Tumgik
#छत्रपती संभाजीनगर
mhlivenews · 3 months
Text
ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार का? खैरे 'गुरुजी' म्हणतात...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.आमदार संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर खैरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
सरपंचाने नोटा उधळत केले आंदोलन | पंचायत समितीचे बीडीओ तात्काळ निलंबित; गिरीश महाजनांकडून कारवाई
छत्रपती संभाजीनगर : फुलब्री तालुक्यातील सरपंच साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंवर कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे. दरम्यान या प्रकरणी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले की, हा निर्णय स्वागातार्ह आहे. मंत्री महाजन यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा…
View On WordPress
0 notes
ankushjadhav · 2 years
Photo
Tumblr media
Cows are gentle, interesting animals 🐮🧿 . . #cow #cows #farm #cowsofinstagram #nature #animals #cattle #farmlife #milk #calf #love #farming #animal #bull #photography #dairy #k #cowstagram #moo #farmer #agro #vaca #agriculture #naturephotography #kuh #art #dairyfarm #photooftheday #ankush_jadhav (at छत्रपती संभाजीनगर) https://www.instagram.com/p/CklCIQCvi_j/?igshid=NGJjMDIxMWI=
3 notes · View notes
airnews-arngbad · 7 minutes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५८%मतदान
राज्य मंडळाची इयत्ता दहावी तसंच बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार
एसटीचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभरात साडे पाचशेहून अधिक बस स्थानकांवर साजरा
आणि
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम-साडे तीनशे पथकांची स्थापना
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास ५८ पूर्णांक ३४ शतांश टक्के मतदान झालं. पश्चिम बंगाल ६९ पूर्णांक ८९ शतांश टक्के, हिमाचल प्रदेश ६६ पूर्णांक ५६, झारखंड ६७ पूर्णांक ९५, उत्तर प्रदेश ५४, बिहार ४८ पूर्णांक ८६, चंदीगढ ६२ पूर्णांक ८०, पंजाब ५५ पूर्णांक २०, तर ओडिशामध्ये सरासरी ६२ पूर्णांक ४६ टक्के मतदानाची नों�� झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे.
****
विधान परिषदेच्या चार जागांपैकी नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी आतापर्यंत तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. भाजपचे विवेक कोल्हे, यांच्यासह अहमदनगर इथले छगन पानसरे यांनी आपला अर्ज दाखल केला असून, विवेक कोल्हे यांनी आज अपक्ष उमेदवारी म्हणूनही अर्ज दाखल केला. दरम्यान, काल दिवसभरात ३९ इच्छुकांनी अर्ज नेल्याची माहिती निवडणूक प्रशासनानं दिली. यात नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांचाही समावेश आहे.
****
देशात विजेची मागणी वाढलेली असतानाही, औष्णिक वीज प्रकल्पात सध्या कोळशाचा साठा ४५ मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्याची माहिती कोळसा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३० टक्क्यांपेक्षा जास्त असून, देशाची १९ दिवसांची वीजेची गरज भागवण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या १ जुलैपर्यंत औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये ४२ मेट्रीक टन कोळसा उपलब्ध होईल, असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले.
दरम्यान, या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली असून, तिला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. शिवानी हिच्यावर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेनं न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या दोन महिला परिचारिकांचीही चौकशी केली.
****
राज्याबाहेर जात असेलेले उद्योग राज्यात परत आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा १० जून नंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यातल्या हिंजेवाडी इथल्या ३७ आयटी कंपन्या गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे महत्त्व कमी होत असताना, सरकार बघ्याची भूमिका का घेत आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. दहावी तसंच बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या महा एचएसएससी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
****
राज्यातील तिसरी ते बारावीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्याच्या अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी केली आहे.
****
आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीरंजनकुमार शर्मा यांची नाशिकचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. त्यांनी आज मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.
****
छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीचं मतमोजणी आणि निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबाबतची पूर्ण खबरदारी घेण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटीचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकांवर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून दर्शनी भागात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तर, अनेक बसस्थानकांवर तोरण बांधण्यात आलं होतं. काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून १७ हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगारप्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात अत्याधुनिक बस स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.
****
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात साडे तीनशे भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च २० खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. यानिमित्त नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन करनवाल यांनी केलं. पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर केलेल्या कामाची दखल घेऊन, हे मानांकन देण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालु��्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात ९९ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आज पार पडला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला हा कार्यक्रम घेतला जातो. संशोधक डॉक्टर सूर्यकांत पवार यांनी तूर कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयी शेतकऱ्यांची संवाद साधला, अत्याधुनिक शेती तंत्रज्ञाना विषयी प्राध्यापक गीता यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
****
0 notes
imranjalna · 8 days
Text
शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले "ते" प्रेमीयुगलच..दोघेही विवाहित
त्या प्रेमीयुगलाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश.. दोघेही विवाहित असून, ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी गावातील.. जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक महिला आणि पुरुष असे दोघे आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मौजपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह खाली घेतले. त्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 26 days
Link
https://marmikmaharashtra.com/after-seven-decades-acharya-mahasraman-arrived-in-the-city-organizing-various-religious-programs-from-7th-to-11th-may/
0 notes
gajananjogdand45 · 1 month
Link
https://marmikmaharashtra.com/on-the-occasion-of-tradition-the-struggle-between-life-and-tradition-will-be-reflected-on-the-silver-screen-on-26th-april-to-meet-the-audience/
0 notes
nashikfast · 2 months
Text
त्यांनी दशक्रिया विधीला हेल्मेट वाटप करून दिला सामाजिक संदेश
वडिलांचे अपघाती निधन, नातेवाईकांकडून हेल्मेट आणि १ हजार वचननाम्यांचे वाटप नाशिक (प्रतिनिधी): हेल्मेट अभावी मेंदूला मार लागून वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे भविष्यात कुणावर अशी वेळ येऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी दशक्रिया विधीप्रसंगी भाऊबंदाना हेल्मेट वाटप करून सामाजिक संदेश दिला.मरळगोई खुर्द येथील माधव शंकर फाफाळे यांचा दि. ९ डिसेंबर रोजी नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 months
Text
निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून  त्यानुसार चवथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 months
Text
छत्रपती संभाजीनगरात आज पाण्याचा 'शटडाऊन'; 'या' परिसरांमध्येही पाणीपुरवठा राहणार बंद
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ९०० व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन करण्यासाठी बुधवारी महापालिका शटडाऊन घेणार आहे.
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 6 months
Text
पत्रकार संतोष शेळके यांचे निधन
करमाड: पत्रकार क्षेत्रामध्ये गेल्या २१ वर्षापासून कार्यरत असलेले तसेच स्वच्छ प्रतिमा असलेले ज्येष्ठ पत्रकार, तथा तालुका पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी संतोष रावसाहेब शेळके ( ४५, रा.कुंभेफळ ता. छत्रपती संभाजीनगर) यांचे रविवारी सकाळी साडेआठ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कुंभेफळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्ययात्रेला तालुक्यातील सर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 7 months
Text
छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगरात चाकूने भोसकून तरुणाचा खून
https://bharatlive.news/?p=188084 छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगरात चाकूने भोसकून तरुणाचा खून
छत्रपती ...
0 notes
mhlivenews · 5 months
Text
शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ, शालेय पोषण आहारात अळ्या सापडल्या, पालक आक्रमक
छत्रपती संभाजीनगर: शाळेमध्ये मुलांची उपस्थिती असणे, त्यांना चांगले शिक्षण आणि पोषक आहार मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहारातील तांदळामध्ये अळ्या अन् उंदराची विष्टा आढळून आली.शाळकरी मुलांना दिलं जाणाऱ्या पोषण आहारातील ही धक्कादायक बाब बघून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.ही घटना सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आली. यावेळी संतप्त पालकांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 months
Text
मराठवाड्यात तीन टप्प्यांत मतदान, छत्रपती संभाजीनगर-बीड-जालना मतदारसंघांसाठी 'या' तारखेला मतदान
म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठ मतदारसंघांमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. २६ एप्रिल, सात मे व १३ मे रोजी मतदान होईल. चार जून रोजी मतमोजणी होईल.निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत; तर राज्यात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. राज्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होईल, त्यात मराठवाड्याचा समावेश नाही. राज्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 4 months
Text
छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार भूमिगत गटार योजना, मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार, मंजुरीची प्रतिक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराशी संबंधित तीन विधानसभा मतदारसंघात भूमिगत गटार योजनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, मंजुरीसाठी ते सरकारच्या विविध यंत्रणांकडे पाठवण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास महापालिकेला निविदा प्रक्रिया राबवणे शक्य होईल, असे मानले जात…
Tumblr media
View On WordPress
0 notes