उतरेगी। जहां पुरूष वर्ग में श्रीकांत का सामना इंडोनेशिया के जोनाथन क्रिस्टी से होगा। वहीं महिला वर्ग मे पी.वी.सिंधु का सामना क्वार्टरफ़ाइनल में स्पेन की कैरोलीना मारिन से होगा जबकि वहीं साइना नेहवाल थाईलैंड की पॉर्नपावे चोचूवैंग से भिड़ेंगी।
0 notes
mrdevsu · 3 years
Text
Tokyo Olympics से पहले भारतीय बैडमिंटन स्टार पीवी सिंधु का बड़ा बयान आया सामने, कही ये बात
Tokyo Olympics से पहले भारतीय बैडमिंटन स्टार पीवी सिंधु का बड़ा बयान आया सामने, कही ये बात
नई: भारतीय महिला स्टार खिलाड़ी पीवी से लेकर को की उम्मीद है। इस बीच एक बैठक कार्यक्रम होता है. ओलंपिक ️ सिंधु ने बैठक में " अपडेट के लिए भी अपडेट करें। प्राप्त करने के लिए प्राप्त करना। अन्य समान समान उत्कृष्टता वाले खिलाड़ी समान हैं। " सिंधु यौन व्यवहार करने वाले खिलाड़ी, महिला एकल वर्ग के लिए क्वालीफाई करते हैं। यह भी कहा गया था कि रद्द किया गया है और रद्द किया गया है। कहा, "उत्पादकता में सुधार…
View On WordPress
0 notes
Tumblr media
0 notes
realtimesmedia · 2 years
Text
BWF Ranking: कांस्य पदक जीतने के बाद Srikanth Kidambi की शीर्ष 10 में वापसी
BWF Ranking: कांस्य पदक जीतने के बाद Srikanth Kidambi की शीर्ष 10 में वापसी
नई दिल्लीः विश्व चैंपियनशिप में पदक जीतने के दम पर भारत के किदाम्बी श्रीकांत को विश्व बैडंमिटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) की ताजा विश्व रैंकिंग में चार पायदान का फायदा हुआ और वह फिर से शीर्ष 10 में शामिल हो गए। गुंटूर के इस 28 वर्षीय खिलाड़ी को स्पेन के हुएलवा में अच्छे प्रदर्शन का फायदा मिला और वह 10वें स्थान पर पहुंच गए हैं। विश्व चैंपियनशिप में कांस्य पदक जीतने वाले युवा लक्ष्य सेन भी दो पायदान ऊपर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
****
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग मंदावला.
राज्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ.
आणि
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
****
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पालघर इथं `शासन आपल्या दारी` मेळावा झाला, त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले...
शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला-भगिनी, विद्यार्थी, तरुण हे सगळे केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय. दोन लाख १२ हजार ६८३ लाभार्थ्यांना जवळपास २१२ कोटी रुपयांचा लाभ या शासन आपल्या दारी या योजनेतून होणार आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणने हाच आमचा उद्देश आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. त्यांनी राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती दिली.
****
बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग गेल्या काही तासांमध्ये मंदावला असल्याची माहिती गुजरातचे मदत आयुक्त आलोक पांडेय यांनी दिली आहे. हवामान विभागानुसार या चक्रीवादळाची गती मंदावली असून आज रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान हे वादळ किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा वेग सध्या कमी झाला आहे पण धोका कायम आहे. प्रशासनानं खबरदारीचे सर्व उपाय योजले असल्याची माहितीही पांडेय यांनी दिली.
****
संपूर्ण देशभरात येत्या २३ जून पासून मान्सून सक्रीय होणार आहे. हवामान विभागानं आज हा अंदाज व्यक्त केला. २३ जूनपासून मध्य भारत तसंच महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून बरसण्याचा अंदाज आहे. गेल्या ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिरानं मान्सून धडकल्यानं महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याचा अंदाज होता. मा ११ जून रोजी मान्सूननं महाराष्ट्रात काही ठिकाणी हजेरी लावली होती.
****
उन्हाळी सुट्ट्यांमुळं गेल्या दिड महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातल्या सर्व शाळा आज सुरू झाल्या. औरंगाबादमध्ये विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा पार पडला.  विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, मिठाई  देऊन स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्या दिवशी करावयाच्या कार्यवाही संदर्भात शिक्षण विभागानं दिलेल्या निर्देशानुसार सकाळी शाळेच्या परिसरात गीत, घोषणाबाजी करत प्रभातफेरी काढण्यात आली. तसंच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं. धुळे शहरासह जिल्हयातल्या सर्व शाळांमध्येही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. सोलापूर इथे आज शाळेच्या पहिल्या दिवशी  शाळेत आलेल्या  मुलांचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गुलाबाची फुलं देऊन स्वागत केलं.
****
तिसऱ्या आणि अंतिम कार्यगटाची `डब्ल्यू २०` ची बैठक आजपासून चेन्नईनजीक महाबलीपूरम इथं सुरू झाली. महिला आरोग्याशी निगडीत भेदभाव, स्त्री पुरुष समानता, सामाजिक तसंच आर्थिक विकास साध्य करण्यासाठीचे उपाय, या विषयांवर या बैठकीत पहिल्या सत्रात चर्चा झाली. जगभरातले सुमारे २७ कोटी लोक कुटुंब नियोजन करत नाहीत. अशा परिस्थितीत माता मृत्यूंवर नियंत्रण आवश्यक असल्याचं संयुक्त राष्ट्र जनसंख्या कोषच्या भारताच्या प्रतिनिधी एंड्रिया वॉजनर यांनी या बैठकीत नमूद केलं. कमी वयात होणाऱ्या विवाहांमुळं महिलांच्या होत असलेल्या शल्यचिकित्सा ही चिंताजनक बाब असल्याचं त्या म्हणाल्या. ही समस्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारांनी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषण प्रकरणात निर्दोषत्व दिलं आहे. त्यांच्या विरोधात सात कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या प्रकरणात दोन न्यायालयांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. पटियाला हाऊस न्यायालयात अल्पवयीन मुलीनं केलेल्या तक्रारीसंदर्भातला अहवाल पोलिसांनी सादर केला. त्यात अल्पवयीन महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही. त्यामुळं संबंधित कायद्यांतर्गत ब्रिजभूषण यांच्यावर कुठलेही आरोप लावता येणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
                                       ****
चर्मोद्योग उद्योगासाठी लागू करण्यात आलेले गुणवत्ता नियंत्रण आदेश या क्षेत्रात परिवर्तन घडवणारे ठरतील, असं केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारतीय पादत्राणे उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना ते बोलत होते. या आदेशांमुळे भारताचा ब्रँड प्रस्थापित होईल आणि भारतीय उत्पादनांचं मूल्य वाढेल, असं त्यांनी सांगितलं. या आदेशाचा अंगिकार करण्याच्या दृष्टीनं काम करू असं सांगत चर्मोद्योग क्षेत्रातील संघटनांनी या आदेशांचं स्वागत केलं आहे.
****
जकार्ता इथ खेळल्या जात असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. किदाम्बी श्रीकां��ने देशबांधव लक्ष्य सेनचा २१-१७, २२-२० असा सहज पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं हाँगकाँगच्या अँगस एनजी कालाँग याचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला. महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू तैवानच्या ताईत्झू-यिंगकडून २१-१८, २१-१६ अशी पराभूत झाली. इतर भारतीय बॅटमिंटनपटू प्रियांशू राजावत आज इंडोनेशियाच्या एंगस ए एस सोबत लढेल, तर पुरुष दुहेरीत रँकिरेड्डी शेट्टी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा सामना चीनच्या हे जितिंग आणि झोऊ हाओडोंग यांच्याशी होत आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावरुन दुपारी साडे चार वाजता सुटणारी रेल्वेगाडी विशाखापटणम एक्स्प्रेस आज उशिरा धावत आहे. रेल्वे जनसंपर्क विभागानं दिलेल्या माहितीनुसार ही रेल्वे आज १७५ मिनिटं उशिरा धावत असून संध्याकाळी सात वाजून २५ मिनिटांनी नांदेडहून सुटेल.
****
राज्य सरकारनं गायरानधारकांना जमिनी सोडण्यासंदर्भात बजावलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीसाठी लाल बावटा शेत मजूर संघातर्फे आज औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं. पैठण गेट इथं या आंदोलनांतर्गत `जेल भरो` सत्याग्रह करण्यात आला. राज्यातल्या दोन लाख २२ हजार १५३ गायरान धारकांना गेल्या सहा महिन्यांपासून या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये गायरान जमिनीवर राहत असलेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून घरं मंजूर झाली आहेत त्यांना बेघर करु नका. सुमारे तीस ते चाळीस वर्षांपासून जमिनी कसणाऱ्यांना शेती करू द्या,  आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
****
नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी राज्य शासनानं जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची घोषणा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भातल्या मागण्यांचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२६मध्ये होणार असल्यानं राज्य तसंच केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, असं त्यांनी सूचवलं आहे.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आजपासून खान्देश दौऱ्यावर असून आज सकाळी नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुरमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून या सकाळच्या सत्रात त्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.
****
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये नांदेडमधल्या इंग्रजी माध्यमाच्या काही नामांकित निवासी शाळांत शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पालकांनी येत्या ३० तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असं आवाहन नांदेडच्या समाज कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
****
0 notes
navabharat · 2 years
Text
सिंधू और श्रीकांत बैडमिंटन एकल प्री क्वार्टरफाइनल में
सिंधू और श्रीकांत बैडमिंटन एकल प्री क्वार्टरफाइनल में
बर्मिंघम. शीर्ष भारतीय बैडमिंटन खिलाड़ी पीवी सिंधू और किदाम्बी श्रीकांत ने गुरूवार को यहां आसान जीत दर्ज कर राष्ट्रमंडल खेलों की अपनी अपनी एकल स्पर्धा के प्री क्वार्टरफाइनल में प्रवेश किया. दो बार की ओलंपिक पदक विजेता सिंधू ने राउंड 32 के मुकाबले में मालदीव की फातिमा नबाहा अब्दुल रज्जाक को महज 21 मिनट में 21-4 21-11 से हरा दिया. वहीं पुरूष एकल स्पर्धा में श्रीकांत ने युगांडा के डेनियल वानागालिया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Korea Open पीव्ही सिंधू-किदाम्बी श्रीकांत उपांत्य फेरीत पोहोचले
Korea Open पीव्ही सिंधू-किदाम्बी श्रीकांत उपांत्य फेरीत पोहोचले
Korea Open पीव्ही सिंधू-किदाम्बी श्रीकांत उपांत्य फेरीत पोहोचले भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि किदाबी श्रीकांत यांनी दक्षिण कोरियाच्या सॅन्चॉन येथे खेळल्या जात असलेल्या कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जगातील तिसरे मानांकित आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा सरळ गेममध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
तापसीचा प्रियकर बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे का? अभिनेत्रीने शेअर केला मेसेज
तापसीचा प्रियकर बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे का? अभिनेत्रीने शेअर केला मेसेज
थॉमस कप बॅडमिंटन: भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी अंतिम फेरीत बलाढ्य इंडोनेशियन संघाचा 3-0 असा पराभव करून प्रथमच थॉमस कप विजेतेपद पटकावले. या विजयानंतर पीएम मोदींपासून ते क्रीडामंत्र्यांपर्यंत अनेक खेळाडू संघाचे अभिनंदन करत आहेत. क्रीडा मंत्रालयाने संघाला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय संघ दुहेरीचा प्रशिक्षक माजी डॅनिश बॅडमिंटनपटू मॅथियास बो आहे, जो…
View On WordPress
0 notes
onlyhindinewstoday · 4 years
Text
26 badminton players to start training at national camp ahead of Thomas and Uber Cup
26 badminton players to start training at national camp ahead of Thomas and Uber Cup
प्रतिष्ठित थॉमस और उबेर कप के लिए तैयारी शिविर सोमवार से हैदराबाद स्थित पुलेला गोपीचंद साइ बैडमिंटन अकादमी में शुरू हो गया है। इसके लिए पुरुष और महिला खिलाड़ियों की घोषणा कर दी गई है, लेकिन ओलंपिक रजत विजेता और विश्व चैंपियन पीवी सिंधुनिजी कारणों से महिलाओं के उबेर कप टूर्नामेंट के लिए उपलब्ध नहीं हैं। शिविर के लिए चुने गए सभी 26 खिलाड़ियों का अकादमी में रहना अनिवार्य कर दिया गया है और अंतिम टीम…
View On WordPress
0 notes