Tumgik
#यावर्षी
Text
WhatsApp Features 2022: यावर्षी WhatsApp ने युजर्ससाठी लाँच केले काही खास फीचर्स, पाहा पूर्ण लिस्ट
WhatsApp Features 2022: यावर्षी WhatsApp ने युजर्ससाठी लाँच केले काही खास फीचर्स, पाहा पूर्ण लिस्ट
WhatsApp Features 2022: यावर्षी WhatsApp ने युजर्ससाठी लाँच केले काही खास फीचर्स, पाहा पूर्ण लिस्ट WhatsApp Features Launched In 2022. : युजर्सचे फेव्हरेट मेसेजिंग प्लॅटफॉर्म अशी ओळख असलेले WhatsApp आपल्या युजर्सच्या सोयीसाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स सादर करत असते. २०२२ हे वर्ष देखील WhatsApp साठी विशेष ठरले. कारण, या वर्षीही व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी असे अनेक उत्तम फीचर्स लाँच केले आहेत, जे…
View On WordPress
0 notes
news-34 · 7 days
Text
0 notes
airnews-arngbad · 12 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत साडे चार हजार कोटी रुपयांहून अधिकची प्रलोभनं जप्त
उस्मानाबाद लोकसभात मतदार संघातून तीन तर लातूर मतदार संघातून एक उमेदवारी अर्ज दाखल
नवीन तंत्रज्ञानामुळे करप्रणालीत सुधारणा तसंच करचोरी रोखण्यास मदत-उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबीरांना प्रारंभ
आणि
देशात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मार्चपासून आतापर्यंत सुमारे साडे चार हजार कोटी रुपयांहून अधिकची प्रलोभनं जप्त केली आहेत. निवडणूक इतिहासात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात एकूण तीन हजार ४७५ कोटी रुपयांची प्रलोभनं जप्त करण्यात आली होती. यंदा मात्र, मतदानाचा पहिला टप्पा सुरु होण्यापूर्वीच चार हजार ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रलोभनं आयोगाच्या पथकांनी देशभरातून जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक दोन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अंमली पदार्थ, अकराशे कोटी रुपयांच्या भेटवस्तू. ५६२ कोटी रुपयांचे मौल्यवान धातू, ४९० कोटी रुपयांचं मद्य, तर सुमारे चारशे कोटी रुपये रोख रकमेचा समावेश आहे.
या कारवाईत राजस्थान सर्वात प्रथम, गुजरात दुसऱ्या तर तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात अनुक्रमे ७७८ कोटी, ६०५ कोटी आणि ४६० कोटींहून अधिकचं साहित्य जप्त करण्यात आलं. महाराष्ट्रात आतापर्यंत ४३१ कोटी ३४ लाख रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं असून, यामध्ये २१३ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ६९ कोटीचे मौल्यवान धातू, ७९ कोटींच्या भेटवस्तू तर ४० कोटी रुपये रोख रकमेचा समावेश आहे.
दरम्यान, या कारवाईत प्रवाशांना विनाकारण तपासणीला सामोरे जावं लागत असल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं होतं. ही बाब गांभी��्याने घेत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी करत, पर्यटक आणि नागरिकांना या तपासणीदरम्यान सौजन्याची वागणूक देण्याची सूचना संबंधित यंत्रणेला केली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज उस्मानाबाद मतदार संघातून तीन तर लातूर मतदार संघातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला.
उस्मानाबाद इथं राष्ट्रीय समाज दलाकडून आर्यनराजे किसनराव शिंदे, विश्व शक्ती पार्टीकडून नवनाथ विश्वनाथ दुधाळ तर अर्जुन सिद्राम सलगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. लातूर लोकसभा मतदार संघातून क्रांतिकारी जय हिंद सेनेचे भिकाजी गंगाराम जाधव यांनी एक अर्ज दाखल केला.
दरम्यान, उस्मानाबाद इथून आज २३ जणांनी ५९ अर्जांची तर लातूर इथून २४ जणांनी ४७ अर्जांची उचल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केले. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूर मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी शेट्टी यांनी दसरा चौकातील मैदानावर सभा घेतली.
सातारा लोकसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी आज राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यापूर्वी काढण्‍यात आलेल्‍या मिरवणुकीत खासदार शरद पवार, प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्यासह मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि नेते सहभागी झाले होते.
वंचित बहुजन आघाडीचे राहुल काशिनाथ गायकवाड आणि रमेश नागनाथ बारस्कर यांनी अनुक्रमे सोलापूर तसंच माढा लोकसभा मतदारसंघातून आज अर्ज दाखल केले.
रायगड लोकसभा मतदार संघातून इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गंगाराम गीते यांच्यासह पाच उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात आज एकही अर्ज दाखल झाला नाही.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी तुमसर इथं प्रचार सभा घेतली. त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर टीका करत विद्यमान सरकारने गरीबांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली.
दरम्यान, भाजपचा जाहीरनामा सर्व समाज घटकांसाठी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. देशाची सांस्कृतिक परंपरा तसंच वारसा स्थळे जपण्यासाठी एका विशेष निधीची तरतूद या जाहीरनाम्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
भ्रष्टाचार आणि व्यसन मुक्त भारत हा भारतीय जनता पक्षाचा संकल्प असल्याचं भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, लहुजी शक्ती सेनेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत लहुजी शक्ति सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी ही घोषणा केली.
अखिल भारतीय मराठा महासंघानेही महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी ही घोषणा केली.
****
नवीन तंत्रज्ञानामुळे करप्रणालीत सुधारणा होत असून करचोरी रोखण्यास मदत होत असल्याचं, प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. नागपूर इथल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय राजस्व सेवेच्या ७६व्या तुकडीच्या प्रशिक्षण समारोप सत्राला ते संबोधित करत होते. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कर दात्यांचा संबंधित व्यवस्थेवरील विश्वास वाढतो, ज्यामुळे नियमित कर भरण्यास प्रोत्साहन मिळतं असं मतही धनखड यांनी व्यक्त केलं. विविध विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं आजपासून मुलांसाठी उन्हाळी शिबीराला प्रारंभ करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते या शिबीराचं उद्घाटन करण्यात आलं. किराडपुरा भागात उर्दू शाळा क्रमांक एक मध्ये तसंच मनपाच्या प्रियदर्शनी विद्यालयात सुरू झालेल्या या १५ दिवसीय शिबीरात सकाळी साडे सात ते साडे दहा या वेळेत मुलांना क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, स्केटिग सारखे विविध क्रीडा प्रकार, चित्रकला, मातीकला, ��रिगामी, कथाकथन, सामान्य ज्ञान, संगीत, समूहगीत, समूह नृत्य आदी कलाप्रकार शिकवले जाणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.
****
नांदेड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशमन सेवा सप्ताहाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजपासून प्रारंभ झाला. याअंतर्गत २० एप्रिलपर्यंत अग्निशमन सेवाबाबत जनजागृती केली जाणार आहे. आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. १९४४ साली मुंबई इथं एका जहाजाला लागलेल्या भीषण आगीत हुतात्मा झालेल्या ६६ अग्निशमन जवान आणि त्यानंतरही विविध ठिकाणी अग्निशमन सेवा बजावताना वीरमरण आलेल्या सैनिकांना यावेळी अभिवादन करण्यात आलं.
****
देशात यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केल आहे. एक जून ते ३० सप्टेंबर, या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम. रविचंद्रन यांनी दिल्ली इथं आयोजित पत्रकारपरिषेदत सांगितलं. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल.
****
लातूर स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतिभा पाटील तर सचिवपदी डॉ. मनिषा बरमदे यांची तर, संघटनेच्या कोषाध्यक्षपदी डॉ. अनुसया वलसे यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या आरोग्य परिषदेत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. या परिषदेत शहरातल्या १२५ डॉक्टरांनी सहभाग घेतला.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं आज शहरातल्या बसस्‍थानकावर स्वीप समितीतर्फे विविध उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी समितीचे प्रमुख, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. लोकशाहीच्‍या बसमध्‍ये मतदान करुन स्‍वार होण्‍याची उद्घोषणा करत बसस्‍थानकावरील प्रवाशांना मतदान करण्याचं आवाहन डोईफोडे यांनी यावेळी केलं. 'मी मतदान करणार' या सेल्‍फी पॉईंटचे उद्घाटन करत बसवर स्टिकर चिकटवून प्रचार मोहिमेत सहभाग घेतला.
****
0 notes
nashikfast · 13 days
Text
सावधान: इन्कमटॅक्स रिटर्न दाखल करण्यापूर्वी घ्या काळजी!
नाशिक (प्रतिनिधी): इन्कम टॅक्स डिपार्टमेंट द्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सात्यत्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. करदात्यांसाठी अधिक तत्पर सेवा प्रदान करण्याच्या हेतूने यावर्षी प्रथमच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने रिटर्नची प्रक्रिया वेळेत व सुलभ करण्यासाठी आयटीआर फॉर्म अधिसूचित केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ नुकतेच संपलेले असून मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठीचे इन्कम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 21 days
Link
https://marmikmaharashtra.com/my-health-my-right-collectors-call-to-celebrate-world-health-day/
0 notes
jansamparknews · 2 months
Text
कला परिवार हडपसर कडून रोटी डे साजरा
जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी –  अनेक दाना मधून एक महत्त्वाचे दान म्हणजे अन्नदान. कारण त्यामधून माणसाला एक नवे जीवन मिळते व संवेदनशील वृत्ती मिळते…. कला परिवार हडपस���च्या वतीने २०१६ सालापासून एक मार्च रोजी रोटी डे हा उपक्रम राबवला जातो…. या उपक्रमात कला परिवारचे सदस्य प्रत्येक घरातून तीन चपाती व कोरडी भाजी गोळा करतात…. व गरजू लोकांना पोहोचवतात…. यावर्षी सुद्धा जवळजवळ दीड हजार लोकांना अशा प्रकारे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kvksagroli · 4 months
Text
Tumblr media Tumblr media
महिलांना पोषण बागेचे महत्त्व सांगुन महिलेने तयार केलेली बाग दाखवण्यात आली
रक्तक्षय, कुपोषण तसेच पोषक तत्त्वांच्या अभावामुळे होणाऱ्या आजार व व्याधी यावर मात करण्यासाठी विविध भाजीपाल्यांनी समृद्ध पोषण बाग अतिशय महत्त्वाची आहे. महिलांना पोषण बाग लावण्यासाठी प्रोत्साहन म्हणून दरवर्षी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी च्या अंतर्गत 200 महिलांना विविध भाजीपाल्यांच्या बियाणे आणि रोपे प्रात्यक्षिकासाठी दिली जातात. यावर्षी देखील शिंपळा, दौलतापूर लघुळ तसेच इतर गावांमध्ये पोषण बागेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याच पोषण बागेचा आज दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी दौलतापूर या गावांमध्ये शेती दिन घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महिलांना पोषण बागेचे महत्त्व सांगुन महिलेने तयार केलेली बाग दाखवण्यात आली. #womenshealth#healthyliving#healthiswealth#soybeans#पोषण#बाग#महिला#कुपोषणमुक्त#रक्तक्षय#भाजीपाला
1 note · View note
sattakaran · 4 months
Text
'बाईपण भारी देवा', 'आत्मपॅम्पलेट' ते 'झिम्मा २', हे आहेत २०२३ मधील टॉप १० चित्रपट, तुम्ही किती पाहिलेत?
0 notes
marmikmaharashtra · 6 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingolis-dussehra-festival-has-a-tradition-of-168-years/
0 notes
nandedlive · 10 months
Text
महाब्रॅण्ड आयआयबी च्या महानिकालाचा महासोहळा संपन्न !
Tumblr media
यावर्षी एम्स आणि एमबीबीएस चा टक्का वाढणार: मुख्यकार्यकारीसंचालक दशरथ पाटील यांची माहिती गुणवंताच्या पाठीवर टिम आयआयबीची शाबासकीची थाप .. अनेक विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा.. नांदेड – प्रतिनिधी येथील कॅनाल रोडस्थित चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे आयआयबीच्या नीट-२०२३ गुणवंताचा जल्लोषात सत्कार करण्यात आला मागील तब्बल २४ वर्षांपासून डॉक्टर आणि इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी आणि महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड म्हणून नावलौकिक असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटने नीट-२०१३ मध्येही दैदिप्यमान निकाल दिला आहे. यानिमित्ताने या गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक व्हावे तसेच आगामी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक या उदात्त हेतूने नीट-२०२३ मध्ये अलौकिक यश प्राप्त केलेल्या आयआयबीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शॉल, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगाला येईल यासाठी रोख रकमेच्या बक्षिसासह सहकुटुंब सन्मान करण्यात आला. गुणवंताच्या सत्कार सोहळ्यावेळी व्यासपीठावर आयआयबीच्या सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. आयआयबी करीअर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या नीट- २०२३ परीक्षेच्या निकालात उत्तुंग यशाची झेप घेत नीट मध्ये उत्तुंग यश मिळविले आहे. यामध्ये आयआयबीच्या पलक जाजू, सायली महिंद्रकर आणि पलक शहा या विद्यार्थिनींनी ७२० पैकी ७०५ गुण प्राप्त केले. तसेच आयआयबीच्या शिवम माहूरे ७००, ज्ञानेश्वर जाधव ७००, साक्षी वजिरगावे ७००, अर्जुन लिंगदळे ७००, उझेर रुलानी ६९७, भारती देशमुख ६९६, अनुष्का भारसवाडकर ६९६ या विद्यार्थ्यांनीही उत्तुंग यश संपादन केले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी नीट-२०२३ मध्ये घवघवीत यश संपादन करत एमबीबीएस शिक्षणाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. तरी या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक व्हावे तसेच आगामी काळात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक या उदात्त हेतूने नीट-२०२३ मध्ये अलौकिक यश प्राप्त केलेल्या आयआयबीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शॉल, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयोगाला येईल यासाठी रोख रकमेच्या बक्षिसासह सहकुटुंब सन्मान करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, टीम आयआयबी, आयआयबीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tumblr media
पिसीबी मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे आयआयबी इन्स्टिट्यूट… फिजिक्स विषयात पलक जाजू, उझेर रुलानी, सर्वेश हटकर, रामप्रसाद पाटील, सायली कदम, हाफिज सोहेल या सहा विद्यार्थ्यांनी १८० पैकी १८० गुण मिळविले आहेत.तर केमिस्ट्री विषयात सायली महिंद्रकर आणि तेजस पोरे यांना १८० पैकी १८० गुण मिळविले आहेत. तर बायोलॉजी विषयात पालक शहा, भारती देशमुख, ज्ञानेश्वर जाधव, अक्षय मिसाळ, गणराज नल्लावार आणि शिवानी जाधव या सहा विद्यार्थ्यांनी ३६० पैकी ३६० गुण मिळविले आहेत ही गौरवास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली ..
Tumblr media
आयआयबी टिमच्या दूरदृष्टीतून केलेल्या नियोजनाचे उत्तुंग यश हे फलित – श्री दशरथ पाटील.. नीट-२०२३ मध्ये उज्ज्वल प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत तर घेतलीच त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या या यशात टीम आयआयबीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयांच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचाही मोलाचा वाटा आहे. तरी आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात आयआयबी पीसीबी टीमचाही सत्कार करण्यात आला. याशिवाय आयआयबी इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापनाचेही काटेकोरपणे केलेल्या नियोजनाचाही या यशात मोलाची भूमिका असल्याने या सन्मान सोहळ्यात टीम आयआयबी व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला सातत्याने मिळणारे यश हे आयआयबी टिमच्या दूरदृष्टीतून केलेल्या नियोजनाचे फलित असल्याचे मत आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक श्री दशरथ पाटील. Read the full article
0 notes
Text
Year End 2022: यावर्षी वेट लॉसची ‘ही’ टेक्निक्स झाली हिट, अनेकांनी केले फॉलो
Year End 2022: यावर्षी वेट लॉसची ‘ही’ टेक्निक्स झाली हिट, अनेकांनी केले फॉलो
Year End 2022: यावर्षी वेट लॉसची ‘ही’ टेक्निक्स झाली हिट, अनेकांनी केले फॉलो नवी दिल्ली – नवं वर्ष सुरू झालं की प्रत्येक जण काही न काही संकल्प करतो. त्या संकल्पांमध्ये पहिला क्रमांक लागतो, तो म्हणजे वजन कमी करण्याचा. ज्या लोकांना खरोखर वजन कमी करायचे असते ते त्यासाठी वेट लॉस ट्रेंड (weight loss) फॉलो करण्यास सुरूवात करतात. यंदा म्हणजेच 2022 सालीही अनेक वेट लॉस ट्रेंड्स सोशल मीडियावर गाजत होते.…
View On WordPress
0 notes
govnews246 · 11 months
Text
खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ?
DA Hike : central government नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी येऊ शकते. केंद्र सरकार लवकरच दुसऱ्यांदा 2023 साठी महागाई भत्ता जाहीर करू शकते यावर्षी जानेवारीतही सरकारने ४ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकार दर वर्षी दोनदा म्हणजेच प्रत्येक सहामाही महागाई भत्त्यात वाढ करते.DA Hike News For Central Government Employees पहिल्या सहामाहीची घोषणा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 17 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 10 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक इथं प्रचारसभा होणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे हे महायुतीचे, तर काँग्रेसचे श्याम बर्वे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.
दरम्यान, बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती उत्तर नागपूरमधल्या इंदोरा इथं उद्या जाहीर सभा घेणार आहेत.
****
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन हजार ६४१ नवीन मतदान केंद्रं वाढली असून, एकूण केंद्रांची संख्या ९८ हजार ११४ इतकी झाली आहे. मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदान केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वांत जास्त  आठ हजार ३८२ मतदान केंद्रं यावेळी पुण्यात असून, सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सात जिल्हयात तीन हजारापेक्षा जास्त केंद्रं, दहा जिल्ह्यांमध्ये दोन हजाराहून अधिक, तर १२ जिल्ह्यांमध्ये दोन हजारापेक्षा कमी मतदान केंद्रं आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणं बंधनकारक आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
****
आगामी निवडणुकीत दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना घरुनच मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगानं उपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर असलेल्या महाराजगुडा इथल्या सुरेखा राठोड या ४० वर्षीय दिव्यांग महिलेनं गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. गावात एकमेव दिव्यांग असलेल्या सुरेखा यांचं मत घेण्यासाठी जीवती तालुक्यातलं पथक गेल्या सोमवारी दाखल झालं. त्यांनी आपलं मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदवलं आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. त्योसोबतच या पथकाने राज्याच्या सीमेवरील नारपठार या गावातल्या तीन वयोवृद्ध नागरिकांचंही गृहमतदानाद्वारे मत नोंदवलं.
****
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. सातारा मधून शशिकांत शिंदे यांना, तर रावेर मधून श्रीराम पाटील यांन उमेदवारी देण्यात आली आहे. 
****
जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित होमिओपॅथिक परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज झालं. "संशोधनाचं सक्षमीकरण, नैपुण्य वाढ" ही या अधिवेशनाची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात अनुवादात्मक संशोधन, संशोधन आणि सराव, महामारी आणि सार्वजनिक आरोग्य, होमिओपॅथिक औषध मानकीकरण आणि मूलभूत संशोधन, या विषयांवर विविध सत्र होणार आहेत.
****
यावर्षी जारी करण्यात आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक कावीळ अहवालानुसार, कावीळ संसर्गामुळे होणार्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कावीळ संसर्गामुळे जगभरात दर दिवशी तीन हजार ५०० मृत्यू होत असून, जगभरात दरवर्षी १० लाखाहून अधिक मृत्यू होत असल्याचंही आरोग्य संघटनेच्या या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा मृत्यूदर पाहता आगामी काळात कावीळ संसर्ग रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.
****
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी छत्रपती संभाजी नगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकारितेसह राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक तसंच सामाजिक क्षेत्रातल्या अनेकांनी माने यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. माने यांचं काल दीर्घ आजाराने हैदराबाद इथं निधन झालं, ते ६१ वर्षांचे होते.
****
कॅनडामध्ये टोरंटो इथं सुरु असलेल्या कँडिडेट्स टुर्नामेंट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेश यानं पाचव्या फेरीत विजय मिळवला. तर भारताचे दुसरे खेळाडू प्रज्ञानंदा आणि विदित गुजराती यांनी विरोधी खेळाडुंना बरोबरीत रोखलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी शहरासह परिसरात काल रात्री झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीने जटाळवाडी इथल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव बाभळे असं त्यांचं नाव नाव असून, ते ६५ वर्षांचे होते. गाराच्या मारामुळे हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं नायब तहसीलदार आनंदराव सुळे यांनी सांगितलं. कनका इथं गारपिटीच्या तडाख्याने एक गाय अन् चार शेळ्या देखील दगावल्याचं वृत्त आहे. वादळी वारा आणि गारांच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गारपिटीने नुकसान झालेल्या भागाचं सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तलाठ्यांना दिल्या आहेत. सेनगाव तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. वसमत तालुक्यातही अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालं. 
****
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस वादळी वारे आणि वीजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातही १३ तारखेपर्यंत अशाच पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
मका खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करा; शेकडो शेतक-यांची मागणी
सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात मका ���िकांची लागवड करण्यात आली आहे. बहुतांश शेतक-यांनी मकापिकाची कापणी करुन मळणी करुन विक्रीसाठी तयार केले आहे. त्यामुळे मका खरेदी साठी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतक-यासह मका उत्पादक शेतकरी शालीकराम बोरकर, यादोराव बोरकर यांनी केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुका हा धान उत्पादनासाठी विदर्भासह राज्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 1 month
Link
https://marmikmaharashtra.com/sunflowers-bloomed/
0 notes
jansamparknews · 2 months
Text
छत्रपती शिवाजी महाराज मोटिवेशन पुरस्काराचे आयोजन
जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – अखंड हिंदुस्तानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिला जाणारे छत्रपती शिवाजी महाराज मोटिवेशन पुरस्कार 2024 यावर्षी गोव्यातील पणजी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. संस्कृती मानव सेवा संस्था आणि ए.बी.एम यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. इतिहासाशी संबंधित कार्यरत व्यक्तिमत्व, व्यावसायिक, कला,…
Tumblr media
View On WordPress
0 notes