Tumgik
#गेलेलं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गोंधळून गेलेलं मन आणि समोर आश्वासक मूर्ती, सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला
गोंधळून गेलेलं मन आणि समोर आश्वासक मूर्ती, सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला
गोंधळून गेलेलं मन आणि समोर आश्वासक मूर्ती, सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. संध्याकाळी मुंबईत अंधारून आलेलं. मुसळधार पाऊस पडत होता. अशातच अभिनेत्री बाप्पाच्या दर्शनाला गेली. तेव्हा काय वाटलं, हेही तिनं सांगितलं. Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 12 December 2023
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
'विकसित भारत २०४७: तरुणाईचा आवाज' उपक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन
निर्यात बंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दोन लाख टन कांदा खरेदीचा निर्णय 
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसचा विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा
विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता आणि विशेष पुरस्कारांचं वितरण
आणि
जालना इथं एका तरुणाची तीन हल्लेखोरांकडून हत्या;दोघांना अटक
****
व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण होतं असल्यामुळे आजच्या काळात राष्ट्रनिर्माणाचं अभियान अधिक महत्त्वपूर्ण असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत २०४७: तरुणाईचा आवाज; या अभिनव उपक्रमाचं काल दूरदृश्य संवाद पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. अमृत काळातल्या या पिढीला भविष्यात नेतृत्व करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी सज्ज करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
दरम्यान, सर्व राज्यांच्या राजभवनांमध्ये या निमित्तानं काल एक-दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. मुंबईत राजभवन इथं झालेल्या कार्यशाळेत राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्यासह राज्यभरातल्या विविध विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.
****
केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. ग्राहक कार्य मंत्रालयाचे सचिव रोहितकुमार सिंह यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. कांद्याचं उत्पादन आणि जागतिक बाजारातली परिस्थिती पाहता कांद्यावर निर्यात बंदी लागू केली असून, यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात राहतील, असं सिंह यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल विधान परिषदेत बोलताना, केंद्र सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा प्रश्न उपस्थित करत, सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले...
‘‘बंदीच्या संदर्भातला निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जर शेतकरी अडचणीत येत असेल, कांदा खरेदी होत नसेल, लिलाव होत नसतील तर तो सगळा कांदा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे. केंद्र सरकार त्यांचा भाव घोषित करेल.’’
****
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव कालपासून पूर्ववत सुरू झाले. निर्यात बंदीमुळे व्यापाऱ्यांनी काही अडचणी मांडल्या होत्या, त्या दूर झाल्याने लिलाव सुरू केल्याचं, नाशिक जिल्हा कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष खंडू बोडके यांनी सांगितलं.
दरम्यान, कांदा निर्यात बंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात काल मुंबई-आग्रा रस्त्यावर चांदवड इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण केंद्र सरकारला यावर तोडगा काढण्यास भाग पाडू, असा निर्धार पवार यांनी व्यक्त केला.
कांदा निर्यात बंदी तसंच ऊसापासून इथेनॉल तयार करण्यावरील बंदीच्या निषेधार्थ काल धाराशिव इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रस्त्यावर कांदा फेकून निदर्शनं करण्यात आली.
****
राज्यात खरीप हंगामात शेतपीकांचं नुकसान झालेल्या २४ जिल्ह्यातल्या ५२ लाख शेतकऱ्यांना, २५ टक्के प्रमाणे अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आल्याचं, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत सांगितलं. यापैकी एक हजार ६९० कोटी रुपयांचं वितरण काल सकाळपर्यंत पूर्ण करण्यात आल्याचं, ते म्हणाले.
****
मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक घोषणा करण्यात आल्या, मात्र त्या घोषणांचा पुरवणी मागण्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नसल्याकडे दानवे यांनी लक्ष वेधलं.
****
शेतकरी संकटात असल्याने सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काल नागपुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने पटोले यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी ते विधानभवन असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना, हा मोर्चा फक्त काँग्रेसचा नसून जनतेचा आक्रोश दाखवणारा मोर्चा असून, यामुळे झोपी गेलेलं सरकार जागं होईल, असा विश्वास व्यक्त केला.
****
ग्रामीण टपालसेवकांनी आजपासून देशव्यापी संप पुकारला असून आहे. या संपात राज्यातले वीस हजार टपालसेवक सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागातल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे पुणे ग्रामीण विभागाचे सचिव एकनाथ मंडलिक यांनी दिला आहे.
****
ईपीएस-१९९५ या योजनेच्या निवृत्तीवेतनात वाढ करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या काल लोकसभेत शून्य काळात बोलत होत्या. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांना सन्मानजनक निवृत्तीवेतन मिळावं, यासाठी महागाईनुसार निवृत्तीवेतनाची पुनर्रचना करावी आणि किमान निवृत्तीवेतनाची रक्कम वाढवावी, असं सुळे यांनी म्हटलं आहे.
****
देशभरातल्या ५८ विमानतळांचा कृषी उडान योजनेत समावेश करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतुक राज्य मंत्री व्ही के सिंह यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. यामध्ये नाशिक तसंच पुणे विमानतळांचा समावेश आहे.
****
काश्मीरमधलं कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयाच्या घटनापीठानं, काल याबाबत निर्णय सुनावताना, निवडणूक आयोगाला ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेण्यास सांगितलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल विभागीय स्तरावरील गेल्या दोन वर्षांचे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता आणि विशेष पुरस्कार, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम हे प्रथम क्रमांकाचं दहा लाख रूपयांचं पारितोषिक, नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव, आणि भोकर तालुक्यातल्या हाडोळी या गावांना विभागून देण्यात आलं. द्वितीय क्रमांकाचं आठ लाख रूपयांचं पारितोषिक बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या भडंगवाडी आणि लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या नळगीरया गावांना विभागून देण्यात आलं. तृतीय क्रमांकाचं सहा लाख रूपयांचं पारितोषिक जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या कंदारी आणि परभणी तालुक्यातल्या ब्राह्मणगाव या गावांना विभागून देण्यात आलं.
****
जालना शहरातल्या मंठा चौफुली परिसरात एका तरुणाची तीन हल्लेखोरांनी काल दुपारी गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. गजानन मच्छिंद्र तौर असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या हल्लेखोरांपैकी दोघांना जालना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती.
****
परभणी जिल्ह्यात वडगाव सुक्रे इथं विकसित भारत संकल्प यात्रेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यात्रेदरम्यान शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
****
दरम्यान, ही यात्रा काल लातूर जिल्ह्यात बसवंतपूर इथं पोहोचली, यावेळी शासकीय योजनांची माहिती देण्यासोबतच वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यावर भर देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितलं.
हिंगोली जिल्ह्यात आज विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसंच लाभार्थ्यांना विविध लाभांचं वितरण, नाव नोंदणी करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल ही यात्रा जैतापूर, हतनूर, फारोळा, बोधेगाव आदी गावात जनजागृती केल्यानंतर आज बाबतारा, डोमेगाव, मलकापूर, टाकळी, बोरसर आदी गावात जाऊन शासकीय योजनांची माहिती देणार आहे.
****
येत्या २४ डिसेंबरपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अन्यथा लोकशाही मार्गाने संघर्षाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते काल लातूर तालुक्यात मुरुड इथं जाहीर सभेत बोलत होते. धाराशिव जिल्ह्यात उमरगा तसंच अंबाजोगाई इथं अंबा साखर कारखाना परिसरातही काल जरांगे यांची सभा झाली. मराठा आरक्षणाचे ८० टक्के काम पूर्ण झालं असून, या शेवटच्या टप्प्यात शांततेनं आंदोलन करावं, आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे, यात राजकारण आणू नये, असं आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केलं.
****
मुंबई विभागात माल गाडी रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे काही रेल्वे गाड्यांची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस, जालना -मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, निजामाबाद-पंढरप���र एक्सप्रेसची आजची एक फेरी रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
shrikrishna-jug · 8 months
Text
कुठले फूल अन् कुठला सुगंध
आपल्यावर रागावून गेलेलं एक माणूस पुन्हा आपल्याला भेटायला आल्यावर प्रथम नक्कीच एक फुल देऊन स्वतःला अन त्या व्यक्तीला आनंद देणार, असं नेहमीच वाटणार्‍या मनाला पहाटे एकदा स्वप्न पडतं.आणि मग….. हरवलेले फुल आणून देतानाजेवढा तुला आनंद झालादुप्पटीने झाला आनंद मलाफुल ते हातात घेताना सुगंध त्याचा दरवळलाउजळूनी जुन्या आठवणीपाकळ्यावरचे ते थेंब दवांचेआणिती डोळ्यात पाणी क्षणभरचे ते स्वप्न पहाटेचेकरीते काम…
View On WordPress
0 notes
jagdamb · 1 year
Text
#Billboard_Design
जर आज तुम्ही राजकीय कारकिर्दीत किंवा व्यवसायात जाहिरातीच्या तंत्राचा फ़ायदा घेत नसाल तर तुम्हाला उद्या इतरांना या तंत्राचा उपयोग करून पुढे गेलेलं पहाव लागेल. त्यामुळे उद्या पश्चाताप करत बसण्यापेक्षा आज योग्यवेळी योग्य अशी जाहिरात करा आणि प्रगतीपथावर अग्रेसर रहा....
Design & Digital Marketing Services
📲Mob No. :
90 494949 38
90 494949 23
@jagdambpune
#व्यवसायवाला #जगदंब
#jagdamb #vyavsaywala™
#design #billboard
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
Text
*🔸तुकोबांची होळी.🔸*
*मी होळीत काय आणि का जाळलं ? याविषयी तुकोबाराय सांगतात,*
*दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं । दहन हे होळी होती दोष ॥*
*लोकं होळीत शेणाच्या गौऱ्या, लाकडं जळतात. "मी होळीत माझ्यातले 'दोष' जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही." दोष नाही, तर दारिद्र्य नाही. त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही.*
*सर्व सुखें येतीं मानें लोटांगणी । कोण यासी आणी दृष्टिपुढें ॥*
*"दु:ख तर जवळ येतंच नाही, उलट सुख माझ्यापुढं लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही." सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना, तुकोबाराय सुखाला हाकलून लावतात. कारण, त्यांना सुखाची हाव नाही, आणि दोष जाळल्यामुळं दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे.*
*आमुची आवडी संतसमागम | आणीक तें नाम विठोबाचें ॥*
*मला सुखाची अपेक्षा का नाही ? तर, "संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव, एवढ्याचीच मला आवड आहे."*
*आमचें मागणें मागों त्याची सेवा | मोक्षाची निर्देवा कुणा चाड ? ॥*
*"मला मागायचंचअसेल, तर मी सुख नाही मागणार. फक्त 'संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव' एवढंच मागेल. याच्यापुढं तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढं मोक्षाची आवड कुण्या दुर्दैवी माणसाला राहील ?"*
*तुका म्हणे पोटीं सांठविला देव | न्यून तो भाव कोण आम्हां ? ॥*
*"मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळं, मला आता कशाची कमतरता?" सगळं भरून पावल्यासारखंच आहे. म्हणून मला मोक्ष नको. अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठही नको.*
0 notes
ambajogaimirror · 3 years
Text
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचा स्मृतिदिन.‌ त्यांचा जन्म.18 नोव्हेंबर 1901 ला कोल्हापूर येथे झाला. शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं सुद्धा ते ओळखले जात. 
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण अद्याप सीबीआयकडे गेलेलं नाही अजूनही हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे | #SushantSinghRajput #AnilDeshmukh #CBI http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/sushant-singh-death-case-maharashtra-government-opposed-to-cbi-inquiry/?feed_id=6176&_unique_id=5f2ea92a4229f
0 notes
digimakacademy · 4 years
Text
थिएटरला पर्याय शोधता येईल असं वाटत नाही: नागराज मंजुळे
थिएटरला पर्याय शोधता येईल असं वाटत नाही: नागराज मंजुळे
[ad_1]
सध्या ओटीटीवर चित्रपटांची रांग लागल्यामुळे ओटीटी हा सिनेमागृहांना पर्याय होऊ लागल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांना मात्र तसं वाटत नाही. ‘थिएटरमध्ये सगळ्या सुविधांसह चित्रपट पाहणं हा वेगळा आनंद आहे. त्याला पर्याय शोधता येईल असं वाटत नाही’, असं ते म्हणतात.
आगामी कामांमध्ये गढून गेलेलं, प्रत्येक गोष्टीत साधेसरळपणा जपणारं आणि स्वतःमधला विद्यार्थी चिरंतन जपण्याला…
View On WordPress
0 notes
news-on · 4 years
Text
मुंबईतील लोकलसेवा सुरु झाल्यास गर्दी टाळण्यासाठी 'हा' पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता...
मुंबईतील लोकलसेवा सुरु झाल्यास गर्दी टाळण्यासाठी ‘हा’ पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता…
मुंबई : मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. देशात अनलॉक १ सुरु आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन सुरु आहे. अशात मुंबईत गोष्टी जर पुन्हा आधीसारख्या करायच्या असतील मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावाचून पर्याय नाही. मात्र कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. अशा परिस्थितीत मुंबईची लाईफ लाईन कशी सुरु करता येईल याबाबत विचारविनिमय सुरु आहे.     
गेल्या काही दिवसात सातत्याने मुंबईतील लोकल रेल्वे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
या अभिनेत्रीविरोधात आशा भोसलेंनी गाठलं होतं पोलीस स्टेशन; विकोपाला गेलेलं भांडण
या अभिनेत्रीविरोधात आशा भोसलेंनी गाठलं होतं पोलीस स्टेशन; विकोपाला गेलेलं भांडण
या अभिनेत्रीविरोधात आशा भोसलेंनी गाठलं होतं पोलीस स्टेशन; विकोपाला गेलेलं भांडण Singer Asha Bhosale and Actress Sadhana Fight: लोकप्रिय गायिका आशा भोसले आणि दिवंगत अभिनेत्री साधना या दोघींमध्ये वाद होते. हे वाद इतके पराकोटीला पोहोचले होते की, आशा भोसले यांनी साधना यांच्याविरोधात थेट पोलिसाकडे तक्रारच केली होती. Singer Asha Bhosale and Actress Sadhana Fight: लोकप्रिय गायिका आशा भोसले आणि दिवंगत…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
मराठा आरक्षणासाठी शासन कटीबद्ध-आंतरवाली सराटी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही;मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे मात्र साखळी उपोषण सुरू राहणार
शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी; दोन्ही गटांना याचिकांची कागदपत्र देण्यासाठी दोन आठवडे मुदत
उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना पाच वर्षांची परवानगी एकदाच देण्याचा शासन निर्णय जारी
औरंगाबाद इथं यापूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर कामांचा आढावा घेऊनच नव्या कामाची घोषणा करावी-खासदार इम्तियाज जलील यांची मागणी
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांना प्रारंभ 
आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत परवा रविवारी भारत आणि श्रीलंकेदरम्यान अंतिम सामना
****
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर करत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडलं.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाची भूमिका अगदी स्पष्ट आहे, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
जे आपलं गेलेलं आरक्षण आहे, रद्द झालेलं आरक्षण आहे, ते आपल्याला मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढल्या आहेत आरक्षण रद्द करतांना त्याच्यावर देखील आपलं काम सुरू आहे. तो डेडीकेटेड जो कमिशन आहे, समर्पित आयोग यावर देखील आपलं काम सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध आहे, कुणावरही अन्याय न करता. आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही देखील मनोजसारखे स्वस्त बसणार नाही.
मराठा आरक्षण आंदोलकांच्या बहुतांश मागण्या��बाबत शासन ठोसपणे कार्यवाही करत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सारथी तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बाबत करण्यात आलेल्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातले गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सरकारला निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला असून, बेमुदत उपोषण जरी मागे घेतलं तरी साखळी उपोषण सुरु राहील, असं जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटानं एकमेकांच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर काल प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.  प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेची प्रत उपलब्ध करुन देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. सगळ्या प्रकरणांची एकत्र सुनावणी घेण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली होती. दोन्ही गटांना याचिकेशी संबंधित कागदपत्र एकमेकांना सोपवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आल्याचं शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना अर्थ विभागाची मान्यता आणि निधी उपलब्ध करण्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यातल्या वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ यासह २३ तालुक्यांमध्ये नवीन प्राथमिक तसंच उप आरोग्य केंद्रं, उप जिल्हा रुग्णालयांना मंजूरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचं श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना पवार यांनी केल्या. आरोग्य सुविधांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन मिळावं यासाठी पुढील पाच वर्षांकरता एकदाच परवानगी देण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयानुसार यावर्षीच्या गणेशोत्सवात शासन नियमांचं आणि कायद्यांचं पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना पुढील पाच वर्षांकरता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना करावी लागणार आहे.
****
पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला  मग महाराष्ट्रात सरकार दुष्काळ जाहीर का करत नाही, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यानं शेतकरी हवालदील झाल्याचं सांगत वडेट्टीवार यांनी, सरकारला शेतकर्याच्या समस्या दिसत नसल्याचा आरोप केला.
****
संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. यासाठी संबधित नेत्यांना आमंत्रणं पाठवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
****
सर्वोच्च न्यायालय आता नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड प्लॅटफॉर्म अंतर्गत येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही घोषणा केली. यामुळे न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांचा मागोवा घेण्यास मदत होणार असून, कामांमध्ये पारदर्शकता येईल असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयात ८० हजारांहून अधिक प्रकरणं प्रलंबित आहेत.
****
राष्ट्रीय हिंदी भाषा दिनानिमित्त पुण्यात तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलन घेण्यात येत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचं उद्‌घाटन झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संदेशाची ध्वनिचित्रफीत यावेळी प्रसारित करण्यात आली. संपूर्ण देशाला एका समान धाग्यात बांधण्याचं काम हिंदी भाषेने केल्याचं शहा यावेळी म्हणाले.
****
केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत विशेष स्वच्छता अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पोर्टलचं अनावरण केलं. M C D P M डॉट N I C डॉट I N या संकेतस्थळाच्या माध्यमातून या विशेष अभियानाची निगराणी केली जाईल.
****
२०१६ साली औरंगाबाद इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान घोषणा करण्यात आलेल्या विविध विकासात्मक कामांपैकी किती कामं आतापर्यंत पूर्ण झाली आहेत, याचा आढावा घेऊनच नव्या कामाची घोषणा मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्रांनी करावी, अशी मागणी, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले,
मागच्या सात वर्षांपूर्वी ज्या ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या ते संपूर्ण झालेले आहेत का, ते कंप्लीट झालेले आहेत का, आम्हाला असं निदर्शनास आलं, की अनेक अशा स्कीम्स आहेत की ज्याची अजून सुरूवातच झालेली नाही. अनेक असे स्कीम्स आहेत, की ज्याला गुंडाळण्यात आलेल्या आहेत. डेडीकेशन्सच्या ज्या ज्या स्कीम्स आहेत, त्याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. माझी विनंती ही आहे, की नवीन घोषणा करण्याच्या अगोदर आपण जे वादे केले होते, जे आश्वासनं दिले होते, त्याच्या बाबतीत लोकांना सांगा की आम्ही ही घोषणा केली होती याची हे हे परिस्थिती आहे.
भष्टाचार करणाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील खासदार जलिल यांनी केली असून, विकासात्मक काम करणाऱ्या ठेकेदारांना आम्ही सुरक्षा देऊ असंही नमूद केलं.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या सशस्त्र लढ्यात तरुणांचं योगदान मोठं होतं. लातूर इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर गुरुजी यांनी बॉम्ब तयार करणं आणि ते विविध शिबीरांमध्ये पोहोचवण्याची जोखमीची कामगिरी बजावली होती. शहरकर गुरुजींनी जिल्हा माहिती कार्यालयाला दिलेल्या मुलाखतीत ही आठवण जागवली, या मुलाखतीचा हा संपादित अंश....
रात्रीच्या वेळेला बाँब तयार करायचे. त्याला वात लावलेली असायची. आणि ते भरून ठेवायचे. सुरवातील सोलापूरला काही कवच तयार होत नव्हती. त्याच्यासाठी कोल्हापूरहून आणावी लागली. त्यामुळे आधी बाँब भरायचे आणि आठ कँप होते बॉर्डरवर तिथे नेऊन द्यायचे. मला एकदा प्रसंग आला असा की दोन हँड ग्रेनेड, एक रिव्हॉल्व्हर, आणि अडतीस कारट्रेजेस, चंद्रशेखर वाजपेई आणि रामचंद्रजी मंत्री ते पांगरीला होते, त्यांना नेऊन द्यायचे. पहाटे पाचलाच उठलो मी. सोलरपूरहून कुर्डवाडीला आलो. पांगरीला चालत दीड किलोमीटर चिंचोडी कँपवर पोहोचलो. त्यांना ते दिलं. त्याला मोसंबी, केळे रिव्हॉल्व्हरला आणि काडतुसं जी होती ना त्याला खारका नाव ठेवलेलं होतं.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. 
औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं आजपासून १७ तारखेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. आज शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, राज्यगीत, राष्ट्र्गीत गायन, महिला आणि बालकल्याण विभागच्या वतीनं खाद्य प्रकार आणि विक्रीदालनांचं प्रदर्शन, आदी कार्यक्रम होणार आहेत.
मुक्तिसंग्रामात धगधगता मराठवाडा या विषयावर सारंग टाकळकर यांचं, तर लढ्यातल्या महिला क्रांतिकारक, या विषयावर डॉ रश्मी बोरीकर यांचं व्याख्यान देखील आज होणार आहे.
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचं ई -उदघाटन, तर परवा १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य ध्वजारोहण होणार आहे.
****
हिंगोली इथं मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एक एकर जागेवर साडे सात हजार झाडं लावण्यात आली. पुढील तीन वर्षापर्यंत या रोपांचं, पालिका प्रशासनाकडून संगोपन केलं जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यावेळी उपस्थित होते.
****
मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मराठवाड्यातल्या सर्व तालुक्यामध्ये काढलेली कृतज्ञता यात्रा काल उस्मानाबाद मध्ये दाखल झाली. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बुबासाहेब जाधव यांनी या यात्रेचं स्वागत केलं. यानिमित्तानं नमन इस मिट्टी को या संकल्पनेनुसार उस्मानाबाद तालुक्याची माती मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांच्या स्मृतीनिमित्त औरंगाबाद इथं उभारण्यात येणाऱ्या स्मृती वनात टाकण्यासाठी संकलित करण्यात आली.
****
लातूर इथं मुक्ती संग्रामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथ आणि दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते काल झालं.
त्याचबरोबर लातूर जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचा आज माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या व्याख्यानानं समारोप होणार आहे.
****
मुक्तीसंग्रामानिमित्त काल बीड इथं प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी दीपा - मुधोळ मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात केली.
****
परभणी इथं बालविवाह मुक्त परभणी अभियान आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम या विषयावर चर्चा करुन प्रश्नमंजुषा घेण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण कमी झालेलं दिसून येईल असं मत व्यक्त केलं. मुक्तिसंग्रामानिमित्त परभणी जिल्ह्यात आज आणि उद्या एकता दौड, सायकल रॅली, प्रभातफेरी, चलतचित्रणाचं सादरीकरण, विशेष व्याख्यान आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
पोळ्याचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं बैलांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून बैल पोळ्याचा सण साजरा केला.
हिंगोली जिल्हयात लंपी आजाराचा प्रादुर्भाव असल्यानं जिल्हा प्रशासनानं बैलांना एकत्रित जमा करण्यावर बंदी घातली होती, तरीही अनेक गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात आला. कनेरगाव नाका इथं दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ट्रॅक्टर पोळा भरण्यात आला. पूर्ण गावातून ट्रॅक्टरने मिरवणूक काढण्यात आली.
जालना शहरासह जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणार आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताचा आज सुपर फोर मधला शेवटचा सामना बांग्लादेशसोबत होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लेंडी प्रकल्पांतर्गत चार बुडीत गावातल्या एक हजार ४४ लाभार्थ्यांना ३८ कोटी ५२ लाख ३६ हजार रुपये वितरीत करण्यात आलं आहे. सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी काल ही माहिती दिली. मुखेड तालुक्यातल्या रावणगाव, भाटापुर, हसनाळ, आणि मारजवाडी या चार गावांचा यात समावेश आहे.
****
जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातल्या आरोग्य सहायकास दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं. रमेश राठोड असं त्याचं नाव असून, वैद्यकीय देयक मंजूर करण्यासंदर्भात त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती.
****
0 notes
bloggerdeepu · 4 years
Text
Thappad
तापसी पन्नूचा Thappad पाहिला.
उच्चशिक्षित आधुनिक कुटुंबातील नवरा बायको..श्रीमंत, संस्कारी, values वगैरे जपणारे लोक..
पण अभावितपणे एका पार्टीत प्रेमळ नवऱ्याकडून बायकोच्या कानाखाली थप्पड मारली जाते. बायको या एका थप्पडीवरून घटस्फोट घेते. तिची वकील जेव्हा तिला विचारते की
"अगं एक थप्पडच तर मारलीए ना?"
तेव्हा तापसी म्हणते,
"हो, फक्त एक थप्पड. पण नाही मारू शकत मला तो.."
वकील, तापसी, तिची मेव्हणी आणि मोलकरीण अशा चार विविध कार्यक्षेत्रातल्या, निरनिराळ्या स्टेटसच्या बायका आणि त्यांच्या रिलेशनशीप्स याभोवती कथा फिरते.
मोलकरणीला रोज मारहाण होते, लाथाबुक्क्या पडतात, त्या मानाने मला एकच थप्पड मारली आहे, मग ती सहन करायची का?
हा प्रश्न विचारून चित्रपट थांबतो.
Great!
पुरुषसत्ताक आणि पुरूषप्रधान (both are different words) अशा कुटुंबसंस्थेत एका तरुण मुलीने अशा पद्धतीने आत्मसन्मान जपणं हे छान चितारलंय,
याच प्रणालीत आपणही वाढलेलो असल्याने, आपणही क��ंचित awkward होऊ इतका बारीक विचार केलाय.
अनेक उत्तम स्त्रीप्रधान चित्रपट यायला लागलेत आणि विधायक विचार मांडले जायला लागलेत.. पण चित्रपट बघताना वपु काळे यांच्या 'वपुर्वाई' पुस्तकातील 'ठिणगी' कथा एकदम आठवली..
कमाल! थप्पडचा सारा विषय त्यात अनोख्या पद्धतीने मांडला होता. वपुंनी ८५ सालीच घरगुती हिंसेवर भाष्य करून ठेवलय!
एक वकील मुलगी एका घरगुती हिंसेपोटी आत्महत्या केलेल्या मुलीचं वकीलपत्र घेते. का? तर तिच्या नवऱ्याने भांडणात तिला फेकून मारलेल्या बियरच्या ग्लासच्या तुकड्यात तिला बंदूक, फास, सिलेंडर, चाकू हे सगळं चमकून गेलेलं दिसतं..
शस्त्र हे ऐपतीचं आणि निगरगट्टपणाचं चलन असतं.
त्यामागचा विचार हा खरा अहंकारी असतो.
मग हातात बियरच्या ग्लासाचा तुकडा असो, बंदूक असो किंवा रिकाम्या हाताने बायकोला मारलेली थप्पड असो!
कथेच्या या गमकापाशी वपु आपल्याला अलगद आणून सोडतात!
पशुत्वाची पहिली ठिणगी ओळखता यायला हवी. त्याचा वणवा झाल्यावर गळे काढून उपयोग नाही.
त्या चित्रपटापेक्षा अधिक कन्व्हिनसिंगली हा विषय या कथेतून आपल्यापाशी येतो.
आजकालच्या आपल्या आत्यंतिक प्रतिक्रियावादी पिढीसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.
आमच्या रक्तात पुरुषी अहंकार भिनलाय, पुरोगामी असण्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी आत कुठेतरी त्या समानतेला तडा गेलेला असतोच.
बायकोवर सर्रास राग काढला जाण्याचा हा काळ नव्हे हे मान्य. मागच्या पिढीने 'बायकोवर हात उगारणे' ही क्रिया संस्कारांच्या विभागात नेली. अर्थात, त्यामुळे तुमच्याआमच्यासारख्या पांढरपेशा घरातून हे प्रकार नाहीसे झाले.
पण तरीही बारीकसे अहंकार जोपासले गेलेच.
तेच अहंकार आमच्या पिढीत डोकं वर काढू पाहणार आहेत. कारण संस्कारांना आम्ही जुमानत नाही. आम्ही अजून जास्त निगरगट्ट आहोत. आम्हाला स्वार्थ आणि आळस अशी दोन शिंगं फुटली आहेत..
अशात हे विचार रुजवणं गरजेचं आहे. उशिरा का होईना पण चित्रपटांच्या माध्यमातून हे होतंय चांगली गोष्ट आहे.
पण अर्थात, त्यासोबत हाताशी चांगल्या लेखकांची पुस्तकंही असूदया.. ती अजूनच पौष्टिक आहेत!
Tumblr media
0 notes
jagdamb · 1 year
Text
जर आज तुम्ही राजकीय कारकिर्दीत किंवा व्यवसायात जाहिरातीच्या तंत्राचा फ़ायदा घेत नसाल तर तुम्हाला उद्या इतरांना या तंत्राचा उपयोग करून पुढे गेलेलं पहाव लागेल. त्यामुळे उद्या पश्चाताप करत बसण्यापेक्षा आज योग्यवेळी योग्य अशी जाहिरात करा आणि प्रगतीपथावर अग्रेसर रहा....
#Billboard_Design
Design & Digital Marketing Services
📲Mob No. :
90 494949 38
90 494949 23
@jagdambpune
#व्यवसायवाला #जगदंब
#jagdamb #vyavsaywala™
#design #billboard
Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
nileshkorade · 4 years
Text
दहशतवाद आणि भारत
पार्श्वभूमी
एकीकडे भारतात गेली सहा वर्षे सतत हिंदू विरुद्ध मुस्लिम असा जो जातीयवाद भडकवला जात आहे त्याच्या परिणामस्वरूप CAA बद्दल होणाऱ्या निषेध सभांचे निमित्त होऊन दिल्लीमध्ये दंगे सुरु झालेले होते. आणि त्याचवेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Trump दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. या दरम्यान मला एक प्रश्न विचारण्यात आला. विचारणाऱ्या व्यक्तीने "भारत आणि अमेरिका यांच्यावर दहशतवादाच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे" असे मत व्यक्त करून दहशतवाद या विषयावर माझे मत विचारले. या विधानामध्ये, विशेषतः देशातील सद्यःपरिस्थिती पाहता मला बराच विरोधाभास जाणवला. त्याचा आणि सद्यःपरिस्थितीमध्ये भारतासमोर दिसत असलेले दहशतवादाचे आव्हान या विषयावरचे माझे मत या दोन्ही गोष्टींचा हा उहापोह.
सारांश
१. खिडकीबाहेर बघून कधीकधी जेवढे विदारक दृश्य दिसते त्याहूनही विदारक दृश्य आपल्या घरात असू शकते. भारतीयांनी थोडे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
२. माझ्या दृष्टिकोनातून बहुसंख्य भारतीय जे पाकिस्तान आणि तेथील लोकांकडे दहशतवादी म्हणून निर्देश करतात ते स्वतः देखील दहशतवादीच आहेत.
असे का वाटते मला? जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा.
दहशतवाद म्हणजे काय?
दहशतवादाची जी वैशिष्ट्ये आहेत त्यात खालील दोन वैशिष्ट्ये मला महत्वाची वाटतात-
१. सर्वसामान्यपणे, त्याचं मूर्त रूप (manifestation) आणि परिणाम हे निरपराध लोकांना त्रास होणे, मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, किंवा त्याहीपेक्षा गंभीर स्वरूपामध्ये, त्यांचा जीव जाणे (कत्तल, हत्त्या) असा असतो. इथे हे जाणून घेणे महत्वाचे आहे की अशी कृत्यं फक्त सत्तेबाहेरील लोकच नाही तर एखाद्या देशाचं अधिकृत सरकारही करू शकतं. तसेच, दहशतवाद एखाद्या शत्रू राष्ट्राविरोधातच नाही तर देशांतर्गतही केला जाऊ शकतो.
२. दहशतवादी व्यक्तीची मानसिकता आणि विचारसरणी दोन्ही भ्रष्ट झालेल्या असतात. अशा व्यक्तीला कितीही समजावून सांगितले, तिच्यासमोर कोणतेही तर्क मांडले किंवा पुरावे समोर आणले तरीही तिला सत्य किंवा योग्य काय आहे ते उमजत नाही किंवा तिला ते उमजून घ्यायचे नसते. याचे भारतात बहुतेकांना सहज पटणारे उदाहरण म्हणजे पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन भारतामध्ये दहशतवादी हल्ले करणारे जे युवक असतात त्यांना indoctrinate/brainwash केलेले असते. त्यामुळे त्यांना काहीही सांगितले तरीही त्यांचे तर्क ठरलेले असतात- “तुमचं सरकार गुन्हेगार आहे आणि तुम्ही अशा गुन्हेगार सरकारला टॅक्स देता म्हणजे तुम्हीही गुन्हेगार आहात. असे लोक काफिर असतात आणि त्यांना मारणे म्हणजे ईश्वराची सेवा करणे”. याचेच दुसरे, पण बऱ्याच भारतीयांना न आवडणारे, उदाहरण म्हणजे नथुराम गोडसे, सावरकर आणि त्यांचे सहकारी. महात्मा गांधी बहुतांश भारतीयांचं आणि तत्कालीन ब्रिटिश सरकारचेही मतपरिवर्तन करू शकले, एवढेच नाही तर जगभरामध्ये मार्टिन लुथर किंग जुनिअर किंवा नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइनस्टाइन अशा अनेक दिग्गज नेत्यांचा आणि व्यक्तींचा आदर्श बनले. पण ते गोडसे, सावरकर आणि त्यांच्यासारखी विचारसरणी असणाऱ्यांचे मत-परिवर्तन कधीही करू शकले नाहीत. आजही नाही.
भारतातील देशांतर्गत दहशतवाद
भारतातील देशांतर्गत दहशतवादाची काही ताजी उदाहरणे-
बंगलोरच्या अमुल्याला “पाकिस्तान झिंदाबाद” म्हणल्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक (तर्फे NDTV)
Tumblr media
भारतात असा कोणताही कायदा नाहीये ज्यात पाकिस्तानला शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलं गेलेलं आहे आणि “पाकिस्तान झिंदाबाद” म्हणण्यावर बंदी लादली गेली आहे.
रुलिंग पार्टी BJP मेंबर कपिल मिश्रा DCP दिल्ली पोलीस यांच्या उपस्थितीत लोकांना भडकवताना (inciting riots) (१० मिनिटे ४१ सेकंदांनंतर ) (तर्फे NDTV)
Tumblr media
दिल्ली पोलीस जखमी मुस्लिम तरुणांना मारताना आणि राष्ट्रगीत गायला लावताना. यातल्या एका युवकाचा मृत्यू झाला
Tumblr media
दंगेखोरांचा म्होरक्या पोलिसांच्या पूर्ण संरक्षणामध्ये दंगे घडवताना आणि फेसबुकवर लाईव्ह विडिओ पोस्ट करताना (सूचना: असभ्य भाषा)
Tumblr media
एका युवकाला अनेक धर्मांध दंगेखोर मारताना (तर्फे Reuters)
Tumblr media
केम्ब्रिज प्रोफेसर प्रिया गोपाल दिल्ली दंग्यांबद्दल बोलताना (सर्व विडिओ पहा पण मुख्यत्वे १० मिनिटे २१ सेकंदानंतर) (तर्फे Democracy Now!)
Tumblr media
अनुमान
वर दिलेली दहशतवादाची व्याख्या आणि देशांतर्गत घडलेल्या ताज्या घटनांची दिलेली उदाहरणे बघता माझ्या मते-
१. पाकिस्तानकडे दहशतवादी राष्ट्रं म्हणून बघण्याआधी आपण elephant in the room जो आहे त्याकडे पाहायला हवे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा पु��्हा एकदा आपल्या देशामध्ये दंगे होत आहेत आणि आतापर्यंत ४२ लोक मारले गेले आहेत तेव्हाही आत्मपरीक्षण न करता इतरांकडे निर्देश करणे मला चुकीचे वाटते.
२. माझ्या दृष्टिकोनातून बहुसंख्य भारतीय वर दिलेली दशतवादाची जी दोन वैशिष्ट्ये आहेत ती पूर्ण करतात. एक राजकीय पक्ष ज्याचा कमीत-कमी १९८९ पासूनचा इतिहास ज्यांना माहित होता, ज्यांना १९९२-९३ मधील दंगे का झाले आणि त्यात त्या राजकीय पक्षाचा भाग काय होता हे माहिती होते, ज्यांना २००२ मधील दंगे कसे झाले आणि त्यात त्याच राजकीय पक्षाच्या सरकारी यंत्रणेचा भाग काय होता हे माहिती होते, आणि, तरीही त्याच पक्षाला आणि त्याच नेत्याला ज्यांनी २०१४ मध्ये मत दिले, एवढेच नाही, तर त्यानंतर गेली ६ वर्षे unconditional support देऊन ज्याला बेलगाम केले, आणि एवढे होऊनही ज्यांना आपण अजूनही योग्यच आहोत असे वाटते त्यांच्या मानसिकतेबद्दल आणि विचारसरणीबद्दल दुसरे काय सत्य असू शकते? आणि वर दिलेले दहशतवादाचे पहिले जे वैशिष्ट्य आहे- दहशतवादाचं मूर्त रूप आणि त्याचे परिणाम, तर गेल्या सहा वर्षात पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांमुळे जितके लोक मारले गेले त्यापेक्षा कितीतीतरी अधिक देशांतर्गत अशांततेमुळे मारले गेले. मग ते lynchings असतील किंवा पोलिसांद्वारे illegal encounters असतील किंवा धार्मिक दंगे असतील (यात नोटबंदी सारख्या घोडचुकांमुळे मारले गेलेल्यांच्या समावेश केला नाही आहे).
फरक आणि साम्य
पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादामध्ये आणि या देशांतर्गत अस्तित्वात असलेल्या दहशतवादामध्ये जे फरक आहेत ते असे-
१. पाकिस्तानातून येणारा दहशतवादी स्वतःच्या विचारांसाठी आपला जीव गमवायला आणि आपले घर उध्वस्त होऊ द्यायला तयार असतो. भारतातला white collared दहशतवादी स्वतःचा आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव सुरक्षित ठेऊन लिविंग रूम आणि ऑफिसेस मधून घराबाहेर दहशतवाद पसरवतो. 
२. पाकिस्तानातून येणारा दहशतवादी एका शत्रू राष्ट्राला हानी पोहोचवतो. भारतातला white collared दहशतवादी स्वतःचाच देश आणि समाज यांना हानी पोहोचवतो.
एक साम्य मात्र असंही दिसतं की जसं पाकिस्तान सरकार दहशतवादाला पाठबळ देऊन state sponsor of terrorism होतं, तसंच भारतात देशांतर्गत दिसणाऱ्या दहशतवादातही state sponsoered असल्याची बरीच लक्षणं दिसतात.
समारोप
तर स्वतःला सुजाण आणि शांतताप्रिय म्हणवून घेणाऱ्या भारतीय समाजाने फेसबुक, ट्विटर आणि  WhatsApp ग्रुप्समध्ये एकमेकांना चांगुलपणाचे सर्टिफिकेट देऊन स्वतःच स्वतःचे अनुमोदन करणे काही काळ थांबवून आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी ते पहिले पाऊल आहे. तसे न करणारे इतिहासाच्या पुनरावृत्तीने शापित असतात. १९९२, २००२ आणि आता २०२० ही त्याचीच सिद्धता आहे.
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
गतकाळातील फोटो म्हणजे काय? आपलंच हूल देत गेलेलं वय आपल्याला फोटोतून भेटायला येतं. #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapukale #vapurza https://www.instagram.com/p/B9Gl5JVJG6K/?igshid=ihfapyepis4k
0 notes
suteinshortstory · 4 years
Photo
Tumblr media
November 2015
दिवास्वप्न दुकान तर सताड उघडं आणि पुढ्यातूनच घुसून अंधाराने भिंतींशी आरामशीर पसरी मांडलेली. मधोमध साठ वोल्टाचा बल्ब खाली छपरावरून उतरून तेवढा एकटाच जळत होता काळपटलेल्या निळ्या भिंतींशी पिवळट फेकत. बाकी बराचसा भाग किराणा मालाने उभ्या भिंतीवर अचकटून बरबटलेला. बाकी दुकान जिरे, धने, धान्ये आणि गळीत बरण्या-पोत्यांसह घोरत आणि खोबरेल तेला तीळीचे ढेकर मधनं-अधनं ढूसकत पार गपगार पडून होते. टेबलावर हिशेबाच्या ओलकटून नरम पडलेल्या पानांच्या वहीपल्याड गाथा तुकियाची जुनाट तेलकटून संथपणे फडफडत होती. आणि दगडी थंड फरशीवरच्या विटकरी गोणपाटावर फेकून ठेवलेल्या रिकाम्या सतरंजीवर पोत्याची फक्त तेवढी उशी. पोकळ छातीच्या भात्यासह गुडघ्यांमध्ये लटपटत भिरभिरत्या नजरेने फुटक्या आकड्यांनिशी आतला हा सगळा पसारा मोजत, झुलणाऱ्या तराजूमागे बाहेर इस्मिनी टेबलाच्या आधाराने उभी होती. ऐन वेळी हा फकीरडा दुकानदार असा गायब असणे असे परवडण्यासारखे नव्हते. चार रात्री सरून पाचवी उतरण्याची वेळ झाली. रात्रीच्या झोपेतल्या स्वप्नांच�� गोष्ट सोडाच, दिवास्वप्नेही हरवून जणू काळ सरकला. शेवटी शोधत इथे येऊनही हा असा गोल झोल. कुठेसा कापरागत उडालेला हा दुकानदार नमूना कधीच उगवणार नाही अशी स्वतःची खोटी समजावणी काढून पाहत ती आला क्षण जाळून धूरळत होती. पार पानगळून गेलेलं एक-एक अंग गोळा करून कल्टी मरणाच्या बेतात असतानाच तिचा तब्बल चार मिनिटे वाट पाहून मेलेला जीव बीप-बीप मेसेज करत व्हाईब्रेटावा तस्साच नेमका हा वाणी टपकावा एकदम शेवटी. कथा बदलणार. मग काय. ‘काय नाय हो. आपन नको उगाच आगीशी ख्योळ म्हणून माचिसच्या प्येट्या ठेवीत नाई. म्हनुन त्ये माडीवाल्याच्या दुक्नातून घिउन आलो एक’, असे बरळत आत येत त्याने दातांतली बिडी शिलगावली. त्याच्या झुरक्याचा पूर्ण मशरूम होत नाही तोच तिने आधाशीपणाने त्याला संपूर्ण आपादमस्तक श्वासून भरून घेतला छातीत, आणि चेहरावरती आनंदाने जास्वंद फुलावा. दुकान पुन्हा रिकामेच. बावळा न हा मर्ढेकर. आंधळा स्वप्ने मागत असतो उद्यासाठी, दोन डोळ्यांची हाव नाही. गणपत वाणी असेल आळशी आणि मूर्ख, भेकड नाही.
0 notes